Derivatives market अणि Option trading म्हणजे काय?

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Derivatives market अणि Option trading म्हणजे काय?

ऑप्शन.ट्रेडिंग हा डेरिव्हेटिव्ह मार्केटचाच एक महत्वाचा भाग मानला जातो कारण आॅप्शन ट्रेडिंग डेरीव्हेटीव्ह मार्केटचाच एक भाग आहे.

ऑप्शन.हा एक करार असतो ज्याला लाॅट साईज अणि एक्सपायरी दिलेली असते.

डेरीव्हेटीव्ह मार्केट म्हणजे काय?

डेरीव्हीटीव्ह मार्केट मधील सर्व शेअर्स आधी इक्विटी मध्ये येत असतात.मग ते शेअर्स डेरीव्हीटीव्ह मार्केट मध्ये येतात.

म्हणजेच डेरीव्हेटीव्ह मार्केट इक्विटी मार्केट पासुन डिराईव्ह म्हणजे निर्माण झाले आहे असे देखील आपण म्हणू शकतो.

इक्विटी मार्केट मध्ये एखाद्या शेअर्सची किंमत कमी जास्त झाली तर डेरीव्हीटीव्ह मार्केट मधील शेअर्स वर देखील त्याचा परिणाम झालेला आपणास पाहावयास मिळत असतो.

इक्विटी मार्केट मधून डेरीव्हीटीव्ह मार्केट मध्ये येण्यासाठी शेअर्सला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.हया नियमांचे पालन केल्यास इक्विटी मार्केट मधून डेरीव्हीटीव्ह मार्केट मध्ये शेअर्स येत असतात.

यात शेअर्स निफ्टी मधील टाॅप ५०० पैकी असणे आवश्यक आहे.त्या शेअर्सच्या कंपनीचा टर्न ओव्हर पाचशे करोड असायला हवा.

Derivatives market अणि Option trading म्हणजे काय?
Derivatives market अणि Option trading म्हणजे काय?

डेरीव्हीटीव्ह मार्केट काॅनटॅ्क्ट बेसेस वर काम करत असल्याने इथून आपणास एक दोन शेअर्स खरेदी करता येत नाही.इथे ठरलेल्या लाॅट साईज प्रमाणे शेअर्सची खरेदी करावी लागते.

डेरीव्हीटीव्ह मार्केट मध्ये एक्सपायरी तारीख पर्यंत लाॅट विकण्यात आला नाही तर एक्सपायरी डेटच्या दिवशी त्याच किंमतीत तो लाॅट आपोआप विकला जातो.

यात प्रत्येक लाॅटच्या एक्सपायरी तीन प्रकारच्या असतात –

  • जवळपास महिना संपत असताना म्हणजे ज्या महिन्यात शेअर्सचा लाॅट विकत घेतला आहे त्या महिन्याचा शेवटचा गुरुवार याला near month expiry म्हटले जाते.
  • ज्या महिन्यात शेअर्सचा लाॅट विकत घेतला आहे त्या महिन्याच्या पुढच्या महिन्याचा शेवटचा गुरुवार याला middle month expiry म्हटले जाते.
  • ज्या महिन्यात शेअर्सचा लाॅट विकत घेतला आहे तो महिना अणि त्याच्या पुढचा महिना सोडुन पुढच्या महिन्याचा शेवटचा गुरुवार याला far month expiry म्हटले जाते.
See also  युपीआय पेमेंटच्या मर्यादेत आरबीआयने वाढवली मर्यादा - UPI Lite Transaction Limits increased

इक्विटी मार्केट अणि डेरीव्हीटीव्ह मार्केट मधील फरक –

  • इक्विटी मार्केट मधील सर्व शेअर डेरीव्हीटीव्ह मार्केट मध्ये नसतात पण डेरीव्हीटीव्ह मार्केट मधील सर्व शेअर्स इक्विटी मार्केट मध्ये असतात.
  • ऑप्शन.ट्रेडिंग मध्ये Lot size काय असते?एका वेळी आपणास किती लाॅट खरेदी करता येतात?
  • ऑप्शन.ट्रेडिंग मध्ये शेअर्स एक एक करून खरेदी न करता लाॅट साईज मध्ये खरेदी केले जातात.
  • लाॅट म्हणजे शेअर्सला विपुल प्रमाणात खरेदी करणे.डेरिव्हीटीव्ह मार्केट मध्ये प्रत्येक शेअर्सची लाॅट साईज ही ठरलेली असते.आपण एक लाॅट किंवा त्यापेक्षा अधिक लाॅट इथे खरेदी करू शकतो.

Expiry म्हणजे काय?

  • एक्सपायरी याचा अर्थ आॅप्शन काॅनटॅ्क्टची समाप्ती असा होत असतो.
  • एक्सपायरी ही एक विशिष्ट तारीख असते ज्या तारखेपर्यंत आपण घेतलेल्या शेअर्सचा लाॅट आपल्याजवळ ठेवू शकत असतो.
  • ऑप्शन. ट्रेडिंग मध्ये कंपनीच्या शेअर्सच्या लाॅटसची एक्सपायरी किमान एक महिना अणि कमाल तीन महिना इतक्या कालावधी करीता असते.
  • इंडेक्सच्या लाॅटची एक्सपायरी ही एक आठवडा तीन आठवडा पाच आठवडा ते तीन महिने इतक्या कालावधी करीता असते.
  • ऑप्शन. ट्रेडिंग मध्ये आपल्याला शेअर्सची पुर्ण किंमत भरावी लागत नाही इथे आपल्याला फक्त प्रिमियम भरणे आवश्यक असते.

ऑप्शन. मध्ये व्यवहार करत असताना सर्वप्रथम आपणास एक स्ट्राईक प्राईज निवडावी लागते.प्रत्येक स्ट्राईक प्राईज करीता एक विशिष्ट प्रिमियम भरायचा असतो.इथे लाॅट साईज प्रमाणे प्रिमियम भरून आॅप्शन वर काम करता येते.

ऑप्शनट्रेडिंग म्हणजे काय?

हे एक प्रकारचे काॅनटॅ्क्ट आहे ज्यात आपण कुठल्याही कंपनीचे स्टाॅक लाॅट मध्ये खरेदी करू शकतो.हे सर्व स्टाॅक एका फिक्स कालावधी करीता खरेदी करण्यात येत असतात.

इथे स्टाॅक होल्डर बल्क मध्ये शेअर्स लाॅट साईज मध्ये खरेदी करत असतो अणि हे शेअर्स त्याला एक्सपायरी डेटपर्यत जवळ ठेवता येतात मग एक्सपायरी डेट संपल्यावर स्टाॅक होल्डरला ते विकावे लागत असतात.

See also  फक्त दहा रुपये किंमत असलेल्या उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सला इलाॅन मस्कच्या नावामुळे मिळाला एक दिवसात २० टक्के इतका परतावा -Urja global share price

ऑप्शन.चे दोन प्रमुख प्रकार आहेत काॅल ऑप्शन.अणि पुट ऑप्शन..

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा