व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय? | 10 Best Video editing apps Marathi Information
व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर म्हणजे असे साधन ज्या द्वारे लोक किंवा व्यवसाय संस्था एकाद्या व्हिडिओ क्लिप मध्ये यशस्वीरीत्या, बदल, निर्माण, प्रक्रिया तसेच हवे ते फेरफार करू शकतात व त्या व्हिडिओ ला अधिक प्रभावी व आकर्षक बनवतात.
आजचे युग हे डिजीटल तसेच इंटरनेटचे युग आहे.आज सर्व जग मोबाईल इंटरनेटवर,सोशल मिडियावर चालते आहे.आज आपल्या आयुष्यातील कोणताही आनंदाचा महत्वाचा क्षण तसेच प्रसंग असो आपण तो इतरांसोबत शेअर करण्यासाठी आपण त्याचा व्हिडिओ तयार करत असतो आणि वेगवेगळया सोशल मिडिया प्लँटफाँर्मवर तो पोस्ट करत असतो.
पण आपल्यापैकी काही जण असेही असतात ज्यांना आपला बेस्ट फोटो,व्हिडिओच इतरांसोबत शेअर करायचा असतो.बाकी इतर आपल्याला नको असलेले व्हिडिओमधील काही पार्ट कट करण्याची तसेच एडिट करण्याची सवय असते.
अशाच आपल्या सोशल मिडिया अकाऊंटसाठी नियमित व्हिडिओ एडिटिंग करत असलेल्या प्रोफेशनल युटयुबर्स तसेच सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर साठी आपण काही बेस्ट व्हिडिओ एडिटिंग अँप कोणकोणत्या आहेत?हे आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत.
व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय ? Video editing apps Marathi Information
व्हिडिओ एडिटिंग म्हणजेच एखाद्या रेकाँर्ड केलेल्या व्हिडिओमधील एखादा नको असलेला भाग काढुन टाकणे आणि मग त्या व्हिडिओत आवश्यक ते बदल करून आपल्याला पाहिजे तोच पार्ट ठेवून आपला व्हिडिओ पुन्हा नवीन पदधतीने रिसेट करणे होय.
व्हिडिओ एडिटिंग कसे केले जाते? | How to edit videos in Marathi
आपण आपल्या युटयुब चँनल्ससाठी तसेच इतर सोशल मिडिया अकाऊंटसाठी जो व्हिडिओ बनवत असतो.त्यात आपण आधी एडिटिंग करत असतो.ज्यात व्हिडिओ मधील नको असलेला एखादा पार्ट तसेच सीन आपण कट देखील करत असतो.
यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेल्या विविध व्हिडिओ एडिटिंग साँपटवेअरचा,अँप्सचा वापर करत असतो.
अँड्राँईडसाठी टाँप 10 व्हिडिओ एडिटिंग अँप्स कोणकोणत्या आहेत? – Video editing apps Marathi Information
तसे पाहायला आज व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी एक अँप नसुन हजारो अँप्स उपलब्ध आहेत.आज आपण गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन व्हिडिओ एडिटिंग अँप्स असे टाईप केले तर अनेक अँप्स आपल्याला दिसुन येत असतात.
अशा वेळी व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणती अँप सर्वात बेस्ट आहे आणि आपण कोणत्या अँपचा वापर करणे आपल्यासाठी योग्य ठरेल हा प्रश्न आपल्याला पडत असतो.आणि आपण प्रत्येक अँप एक एक वेळा वापरून बघायचा विचार केला तर यात आपला वेळ आणि उर्जा दोघे विनाकारण खर्च होण्याची दाट शक्यता असते.
याचसाठी आम्ही आपल्यासाठी बेस्ट व्हिडिओ अँप्स कोणकोणत्या आहेत ज्याचा वापर आपण विनासंकोच करू शकतात हे आज आपणास सांगणार आहोत.
