बॅक म्हणजे काय?बॅकेचा इतिहास,बॅकेचे प्रकार अणि महत्वपुर्ण कार्ये – BANK COMPLETE INFORMATION IN MARATHI

बॅक म्हणजे काय?बॅकेचा इतिहास-BANK COMPLETE INFORMATION IN MARATHI

बॅक म्हणजे काय?

बॅक ही एक अशी वित्तीय संस्था तसेच ठिकाण असते जिथे आपण आपले अकाऊंट ओपन करून पैसे जमा करू शकतो.

अणि आपल्या आवश्यकतेनुसार चेक किंवा ड्रापटच्या माध्यमातुन आपले बॅकेत जमा केलेले पैसे काढु देखील शकतो.

बॅक ही एक अशी वित्तीय संस्था तसेच महत्वपुर्ण यंत्रणा आहे.जी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देते.ग्राहकांच्या पैशाचा अत्यंत सुरक्षितरित्या व्यवहार करत असते.

आज विकसनशील तसेच अविकसनशील देशांच्या देखील अर्थव्यवस्थेला चालना देण्यात बॅकेचा खुप मोलाचा वाटा आहे.

बॅकेकडुन आपले सर्व पैशांशी संबंधित महत्वाचे व्यवहार सुरक्षितपणे पाडले जातात.

बॅक ही आपल्या ग्राहकांकडुन ठेवी स्वीकारणे त्या सुरक्षित ठेवणे हे काम करण्यासोबत बॅकेतील ग्राहकांना कर्ज प्रदान करण्याचे काम बॅक करत असते.

बॅक आपणास नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड,एटीएम कार्ड आॅनलाईन पैशांची देवाणघेवाण आदान प्रदान करण्यासाठी बॅकेकडुन आपणास विविध प्रकारच्या वित्तीय सेवा प्रदान केल्या जातात.

BANK COMPLETE INFORMATION IN MARATHI
BANK COMPLETE INFORMATION IN MARATHI

बॅकेचे प्रमुख प्रकार कोणकोणते आहेत?

१)सहकारी बॅक –

भारतातील सहकारी बॅका भारतातील सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहेत.

बॅकिंग नियम १९४९ कायद्यानुसार सहकारी बॅका कार्यवाही करत असतात.म्हणजे सहकारी बॅका १९४९ ह्या नियमाचे पालन करतात.

बॅकिंग नियम १९४९ मधील ठरवलेल्या अटी नियमांचे पालन सहकारी बॅका करीत असतात.सहकारी बॅक ही ग्रामीण भागातील विकासासाठी आपली अत्यंत महत्वपुर्ण बजावतात.

ह्या बॅकेदवारे ग्रामीण तसेच आर्थिक दृष्ट्या मागास भागात वास्तव्यास असलेल्या लोकांना आवश्यक त्या सुविधा तसेच कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम करते.हया भागातील लोकांच्या दैनंदिन गरजा भागवत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करते.

ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास,शेतकरी, लघुउद्योग अठरापगड जाती बारा बलुतेदार इत्यादींकरीता सहकारी बॅका कार्यरत आहेत.

सहकारी बॅका एकुण तीन स्तरांवर काम करीत असतात –

  • प्राथमिक पतसंस्था –
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक –
  • राज्य सहकारी बॅक –

प्राथमिक पतसंस्था –

  • प्राथमिक स्तरावरील ज्या पतसंस्था आहेत ज्यांना क्रेडिट को आॅपरेटिव्ह सोसायटी असे म्हटले जाते.अशा पतसंस्था यात समाविष्ट करण्यात येतात.
  • ग्रामीण स्तरावर शहरी आणि निमशहरी अशा प्रत्येक ठिकाणी ह्या पतसंस्था आढळुन येत असतात.हया पतसंस्था सभासद तसेच सामान्य लोकांकडुन ठेवी स्वीकारतात.
  • प्राथमिक पतसंस्थेचे सभासद तसेच सर्वसामान्य लोकांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक पतसंस्थेला जिल्हा सहकारी बॅक कर्ज पुरवठा करते.

प्राथमिक पतसंस्था सर्वसामान्य व्यक्तींकडुन सभासदांकडून ठेवी स्वीकारतात त्यांना कर्ज उपलब्ध करून देतात.

