कृतिका नक्षत्र – krutika nakshatra information in Marathi
कृतिका नक्षत्र हे दोन्ही राशीमध्ये येत असते याचे पहिले चरण मेष राशीत येते.अणि उर्वरित तीन चरण हे वृषभ राशीच्या मध्ये येतात.म्हणुन ह्या नक्षत्राला त्रिपाद नक्षत्र असे संबोधिले जाते.
कृतिका नक्षत्राचा स्वामी रवी आहे अणि याचे तत्व अग्नी आहे.
कृतिका हे नक्षत्र दोन्ही राशीमध्ये येत असते म्हणून याच्यावर मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ अणि वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र या दोघांचाही विशेष प्रभाव असतो.
या नक्षत्रामध्ये आ,ई,उ ए ह्या अक्षरांचा समावेश होतो.
कृतिका नक्षत्राचा स्वभाव अणि काही महत्वाची गुण वैशिष्ट्ये तसेच दोष –
- कृतिका नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती फार मेहनती कष्टाळु अणि अभ्यासु वृतीची असतात.यांचा स्वभाव अतिशय न्याय बुदधी स्वरूपाचा असतो.आपल्या मेहनतीवर अणि बुद्धीमत्ता वर यांचा ठाम विश्वास असतो.
- कृतिका नक्षत्रावर अग्नी अणि सुर्य यांचा विशेष प्रभाव असल्याने ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती नेतृत्व करण्यात ह्या व्यक्ती आपणास नेहमी पुढे दिसुन येत असतात.
- कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना अभ्यासपुर्ण सल्ला द्यायला विविध विषयांवर लोकांना माहीती द्यायला नवनवीन गोष्टी शिकवायला खुप आवडते.अणि यांच्या अभ्यासपुर्ण सल्ल्याचा लोकांना फायदा देखील होत असतो.
- कुठलेही काम सर्वसामान्यपणे जेवढा वेळ ते काम करायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात जास्तीत जास्त मेहनत घेऊन लवकरात लवकर पुर्ण करायची यांना सवय असते.म्हणजे आजचे काम उद्यावर न ढकलता ताबडतोब त्याच क्षणी करावे असा स्वभाव यांचा असतो.
- पण कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या लोकांच्या ह्याच स्वभाव वैशिष्ट्यांमुळे त्यांचे काम कधी कधी बिघडण्याची देखील शक्यता असते.
- म्हणुन कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या लोकांनी जे काम काम करायला जितका वेळ लागतो किमान तितका वेळ घ्यायलाच हवा उगाच अतिघाई करण्यात बनत असलेले काम बिघडवून घेऊ नये.
- यांना जुन्या काळातील चालत आलेल्या प्रथा परंपरा मान्य नसतात.म्हणजेच ह्या व्यक्ती विज्ञान वादी संशोधक स्वभावाच्या असतात.म्हणजे यांना विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यात विशेष रूची असते.हे व्यक्ती डाॅक्टर,संशोधक ह्या क्षेत्रात विशेष करीअर करू शकतात.
- डाॅक्टर सर्जन सर्जरी स्पेशालिस्ट म्हणून हे व्यक्ती लवकर यश प्राप्त करत असतात.
कुठलेही वाहन चालवताना आपण विशेष काळजी घ्यायला हवी.
- कृतिका नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती न्यायप्रिय स्वभावाची असतात म्हणून कुठेही काही वादविवाद भांडण तंटा होत असल्यास हे स्वता मध्यस्थी करून योग्य तो न्याय निवाडा करत असतात.
- म्हणुन ह्या व्यक्ती न्याय निवाडा करण्याशी संबंधित कामे जसे की वकिली करणे न्यायाधीश बनुन लोकांना न्याय देणे ही कामे खुप चांगल्या पद्धतीने करू शकतील.
- कुठल्याही मुद्द्याच्या मुळ खोलात जायला यांना अधिक आवडते.म्हणुन असे म्हणतात की कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या लोकांशी वादविवाद करणे टाळावे.
- कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव उग्र रागीट आक्रमक असतो.म्हणुन काही वादविवाद झाला तर ह्या व्यक्ती स्वताला वादविवादात आवर घालु शकत नसतात.म्हणुन हे समोरच्या व्यक्तीला वादविवाद करणारे कलहप्रिय स्वभावाचे वाटणात.
- म्हणुन यांनी आपल्या रागावर नेहमी नियंत्रण ठेवायला हवे.नेहमी शांत राहायला हवे.कारण रागराग केल्याने आपणास शरीराच्या विविध आजारांना जसे की हाय बीपी वगैरेला सामोरे जावे लागु शकते.
- ह्या व्यक्ती प्रोफेसर शिक्षक,नेता सल्लागार तसेच एक वक्ता म्हणून एक चांगले नावलौकिक प्राप्त करत असतात.यांना समाजात क्रांती घडवुन आणायला आवडते.म्हणुन ह्यांना समाजात लोकांकडुन एक आदराचे मानाचे स्थान प्राप्त होते.
- सरकारी नोकरी मध्ये देखील यांना भरपुर चांगले यश मिळते म्हणून ह्या नक्षत्राच्या विद्यार्थ्यांना जर स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल सरकारी अधिकारी बनायचे असेल तर नक्की प्रयत्न करायला हवा.