अँड्राँईडसाठी टाँप तसेच बेस्ट 10 व्हिडिओ एडिटिंग अँप्स पुढीलप्रमाणे आहेत : Video editing apps Marathi Information
1) फिल्मोरा गो
2) काईन मास्टर
3) पाँवर डायरेक्टर
4) क्वीक
5) व्हिव्हा व्हिडिओ
6) व्हिडिओ शो
7) अँडोब प्रिमियर क्लीप
8) फनीमेट
9) मुव्हीमेकर
10) मँजिस्टो व्हिडिओ एडिटर
1) फिल्मोरा गो :
फिल्मोरा गो ही एक खुप चांगली व्हिडिओ एडिटिंग अँप आहे.जिचा वापर करून आपण आपला व्हिडिओ प्रोफेशनल पदधतीने तयार करू शकतो.आणि सगळयात महत्वाची गोष्ट ह्या अँपला लाखो तसेच करोडो लोकांनी आपली पसंती दिली आहे.आणि ही अँप आत्तापर्यत करोडोंच्या संख्येत डाऊनलोड केली गेली आहे.
ह्या अँपमध्ये अनेक फिचर्स असलेले आपणास दिसुन येतात.यात बेसिक फिचरच नव्हे तर अँडव्हान्स लेव्हलचे फिचर समाविष्ट असलेले देखील आपणास दिसुन येते.
ह्या मुळे ह्या अँपचा वापर करून आपण आपला व्हिडिओ आपल्याला पाहिजे तशा पदधतीने एडिट करू शकतो.
ह्या अँपचे अजून एक महत्वाचे वैशिष्टय हे देखील आहे की यात आपल्याला हाय काँलिटीच्या व्हिडिओ इफेक्टचा वापर देखील करता येतो.
2) काईन मास्टर :
ईन मास्टर ही सुदधा व्हिडिओ एडिटिंगसाठी जास्तीत जास्त वापरली जाणारी एक महत्वाची आणि लोकप्रिय अँप आहे.आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या अँपचा यूझर इंटरफेस देखील खुप चांगला आहे.
काईन मास्टर ही व्हिडिओ एडिटिंग अँप अशा लोकांसाठी खुप उत्तम आहे.जे नवनवीन व्हिडिओ एडिटिंग करायला शिकत आहे.कारण ह्या अँपमध्ये नवीन व्यक्ती प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजू देखील शकते आणि एडिट देखील करू शकते.
म्हणुन नवीनच व्हिडिओ एडिटिंग करायला शिकत असलेल्या व्यक्ती काईन मास्टर अँपचा वापर करणे अधिक पसंद करतात.आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या अँपचा वापर करून आपण कमीत कमी कालावधीत कोणताही व्हिडिओ एडिट देखील करू शकतो.
ह्या अँपमध्ये बेसिक फिचर्ससोबत अनेक स्पेशल फिचर्स देखील समाविष्ट केले असलेले आपणास दिसुन येतात.
ह्या अँपमध्ये असलेले मल्टीलेअर फिचर्स युझ करून आपल्याला कोणत्याही व्हिडिओ तसेच टेक्सटला ओव्हरलँप देखील करता येते.
ह्या अँपमध्ये आपण व्हिडिओ कंट्रोल तर करतोच पण याचसोबत आँडिओ देखील यात आपण कंट्रोल करू शकतो.
3) पाँवर डायरेक्टर :
पाँवर डायरेक्टर ही एक तिसरी व्हिडिओ एडिटिंगसाठी बेस्ट अँप आहे.आणि पाहायला गेले तर ही अँप एकदम काईन मास्टर अँपसारखीच आहे.कारण ह्या अँपचे आणि काईन मास्टर अँपचे बहुतेक फिचर्स एकदम सारखे असलेले आपणास आढळुन येते.
इथे आपण काईन मास्टरप्रमाणेच कोणताही व्हिडिओ आपल्याला पाहिजे तशा प्रोफेशनल पदधतीने एडिट करू शकतो.
