डाॅ आनंदीबाई जोशी कोण होत्या? – birthday of India’s first female doctor “Anandi Gopal Joshi

डाॅ आनंदीबाई जोशी कोण होत्या?

आज आनंदीबाई जोशी यांची जयंती आहे.आजच्या प्रत्येक महिला वर्गाकरीता एक आदर्श उदाहरण आनंदीबाई जोशी आहे.

आजच्या प्रत्येक महिलेने ज्यांच्या पासुन प्रेरणा घ्यायला हवी अशी एक कर्तृत्ववान महिला आनंदीबाई जोशी होत्या.

आनंदीबाई जोशी ह्या आपल्या भारत देशातील डाॅक्टरेट पदवी प्राप्त केलेल्या प्रथम भारतीय महिला होत्या.

ज्या काळात महिलांच्या शिक्षणाला विरोध दर्शविला जायचा मुलींना जास्त शिकू दिले जायचे नाही अशा कालावधीत परदेशात जाऊन डाॅक्टरेट डिग्री आनंदीबाई यांनी प्राप्त केली होती.

त्याकाळी खुप कमी वयातच मुलींचे लग्न केले जायचे म्हणुन वयाच्या नवव्या वर्षीच आनंदीबाई यांचा विवाह गोपाळराव यांच्या सोबत झाला.गोपाळराव हे आनंदीबाई यांच्या पेक्षा २० वर्षाने मोठे होते.

खुप कमी वयात म्हणजे फक्त १४ वर्षाच्या असताना त्या आई देखील झाल्या.पण त्यांचे मुल अवघ्या दहा दिवसातच मरण पावले.आनंदीबाई यांच्या मुलाचा आजाराने अकाली मृत्यू झाला होता.

यानंतर आपला पुत्र गमावलेल्या आनंदीबाई जोशी यांनी शपथ घेतली की मी एक दिवस डाॅक्टर होणार भारतात होत असलेल्या ह्या अकाली मृत्यूंना थांबवणार रोखणार.

आनंदीबाई यांच्या निर्णयामध्ये त्यांचे पती गोपाळराव जोशी यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला.डाॅक्टर बनविण्यासाठी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले.

गोपाळराव यांनी आनंदीबाई यांना डाॅक्टर बनविण्यासाठी कशा पद्धतीने प्रोत्साहन दिले होते यावर आतापर्यंत अनेक कथा,कादंबरी,लेख, ग्रंथ,नाटक इत्यादी साहित्य कृती देखील प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

आनंदीबाई जोशी यांचा जन्म कधी अणि कोठे झाला?

आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी कल्याण येथे झाला होता.

आनंदीबाई जोशी यांचा मृत्यू कधी झाला?

आनंदीबाई जोशी यांचा २६ फेब्रुवारी १८८७ मध्ये मृत्यू झाला होता.फक्त २१ ते २२ वर्षाच्या असताना त्या मरण पावल्या.म्हणजेच खुप कमी आयुष्य आनंदीबाई यांना लाभले होते.क्षयरोगामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते.

आनंदीबाई जोशी यांचे शिक्षण –

See also  हिट स्ट्रोक म्हणजे काय? हिट स्ट्रोक का होतो? - उष्माघात -Heat stroke what is it ?

आनंदीबाई जोशी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील डाॅक्टर doctor of medicine (MD)ही पदवी प्राप्त केली होती.

स्त्री शिक्षणाला विरोध केला जाणारया काळात आनंदीबाई परदेशात गेल्या तिथे उच्च शिक्षण प्राप्त करून वैद्यकीय डिग्री प्राप्त केली.ह्यामुळे त्यांना लोकांनी प्रथम भारतीय महिला डॉक्टर अशी पदवी बहाल केली होती.

वैद्यकीय शिक्षण घेताना आनंदीबाई यांना खुप अडीअडचणींना सामोरे जावे लागले होते तरी आनंदीबाई डगमगल्या नाहीत.

कारण आनंदीबाईच्या काळात स्त्री शिक्षणाला विरोध केला जायचा स्त्रीचे अस्तित्व फक्त चुल आणि मुल सांभाळणे इतकेच सीमीत ठेवण्यात आले होते.स्त्रियांना घराबाहेर पडायला परवानगी नसायची.डोक्यावर पदर ठेवायचा अणि मान खाली ठेवून राहायचे असे जीवन महिलांचे होते.

अशा काळात आनंदीबाई यांनी उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला डोक्यावरचा पदर खाली पाडुन मान वर करून चालायचे ठरवले.म्हणून समाजातील लोकांनी त्यांना खुप विरोध केला.सुरुवातीला खुप त्रास देखील देण्यात आला होता.

समाजाचा एवढा प्रचंड विरोध होता तरी देखील आनंदीबाई यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण प्राप्त केले अणि डाॅक्टर बनण्याचे आपले स्वप्न पुर्ण केले.

स्त्रियांना देखील पुरूषांप्रमाणे उच्च शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार आहे.स्त्रियांनी पुरूषांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर बनायला हवे हे त्यांनी समाजातील इतर महिलांनाही पटवून दिले.

गोपाळराव यांनी देखील आनंदीबाई यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण प्राप्त करता यावे म्हणून पैशांची जमवाजमव करण्यासाठी दिवसरात्र कष्ट केले.त्यांना परदेशात शिक्षणाला पाठविले.त्यांच्या ह्या शैक्षणिक वाटचाली मध्ये संघर्षात नेहमी त्यांची साथ दिली.त्यांना प्रोत्साहित केले.

आनंदीबाई जोशी अणि गोपाळराव जोशी हे एक आदर्श दांपत्य होते.

आनंदीबाई जोशी यांच्या वडिलांचे नाव काय होते?

आनंदीबाई जोशी यांच्या वडिलांचे नाव गणपतराव अमृतेश्वर जोशी असे होते.