WWE champion,superstar ब्रे व्हाईट याचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
क्रिडा विश्वासाठी अत्यंत दुखद बातमी आहे डबलयु डबलयु ई चॅम्पियन तसेच सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रे व्हाईट याचे अवघ्या वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाले आहे.
असे सांगितले जात आहे की ब्रे व्हाईट याचा मृत्यू गुरूवारी त्याला अचानक आलेल्या हदयविकाराच्या एका तीव्र झटक्याने झाले आहे.
ब्रे व्हाईट याचा मृत्यू झाल्याची घोषणा सोशल मिडिया वर पाॅल ट्रीपल एच लेवेस्क ह्या डबलयू डबलयु ई आॅफिसरने दिली होती.
डबलयु डबलयु ई जगता मध्ये ब्रे व्हाईट ह्या नावाने आपणा सर्वांना परिचत असलेल्या ह्या सुपरस्टारचे खरे नाव विटहॅम रोटुंडा असे होते.
विंडहॅम रोटुंडा हा ब्रे व्हाईट ह्या नावाने डबलयु डबलयु ई मध्ये फाईट करण्यासोबत फिंड ह्या नावाने कुस्ती देखील खेळत असे.
मागील काही महिन्यांपासून आरोग्यविषयक गंभीर आजार तसेच समस्येमुळे त्याने डबलयु डबलयु ई च्या खेळातील रिंगणापासून अंतर ठेवले होते.
त्याला नेमका काय आजार होता कोणती आरोग्य विषयक समस्या होती याबाबद अद्यापही कुठलेही स्पष्टीकरण प्राप्त झाले नाहीये.
रिपोर्ट नुसार असे सांगितले जात होते की ब्रे व्हाईट लवकरच डबलयु डबलयु ई च्या रिंगणात पुनरागमन करेल.
पण त्याआधीच त्याने कायमचाच ह्या जगाचा निरोप घेतला आहे.
ट्रीपल एचने टविट करत सांगितले आहे की माईक रोटुंडा ज्यांना डबलयु डबलयु ई हाॅल आॅफ फेमर म्हणून ओळखले जाते त्यांनी ही दुःखद बातमी त्यांना कळवली आहे.
टविट करताना ट्रीपल एच म्हणाला की आमच्या डबलयु डबलयु ई कुटुंबातील लाईफटाईम मेंबर डबलयु डबलयु ई चॅम्पियन ब्रे व्हाईट याचे निधन झाले आहे.
ब्रे व्हाईटने प्राप्त केलेले यश –
ब्रे व्हाईटने आतापर्यंत तीन वेळा डबलयु डबलयु ई मध्ये विश्व चॅम्पियन ठरला आहे.याचसोबत त्याने दोन वेळा युनिव्हर्सल चॅम्पियन शीप जिंकण्यात यश प्राप्त केले होते.याचसोबत त्याने एकदा डबलयु डबलयु ई चॅम्पियन शीप सुद्धा जिंकली होती.
एकदा त्याने मॅक हारडी समवेत डबलयु डबलयु ई राॅ टॅग टिम चॅम्पियन शीप देखील जिंकली होती.
विंड हॅम रोटुंडा हा त्याच्या कुटुंबातील तिसरया पिढीमधील पहिलवान होता.विंड हॅम रोटुंडा २००९ पासून
डब्ल्यू डब्ल्यू ई शी जोडला गेला होता.
डबलयु डबलयु ई काय आहे?
डबलयु डबलयु ई चा फुलफाॅम world wrestling entertainment असा होतो.याला मराठी मध्ये विश्व कुस्ती मनोरंजन असे देखील म्हटले जाते.
वेगवेगळ्या देशातील प्रोफेशनल रेसलर डबलयु डबलयु ई च्या रिंगणात एकमेकांविरूदध कुस्ती लढण्याचे काम करतात.