See also  आपले Financial Status एका वर्षात कसे बदलायचे? - Finance tips Marathi

प्राथमिक पतसंस्था ग्रामीण भागात ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी तालुकास्तरावर अत्यंत महत्वाची भुमिका पार पाडत असतात.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक –

  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ह्या जिल्हा पातळीवर कार्य करत असतात.प्रत्येक जिल्ह्यात एक मध्यवर्ती सहकारी बँक कार्यरत असते.
  • जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा उपलब्ध असतात.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या राज्य सहकारी बँक अणि प्राथमिक पतसंस्था अणि प्राथमिक पतसंस्था या दोघांमध्ये दुवा साधण्याचे काम करते.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक प्राथमिक पतसंस्था बॅकेला जो निधी उपलब्ध करून देते तो निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे राज्य सहकारी बँकेकडून दिला जातो.

राज्य सरकारी बॅकेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राथमिक पतसंस्था बॅकेवर लक्ष ठेवण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते.

राज्य सहकारी बँकेकडून देण्यात आलेल्या आदेशांचे नियमांचे अटींचे प्राथमिक पतसंस्था कडुन पालन केले जात आहे किंवा नाही हे बघण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते.

तसेच राज्य सहकारी बँकेकडून देण्यात आलेला निधी प्राथमिक पतसंस्थाना पुरवणे हे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते.

राज्य सहकारी बँक –

  • राज्य सहकारी बँकेला राज्य स्तरावरील सहकारी क्षेत्रातील सर्वोच्च तसेच शिखर बॅक मानली जाते.
  • राज्यातील सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्याकरिता राज्य सहकारी बँक खुप महत्वाची भुमिका पार पाडत असते.

राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अणि प्राथमिक पतसंस्था यांवर लक्ष ठेवण्याचे काम करत असतात.

२) औद्योगिक विकास बॅका –

औद्योगिक विकास बॅका ह्या औद्योगिक म्हणजेच उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी स्थापण करण्यात आले आहेत.

औद्योगिक बॅका देखील इतर बॅका प्रमाणे ठेवी स्वीकारणे अणि कर्ज देण्याचे काम करते.पण ह्या बॅक फक्त उद्योग व्यवसाय करीता दिर्घ तसेच मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात.

उदा, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ,आय एफसी आय बॅक

औद्योगिक विकास बॅका उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी विस्तार करण्यासाठी त्यांना दिर्घ तसेच मध्यम स्वरूपाचे कर्ज पुरवठा करतात.

याचसोबत सरकारी बंधपत्रे कर्जरोखे यांची खरेदी करणे, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांच्या समभागांची खरेदी करणे हे काम औद्योगिक विकास बॅका करत असतात.

३) विनिमय बॅक –

  • विनिमय बॅक वेगवेगळ्या देशातील चलनांच्या देवाणघेवाणीचे काम करत असतात.वेगवेगळया देशांचे चलन आपणास विनिमय बॅक दवारे उपलब्ध होत असते.
  • ज्या व्यक्तीला अमेरिकन डॉलर हवे आहेत अशी विनिमय बॅक मध्ये भारतीय चलन देऊन त्याबदल्यात अमेरिकन डॉलर प्राप्त करू शकते.
  • विनिमय बॅकेचे काम आयात निर्यात करणारया व्यापारींना परकीय देशाचे चलन उपलब्ध करून देणे आहे.
  • हया परदेशी व्यापार व्यवहारांना कर्ज उपलब्ध करून देत वित्तपुरवठा देखील करतात.
  • याचसोबत ह्या बॅका आयात निर्यात व्यापार व्यवहारांकरीता पथपत्र उपलब्ध करून देण्याचे अणि विनिमय बिलावर सुट देण्याचे काम देखील करतात.

एखाद्या व्यवहारात लाभांश व्याज अणि नफा प्राप्त झाला असल्यास संबंधित खाते धारकांच्या खात्यात तो लाभांश व्याज नफा विनिमय बॅक पाठवत असते.

See also  YoY (Year-Over-Year) म्हणजे काय ? YoY explained in Marathi

४) मध्यवर्ती बँक –

मध्यवर्ती बँक म्हणजेच केंद्रीय बॅक होय.हया बॅकेस देशातील सर्वात मोठी वित्तीय संस्था आहे.आरबीआय ही भारतातील मध्यवर्ती बँक आहे.