याचसोबत ह्या अँपमध्ये आपल्याला तीस ते पस्तीस थ्रीडी इफेक्ट देखील पाहायला मिळतात.ज्या लोकांना ह्या अँपचा वापर करायला व्यवस्थित जमत नाहीये असे लोक इथे दिलेले व्हिडिओ एडिटिंगचे टयुटोरिअल बघुन आपल्या पदधतीने हळु हळु देखील व्हिडिओ एडिटिंग करायला शिकु शकतात.
4) क्वीक :
ही सुदधा एक बेस्ट व्हिडिओ एडिटिंग अँप आहे.आणि ह्या अँपच्या क्वीक ह्या नावावरूनच तिचे वैशिष्टय लगेच कळुन जाते की ह्या अँपद्वारे आपण कोणताही व्हिडिओ आपल्याला पाहिजे तशा पदधतीने झटक्यात एडिट करू शकतो.
ह्या अँपचे एक महत्वाचे वैशिष्टय हे देखील आहे की इथे आपण जो व्हिडिओ एडिट करत असतो तो आपल्या मोबाईलमध्ये आँटो सेव्ह होऊन जात असतो.याचा फायदा असा की नंतर आपण तो फोटो आपल्या मोबाईलच्या गँलेरीमध्ये जाऊन पाहिजे तिथे शेअर करू शकतो.
5) व्हिव्हा व्हिडिओ :
व्हिव्हा व्हिडिओ हे देखील एक चांगले व्हिडिओ एडिटिंग अँप आहे जे आपण व्हिडिओ एडिट करण्यासाठी वापरू शकतो.
यामध्ये बेसिक फिचर तर उपलब्ध आहेतच सोबत काही प्रोफेशनल फिचर्स देखील यात अँड केलेले आहेत.
ह्या अँपवर आपण कोणताही व्हिडिओ एडिट करून त्याच्या प्रेंझेंटेशन स्लाईड देखील बनवु शकतो.
6) व्हिडिओ शो :
व्हिडिओ शो ही देखील एक चांगली व्हिडिओ एडिटींग अँप आहे जिचा वापर करून आपण आपले व्हिडिओ एडिट करू शकतो.आणि सगळयात महत्वाचे ही एक ट्रस्टेड अँप आहे कारण ह्याच अँपला अवार्ड देखील प्राप्त झालेला आपणास दिसुन येतो.
ह्या अँपचा वापर करून एखादा व्हिडिओ एडिट करू शकतो सोबत त्या व्हिडिओचा टाईम देखील रिडयुस करू शकतो.
आणि ह्या अँपचे सगळयात महत्वाचे वैशिष्टय हे आहे की इथे आपण लाइव्ह डबिंग आँडिओ देखील अँड करू शकतो ते देखील विनाशुल्क.
7) अँडोब प्रिमियर क्लीप :
व्हिडिओ बनवण्यासाठी तसेच तो एडिट करण्यासाठी अ़ँडोब प्रिमियर क्लीप हे एक उत्तम अँप आहे.ह्या अँपमध्ये एक आँटो व्हिडिओ मोड आँप्शन आहे जे सिलेक्ट केल्यानंतर ही अँप आपला व्हिडिओ बनवण्यास सुरूवात करत असते.आणि लगेच बनवुन देत सुदधा असते.
कमी वेळात ज्यांना बेस्ट व्हिडिओ तयार करायचा असेल अशा लोकांनी अँडोब प्रिमियर क्लीप ह्या अँपचा वापर करणे त्यांच्यासाठी अधिक सोयीस्कर ठरेल.
8) फनीमेट :
फनीमेट हे एक शार्ट व्हिडिओ तयार करायचे अँप आहे.ही अँप वापरून आपण कमी वेळात एक चांगला तसेच उत्तम व्हिडिओ तयार करू शकतो.ह्या अँपमध्ये शंभर पेक्षा अधिक व्हिडिओ एडिटिंग इफेक्टचा समावेश करण्यात आला आहे.फक्त ह्या अँपचा वापर करण्यासाठी आधी आपल्याला साईन अप करावे लागत असते.
