अश्विनी नक्षत्राविषयी माहीती – Ashwini nakshatra information in Marathi

अश्विनी नक्षत्राविषयी – Ashwini nakshatra information in Marathi

अश्विनी नक्षत्र हे मेषराशीमधील प्रथम नक्षत्र आहे.म्हणजेच पहिल्या राशीमधील प्रथम नक्षत्र आहे.

अश्विनी नक्षत्राचे चारही चरण मेष राशीत येत असतात.अश्विनी नक्षत्रामध्ये चु,चे,चो अणि ला ही ही अक्षरे येत असतात.

अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव तसेच गुणवैशिष्ट्ये –

अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा अत्यंत धाडसी उत्साही कामसु आणि बुदधिमान असा असतो.जीवनात नेहमी इतरांपेक्षा एका नवीन दिशेने चालण्याचे धाडस हे करत असतात.

आपल्याला नेमुन दिलेले कुठलेही काम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडायला यांना अधिक आवडते.

  1. अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींना आपल्या कुठल्याही कामातुन यांना संतुष्टी प्राप्त होत नसते.अजुन काहीतरी नवीन करावे नवीन गोष्टींचा शोध लावावा असे ह्या व्यक्तींना सतत वाटत असते.
  2. दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांमुळे आपले आधीपासून निश्चित केलेले अभ्यासपूर्ण मत बदलणे याना कदापि आवडत नाही.आपल्या कुठल्याही विषयावर घेतलेल्या निर्णयावर हे पुर्णपणे ठाम असतात.
  3. अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचे प्रमुख कार्यक्षेत्र हे संरक्षण विभाग आहे ज्यात पोलिस दल,सिक्युरिटी इत्यादींचा समावेश होतो.
  4. बाॅडी बिल्डींग ह्या विषयात देखील यांना विशेष आवड असते.बाॅडी बिल्डिंग क्षेत्रात आपले करिअर घडवायला यांना अधिक रूची असते.
  5. याव्यतिरिक्त इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी ह्या विषयाची देखील आवड यांना असते.संशोधन क्षेत्रामध्ये संशोधन कार्यात देखील यांना बरीच रूची असते.
  6. अश्विनी नक्षत्राची देवता अश्विनी कुमार आहे.म्हणजेच देवतांचे वैद्य म्हणुन यांना वैद्यकीय क्षेत्रात विशेष आवड असलेली आपणास पाहावयास मिळते.
  7. अश्विनी नक्षत्रावर केतुचा विशेष प्रभाव असतो म्हणून यांचा स्वभाव थोडा गुढ असलेला आपणास दिसून येतो.
  8. अश्व हे ह्या नक्षत्राचे चिन्ह आहे.घोडयाप्रमाणेच यांचा कुठल्याही कामात नेहमी वेग असतो.कुठलेही काम इतरांपेक्षा अधिक जलदगतीने पुर्ण करायला यांना आवडत असते.
  9. पण याचा एक तोटा देखील यांना उदभवतो कुठलेही काम वेगाने जलदगतीने करताना त्याचे व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे यांचे काम यशस्वी पणे पुर्ण होईल याची कुठलीही खात्री देता येत नाही.
  10. म्हणजेच यांच्या कुठल्याही कामात नियोजनाचा अभाव असलेला आपणास दिसून येतो.यामुळे कुठल्याही कामात यांनी घेतलेली अपार मेहनत यामुळे निरर्थक वाया जाण्याची शक्यता असते.
  11. म्हणुन अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींनी कुठलेही काम हातात घेतल्यावर ते काम सुरू करण्याआधी त्याचे व्यवस्थित नियोजन करून घ्यायला हवे याने आपण त्या कामात घेतलेली मेहनत वाया जाणार नाही.
  12. अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये कोणतेही काम करण्यासाठी भरपुर उर्जा असते.म्हणुन यांना रिकामे बसुन राहणे आवडत नाही
  13. सतत कुठले ना कुठले काम करत राहायला यांना अधिक आवडते.
  14. अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव इतरांना मदत करण्याचा असतो.पण केलेल्या मदतीबाबत समोरच्या व्यक्तीने जाहीरपणे आभार व्यक्त नाही केले तर यांना कधी राग देखील येत असतो.
  15. म्हणजेच यांना आपल्या केलेल्या कामाच्या माध्यमातून नेहमी लोकांच्या नजरेत प्रकाशझोतात राहणे अधिक आवडते.
  16. हे व्यक्ती एक आदर्श जोडीदार तसेच मित्र देखील असतात.
  17. अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींची स्वताची एक विचारधारा विचार प्रणाली असते यावरच नेहमी चालायला यांना अधिक आवडते.इतरांच्या विचारधारेला चालायला यांना अजिबात आवडत नाही.
  18. याचसोबत दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येणे देखील यांना कदापि पसंद नसते.
  19. यांनी जर एखादे काम करायचेच असा मनाशी निर्धार केला तर ते काम करताना कितीही अडीअडचणी अडथळे संकटे येवो तरी देखील हे आपले हाती घेतलेले कार्य कुठल्याही परिस्थितीत पुर्ण करत असतात.
See also  सुहाणी शाहयांचा जीवन परिचय | Suhani Shan biography in Marathi