BANK COMPLETE INFORMATION IN MARATHI
BANK COMPLETE INFORMATION IN MARATHI

५) प्रादेशिक ग्रामीण बॅका –

प्रादेशिक ग्रामीण बॅका ग्रामीण भागातील ठेवी स्वीकारणे अणि शेतकरी मजदूर वर्ग यांना कर्ज उपलब्ध करून देतात.हया बॅकेची स्थापणा १९७५ मध्ये करण्यात आली होती.

६) बचत बॅका –

बचत बॅकेचे मुळ उद्देश म्हणजे लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणे त्यांना बचत करण्याची सवय लावणे होय.

७) व्यावसायिक बॅका –

व्यावसायिक बॅकेला व्यापारी तसेच वाणिज्य बॅका असे म्हटले जाते.देशाच्या विकासात ह्या बॅकेचे खुप अमुल्य योगदान आहे.

व्यावसायिक बॅकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात -परदेशी व्यावसायिक बॅक, सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रामधील व्यावसायिक बॅका.

बॅकेची महत्वाची कामे कोणकोणती आहेत?

१) लोकांकडुन ठेवी स्वीकारणे त्यावर त्यांना व्याज देणे –

बॅकेचे पहिले प्रमुख काम असते लोकांचे पैसे आपल्याकडे ठेवीच्या स्वरूपात जमा करणे अणि त्या जमा केलेल्या ठेवीवर पैशांवर त्यांना व्याज देणे.

२) लोकांच्या ठेवी परत करणे –

याचसोबत लोकांनी बॅकेत जो पैसा,ठेवी जमा केली आहे ती जेव्हा त्यांना गरजेला अडीअडचणीला हवी असेल तेव्हा ती ठेवीची रक्कम त्या़ंना वापस करणे हे देखील बॅकेचे काम असते.

३) अडीअडचणीला कर्ज उपलब्ध करुन देणे –

याचसोबत आपणास अडीअडचणीला कर्ज देऊन आपल्याला आर्थिक मदत करणे अणि बचत अणि गुंतवणूक करण्यास आपणास प्रोत्साहन देण्याचे काम देखील बॅक करीत असते.

बॅक ही वेगवेगळ्या उद्योग व्यवसाय ई काॅमर्स क्षेत्रांना देखील पैशांची आवश्यकता असल्यास बॅक कर्ज पुरवठा करते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर बॅक ही एक अशी वित्तीय संस्था आहे जी पैशाचे देवाणघेवाणीचे गुंतवणुकीचे व्यवहार करत असते.

४) रोख रक्कम तसेच बिले सांभाळणे –

बॅक आपल्या ग्राहकांकडुन आलेल्या रोख रक्कमा,चेक बिल हे देखील सांभाळण्याचे काम करते.

५) दोन व्यक्तींमधील देवाणघेवाणीचे व्यवहार –

दोन व्यक्तींमधील पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार देखील बॅकेलाच पार पाडावे लागत असतात.म्हणजे आपणास एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असेल तर ते आपण बॅकेच्या माध्यमातून पाठवू शकतो.

६) वित्तीय सेवा प्रदान करणे –

आपल्या ग्राहकांना आॅनलाईन पदधतीने पैशांची देवाणघेवाण करता यावी म्हणून बॅक त्यांना एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड,नेटबॅकिंग इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमातील आॅनलाईन सेवा सुविधा पुरवते.

बॅकेला फायदा कुठुन अणि कसा होतो?

बॅक ही लोकांनी बॅकेत जमा केलेल्या ठेवीच्या पैशांची वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक देखील करीत असते अणि त्याच गुंतवणूक केलेल्या पैशातुन नफा प्राप्त करत असते.

बॅकेकडुन आपल्याला जे काही अल्पकालीन, दीर्घकालीन इत्यादी कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यावर जे व्याज आकारले जाते ते व्याज बॅकेला प्राप्त होत असते.

See also  पैशांची बचत कशी करावी - How To Save Money In Marathi

म्हणुन बॅकेकडुन आपणास विविध उद्योग व्यवसायास जे कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्याला बॅकेची संपत्ती अॅसेट म्हटले जाते.अणि हेच कर्ज आपल्यासाठी लायबॅलिटी ठरत असते.

बॅकेची स्थापणा कधी अणि केव्हा झाली बॅकेचा इतिहास काय आहे?

