बाँक्सिंग डे महत्त्व अणि इतिहास – Boxing Day history and importance in Marathi
बाँक्सिंग डे म्हणजे काय?Boxing Day meaning in Marathi
बाँक्सिंग डे हा एक बाजारातुन खरेदी करण्यासाठी सुट्टीचा दिवस म्हणुन प्रचलित दिवस आहे.हा इंग्रजी कँलेंडरमधील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.
या दिवशी श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तींना बाँक्स मध्ये पँक करून गिफ्ट तसेच भेटवस्तू देत असतात.
बाँक्सिंग डे कधी अणि केव्हा साजरा केला जात असतो?
बाँक्सिंग डे हा दिवस दरवर्षी ख्रिसमसच्या दुसरया दिवशी येत असतो.
बाँक्सिंग डे हा दिवस २०२२ मध्ये कधी साजरा केला जाईल?
बाँक्सिंग डे हा दिवस ह्यावर्षी 26 डिसेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.
बाँक्सिंग डे चे महत्त्व काय आहे?
बाँक्सिंग डे च्या दिवशी जे काही गरजु किंवा गरीब व्यक्ती असतात त्यांना भेटवस्तू किंवा पैसे दिले जात असतात.
बाँक्सिंग डेचा इतिहास काय आहे?
बाँक्सिंग नाव ऐकताच आपल्याला असे वाटेल की हा बाँक्सिंग खेळ संबंधित एखादा महत्वाचा दिवस आहे पण तसे काहीही नाहीये.
ख्रिसमसच्या दुसरया दिवशी बाँक्सिंग डे म्हणजेच हाँली डे साजरा करणे ही प्रथा ब्रिटिशांनी सर्वप्रथम सुरु केली अणि मग पुढे जाऊन ह्या प्रथेचा इतर देशात देखील स्वीकार करण्यात आला.
सर्व देशात ह्या प्रथेला अंगीकारले जात आहे हे बघुन ह्या दिवसाला जशी बँक किंवा सरकारी कार्यालयाला सार्वजनिक सुटटी दिली जाते एकदम त्याचप्रमाणे पब्लिक हाँली डे प्रमाणे सार्वजनिक मान्यता देण्यात आली.
बाँक्सिंग डे जगभरात कुठे कुठे साजरा केला जात असतो?
ख्रिसमस संपल्यानंतर युके,कँनडा,न्युझीलँड,स्काँटलँड,आँस्ट्रेलिया अशा विविध देशांमध्ये बाँक्सिंग डे मोठया आनंद आणि उत्साहात साजरा केला जात असतो.
बाँक्सिंग डे दरवर्षी कसा साजरा केला जात असतो?
बाँक्सिंग डे ला दरवर्षी गरजु तसेच गरीब व्यक्तींना काहीतरी कपडे खाण्याचे पदार्थ,पैसे भेटवस्तू इत्यादी वगैरे दान केले जाते.
कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ व्यतीत केला जातो बाजारातुन नवनवीन वस्तुंची शाँपिंग खरेदी केली जाते.
युके सारख्या देशात ह्या दिवशी खरेदी विक्रीचे प्रमाण अधिक वाढलेले दिसुन येते.ह्या दिवशी युके मधील लोक फुटबॉल मँच बघत असतात.
आयलँडमध्ये बाँक्सिंग डे ला अजुन कोणत्या नावाने ओळखले जाते?
आयलँड ह्या देशात बाँक्सिंग डे ला सेंट स्टीफन डे ह्या नावाने देखील ओळखले जाते.