ईपीएफओ मध्ये आजारपणासाठी आगाऊ रक्कम ?how to claim for advance for illness in EPFO in Marathi
ईपीएफओ सभासदांना स्वताच्या अणि आपल्या कुटुंबातील इतर सभासदांच्या आजारपणासाठी परत न करण्यायोग्य आगाऊ रक्कमेचा लाभ घेता येत असतो.
पण ह्या रक्कमेवर दावा करण्यासाठी काही नियम तसेच अटी ठेवण्यात आल्या आहेत आजच्या लेखात आपण हेच नियम अटी जाणुन घेणार आहोत.
आजारपणासाठी आगाऊ रक्कम म्हणजे काय? advance for illness meaning in Marathi
समजा ईपीएफओ सबस्क्राईबरच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी आहे ती व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त आहे ज्यात त्याची पत्नी मुलमुली कोणीही असु शकते.
अशावेळी ह्या संकटाच्या काळासाठी ईपीएफओने आपल्या सभासदांना एक महत्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे जी सुविधा आहे आजारपणाच्या स्थितीत आगाऊ रक्कम प्राप्त करण्याची सुविधा.यालाच आपण इंग्रजी मध्ये advance for illness असे देखील म्हणत असतो.
Illness advance अंतर्गत ईपीएफओ सभासदांना स्वताला किंवा आपल्या कुटुंबातील इतर सभासदांना एक महिन्यासाठी किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी दवाखान्यात विविध गंभीर आजारांवरील उपचारासाठी भरती करता येते.
यात मोठमोठे शस्त्रक्रिया,टिबी, कॅन्सर,विकलांगता, कुठलाही मानसिक आजार तसेच समस्या किंवा हदयाशी संबंधित कुठलाही आजार इत्यादी आजार असल्यास ईपीएफओ सभासदांना आजारपणासाठी आगाऊ रक्कमेचा लाभ घेता येत असतो.
ईपीएफओ सभासदांना आजारपणासाठी किती आगाऊ रक्कम दिली जाते?
ईपीएफओ सभासदांना दिली जात असलेली आजारपणाची रक्कम सहा महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता आणि व्याजासह PPF खात्यातील कर्मचार्याच्या योगदानाच्या समान रकमेपेक्षा जे कमी असेल तितकी दिली जाते.
अणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे आजारपणासाठी दिले जाणारे आगाऊ रक्कमेचे पैसे ईपीएफओ कर्मचारींना परत देखील करण्याची आवश्यकता नसते.
आजारपणासाठी आगाऊ रक्कम प्राप्त करण्यासाठी काय करायचे? कशापदधतीने अर्ज करायचा असतो?
- ईपीएफओ सभासदांना हे illness advance प्राप्त करण्यासाठी फाॅम ३१ भरायचा असतो.याच्यासोबत ईपीएफओ सभासदांना कुठलेही प्रमाणपत्र जोडण्याची देखील आवश्यकता नसते.
- यासाठी ईपीएफओ सभासदांना ईपीएफओ वेबसाईटवर जायचे आहे अणि मेंबर पोर्टलवर लाॅग इन करून हा फाॅम ३१ आॅनलाईन पदधतीने भरायचा आहे. -https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
- ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपण उमंग अॅपचा वापर देखील करू शकणार आहे.यासाठी आपणास आपल्या अॅड्राॅईड मोबाईल मध्ये उमंग अॅप डाऊनलोड अणि इंस्टाॅल करून घ्यायचे आहे.
- यानंतर आपणास अॅपमध्ये जाऊन फाॅम ३१ भरायचा आहे अणि illness advance साठी अर्ज करायचा आहे.
- फाॅम भरताना आपणास UAN म्हणजे universal account number टाकायचा आहे अणि खाली दिलेल्या get OTP पर्यायावर ओके करायचे आहे.
- यानंतर आपणास आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठविला जातो हा ओटीपी आपणास इंटर करून घ्यायचा आहे.अणि खाली दिलेल्या सबमीट बटणावर ओके करायचे आहे.
- यानंतर आपणास आपल्या खात्याची माहिती म्हणजे member details दिसुन येईल जसे की employee name,dob, Father name, mobile number etc
- यात खाली kyc details मध्ये जाऊन आपणास आपली bank details म्हणजे बॅक अकाऊंट नंबर टाकायचा आहे.
बॅक डिटेल मध्ये आपणास आपला आधार नंबर,आय एफसी कोड बॅकेचे नाव अणि पत्ता हे देखील स्क्रीनवर दिसुन येईल. - यानंतर आपणास next बटणावर क्लिक करायचे आहे अणि आपली आधार कार्ड डिटेल भरायची आहे.यात आपल्या आधार कार्ड मध्ये जो पत्ता दिला आहे तो टाकायचा आहे.
- यानंतर आपणास claim form चा पर्याय निवडायचा आहे.ज्यात आपणास फाॅम ३१ सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
- अणि आगाऊ रक्कम घेण्याचे कारण मध्ये illness सिलेक्ट करून घ्यायचे आहे.
- आजारपणाच्या आवश्यकता नुसार आपणास जेवढी advance रक्कम हवी आहे ती amount मध्ये भरायची आहे.
- यानंतर आपल्या बॅकेच्या चेकची प्रत ज्यावर आपले नाव अणि आय एफसी कोड असेल ती अपलोड करायची आहे.अणि खाली दिलेल्या सबमीट बटणावर ओके करायचे आहे.
महत्वाच्या टिप्स –
- फाॅम भरताना सर्व सेक्शन मधील विचारलेली माहीती व्यवस्थित अचुकरीत्या भरायची आहे.
- सदस्यांदवारे स्वयंघोषणापत्र असणे आवश्यक आहे