  • रिझर्व बँक ऑफ इंडिया आरबीआय हया आपल्या भारत देशातील मध्यवर्ती बँकेची स्थापना १९३५ मध्ये सर्वप्रथम करण्यात आली होती.
  • ह्या बॅकेचे मुख्यालय महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात आहे.आरबीआय ही बॅक भारत देशातील सर्व बॅकावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.
  • याचसोबत आरबी आय चलन विषयक धोरण ठरवण्याचे अणि अर्थव्यवस्थेत आर्थिक समतोल सुरळीतपणे ठेवण्याचे काम करते.
  • भारत देशातील फार जुनी बॅक एसबीआयची निर्मिती ही बॅक ऑफ कोलकत्ता ह्या नावाने १८०६ मध्ये करण्यात आली होती.
  • आधुनिक बॅकेचे जनक अलेझांडर हेमिलटन यांच्या प्रयत्नांमुळे अमेरिका ह्या देशात पहिल्या मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली होती.

बॅक कोणकोणत्या प्रकारच्या ठेवी स्वीकारते?

१)मागणी ठेवी –

यात ग्राहकाला आपल्या मागणीनुसार आपल्या खात्यातील रक्कम काढता येत असते.

२) बचत ठेवी –

हया प्रकारच्या ठेवी नोकरदार व्यक्तींना बचत करण्याची सवय लागावी म्हणून बॅकेकडुन स्वीकारल्या जातात.

ज्या नोकरदार व्यक्तींचे उत्पन्न फार कमी अणि मर्यादित प्रमाणात असते असे व्यक्ती आपल्या पैशांची बचत करण्यासाठी बचत खाते सुरू करत असतात.

बचत ठेवीवर आपणास खुप कमी व्याजदर दिले जाते.हया ठेवीमधील रक्कम काढण्यासाठी आपणास काही अटी नियमांचे पालन करावे लागते.

३) चालू ठेवी –

चालु ठेवी वरील पैशांवर आपणास बॅकेकडुन कुठलेही व्याज दिले जात नाही.चालु ठेवी चालवण्याचे काम वेगवेगळ्या औद्योगिक शैक्षणिक,सार्वजनिक संस्था करतात.

चालु ठेवी मध्ये आपण पाहीजे तितक्या वेळा पैसे जमा करू शकतो किंवा काढु देखील शकतो.यात पैसे काढण्याच्या जमा करण्याच्या कुठल्याही मर्यादा आपल्यावर लादल्या जात नसतात.

४) मुदत ठेवी –

मुदत ठेवी मध्ये बॅक एका ठाराविक कालावधी करीता रक्कम स्वीकारत असते/तसेच यात आपणास एका ठाराविक कालावधी करीता रक्कम जमा करता येते.

मुदत ठेवी मध्ये पाच पेक्षा अधिक वर्षांकरिता ठेवी स्वीकारण्यात येतात.

बॅकेचे फायदे अणि तोटे कोणकोणते आहेत?

बॅकेचे फायदे –

बॅकेमुळे आपले पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार सुरळीत पणे पार पडतात.बॅकेत जमा केलेल्या पैशावर आपणास व्याज मिळते.

अडीअडचणीच्या काळात बॅक आपणास शिक्षणासाठी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी घर बांधण्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत असते.

बॅक आपल्याला क्रेडिट कार्डची डेबिट कार्ड एटीएम कार्डची नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देते म्हणजे खिशात पैसे नसताना देखील आपणास बॅकेकडुन पैसे उधार घेऊन खरेदी तसेच शाॅपिंग करता येते.

डेबिट कार्ड एटीएम कार्डचा उपयोग करून आपण कुठल्याही शहरात जिल्ह्यात असताना देखील आपल्या खात्यातून पैसे काढु शकतो.

बॅकेचे काही तोटे –

बॅकेकडुन घेतलेल्या कर्जावर आपणास काही व्याज देखील आकारले जाते.

बॅक दिवाळखोरीस आली तर आपले पैसे बुडण्याची शक्यता असते.

इंटरनेटवर आॅनलाईन ट्रानझॅक्शन इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या दवारे केल्या जात असलेल्या आॅनलाईन देवाणघेवाणी मध्ये दिवसेंदिवस फ्राॅड वाढत आहे ज्यामुळे आपले बॅक खाते देखील रिकामे होऊ शकते.