9) मुव्हीमेकर :
इतर व्हिडिओ एडिटिंग अँपप्रमाणेच ही देखील एक चांगली व्हिडिओ एडिटिंग अँप आहे.ह्या अँपमध्ये काही बेसिक तसेच प्रोफेशनल टुल देखील व्हिडिओ तयार करण्यासाठी दिलेले आहेत.ह्या अँपचा वापर आपण एखादा शार्ट व्हिडिओ एडिट करण्यासाठी केला तर आपल्यासाठी खुप जास्त फायदेशीर ठरेल.
10) मँजिस्टो व्हिडिओ एडिटर :
ह्या अँपचा वापर अशा लोकांनी करणे अधिक फायदेशीर ठरेल ज्यांना व्हिडिओ एडिटिंगचा कोणताही अनुभव नाहीये आणि ते ही अँप व्हिडिओ एडिटिंग सुरूवातीपासुन शिकण्यासाठी युझ करणार आहेत.
ह्या अँपमध्ये इतर अँपमध्ये जे फिचर पेड मध्ये दिले जातात ते विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
व्हिडिओ एडिटिंग विषयी वारंवार विचारले जाणारे काही अत्यंत महत्वाचे प्रश्न – Video Editing Software Frequently Asked Questions
- व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय? What is Video Editing ?
व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर म्हणजे असे साधन ज्या द्वारे लोक किंवा व्यवसाय संस्था एकाद्या व्हिडिओ क्लिप मध्ये यशस्वीरीत्या, बदल, निर्माण, प्रक्रिया तसेच हवे ते फेरफार करू शकतात व त्या व्हिडिओ ला अधिक प्रभावी व आकर्षक बनवतात.
यात काही भाग add केले जातात तसेच काढून टाकले जातात. व्हिडिओ निर्माण क्षेत्रतल्या कंपन्याना एक चांगल्या व्हिडिओ एडिटर द्वारे अतिशय प्रभावशाली व्हिडिओ तयार करू शकतात.
- युट्युबर्स कोणते व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर टूल्स वापरतात? -which Video Editing YouTube’s prefer ?
Adob इफेक्ट व इ मुव्ही
शॉर्ट कट
फ्री मेक
- या क्षेत्रात येणाऱ्या नवीन लोकांना करता वापरायला सोपं व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर कोणते? Which is best Video Editing for new coming people
ओपन शॉट , लाईट वर्क
लुमेन 5 व ब्लेंडर
- कॉम्प्युटर वर वापरायला सोपे कोणते व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहे? Which is best free Video Editing easy to use on computer
ओपन शॉट
लाईट वर्क्स
- असे कोणते मोफत उपलब्ध असणारे व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहे ज्यात वॉटरमार्क नसेल? वॉटर मार्क्स काढता येतो का? -Can I remove watermark?
होय , वॉटर मार्क्स काढता येतो
VSDC, ओपन शॉट
DA व्हीनसी Resolve
- Which are more Video Editing software online ?
व्हिडीओ सॉफ्टवेअर तसेच apps माहिती -here is list for your reference
1) ActionDirector
2) Adobe Premiere Rush
3) ALIVE Movie Maker
4) Anchor Videos
5) Apple Clips
6) Blender
7) Boomerang
8) DaVinci Resolve
9) Filmmaker Pro
10) FilmoraGo
11) HitFilm Express
12) Horizon
13) Hyperlapse
14) iMovie
15) InShot
16) KineMaster
17) Lightworks
18) LumaFusion
19) Magisto
20) Movie Maker 10
21) OpenShot
22) PicPlayPost
23) PowerDirector
24) Quik
25) Shotcut
26) Splice
27) VideoPad
28) Videoshop
29) VideoShow
30) VidLab
31) VivaVideo
32) VSDC Free Video Editor
33) WeVideo