पोस्ट ऑफिस ची ही स्कीम देत आहे १० वर्षाच्या गुंतवणूकीवर पाच वर्षांत १४ लाख ४९ हजार -NSC scheme interest rate in Marathi
जे व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये सुरक्षित अणि खात्रीशीर गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहे.अशा सर्वांसाठी गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र national saving certificate ही पोस्ट ऑफिसची एक उत्तम स्कीम आहे.
ही पोस्ट ऑफिसची एक अल्पबचत योजना आहे ज्यात गुंतवणुकीची कुठलीही कमाल मर्यादा ठेवण्यात आली नाहीये.
यात आपणास वेगवेगळ्या प्रकारची खाती उघडता येतात.एवढेच नव्हे तर आपणास कर सवलत देखील प्रदान केली जाते.
पोस्ट आॅफिस मधील ह्या स्कीमचा मॅच्युरिटी पिरीअड पाच वर्षे इतका आहे.यात गुंतवणूक दारांना वर्षाला ७.७ टक्के पर्यंत व्याज दिले जाते.
यात गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याज देण्यात येत असते.पण यातुन गुंतवणूकदारांना आंशिक पैसे काढता येत नसतात.यात मॅच्युरिटी पिरीअड संपल्यावरच गुंतवणूक दारांना पैसे प्राप्त होतात.
पोस्ट ऑफिसआपल्या वेबसाईटवर सांगितल्या नुसार राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत हजार रूपयांची गुंतवणूक केल्यावर पाच वर्षा नंतर आपणास एक हजार चारशे एकोणपन्नास रूपये दिले जातात.
पोस्ट आॅफिसच्या ह्या योजनेत जर आपण दहा लाख रूपयांची एकरकमी गुंतवणूक केली तर पाच वर्षे झाल्यानंतर मॅच्युरिटी झाल्यावर आपणास १४,४९,०३९ इतके रूपये प्राप्त होतील.
अणि यातील ४,४९,०३४ रूपये फक्त आपणास व्याजावर प्राप्त होत असतात.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र मध्ये गुंतवणूक कशी करायची?
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ह्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना आपल्या शहरातील तसेच भारत देशातील कुठल्याही एका पोस्ट आॅफिस च्या शाखेमध्ये तसेच बॅकेमध्ये जायचे आहे.अणि खाते उघडुन घ्यायचे आहे.
देशातील कुठल्याही नागरिकाला हे खाते उघडता येते.यात आपणास संयुक्त खात्याची सुविधा देखील प्रदान करण्यात आली आहे.
शासन दर तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत याचे व्याजदर निश्चित करण्याचे काम करते.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ह्या स्कीम मध्ये आपले खाते उघडण्यासाठी आपल्याला फक्त हजार रुपये लागतील.यापेक्षा अधिक पैसे इथे आपणास गुंतवता येतात कारण इथे कमाल गुंतवणुकीची कुठलीही मर्यादा लादण्यात आली नाहीये.
ही पोस्ट ऑफिस स्कीम असल्याने ह्या गुंतवणुकीवर चांगला अणि सुरक्षित परतावा मिळेल अशी शासनाची हमी देखील आपणास प्राप्त होते.
ह्या योजनेत सर्व जमा रक्कम अणि व्याज मॅच्युरिटी झाल्यावर आपणास दिले जाते.
१ एप्रिल २०२३ पासुन पोस्ट आॅफिसने अनेक अल्प बचत योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे.ज्यात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देखील समाविष्ट आहे.
आधी ह्या योजनेत ७ टक्के व्याज दिले जात होते.पण यात वाढ करण्यात आली असून ७.७ टक्के इतके व्याज आता यात दिले जाते आहे.
ही सरकारची फायदेशीर अल्पबचत योजना असल्याने यात आपणास सुरक्षिततेसह खात्रीशीर परताव्याची हमी देखील प्राप्त होत असते.