आता डेबिट कार्ड विना देखील एटीएममधून पैसे काढता येणार ह्या बॅकेने सुरू केली ही सुविधा-
Interoperable Cardless Cash Withdrawal (ICCW) facility using UPI at ATM is launched by BoB, making it 1st PSB in India.
बॅक ऑफ बडोदा मध्ये आपले खाते असलेल्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे.
आता बॅक ऑफ बडोदाने आपल्या खातेधारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.
ह्या नवीन सुविधेमुळे बॅक ऑफ बडोदा मध्ये खाते असलेल्या व्यक्तींना एटीएम मधून युपीआय अॅप दवारे पैसे काढता येणार आहे.
सदर सुविधा बॅक आॅफ बडोदाने विशेषकरून आपल्या खातेधारकांसाठी सुरू केली आहे.
बॅक ऑफ बडोदा ही सार्वजनिक क्षेत्रातील प्रथम बॅक आहे जिच्यादवारे खातेधारकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
बॅक ऑफ बडोदा मध्ये खाते असलेल्या खातेधारकांना आयसी सीडबल्यु ह्या सुविधेचा वापर करून आता कुठल्याही पेमेंट अॅप दवारे एटीएम मधून पैसे काढता येणार आहेत.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बॅक आॅफ बडोदाने सुरू केलेल्या ह्या सुविधेचा लाभ बॅक ऑफ बडोदा मध्ये खाते असलेल्या खातेधारकांव्यतीरीक्त इतर बॅक खाते धारकांना देखील घेता येणार आहे.
एटीएम मधून युपीआय दवारे पैसे कसे काढायचे?
- बॅक ऑफ बडोदाच्या एटीएम मधून युपीआय दवारे पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम खातेधारकांना बॅक ऑफ बडोदाच्या एटीएम मध्ये युपीआय कॅश विद ड्राॅल हा पर्याय निवडायचा आहे.
- यानंतर एटीएमच्या स्क्रीनवर आपणास एक क्युआर कोड दिसुन येईल.हा क्यु आर कोड आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे.
- यानंतर आपणास एक पिन इंटर करायचा आहे अणि मग आपल्याला किती रक्कम एटीएम मधून काढायची आहे ते टाकावे लागेल.
- बॅक ऑफ बडोदाचे मुख्य डिजीटल अधिकारी आखिल हांडा यांचे असे म्हणने आहे की आय सी सीडबलयु ह्या सुविधेचा वापर करून बॅक खाते धारकांना डेबिट कार्डचा वापर न करता एटीएममधून पैसे काढता येईल.
- यात एका दिवसात खातेधारकांना दोन वेळा ट्रानझॅक्शन करता येईल.म्हणजे संपूर्ण दिवसभरात ग्राहक फक्त दोनवेळा ह्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील.
- बॅक खातेधारकांना एका वेळी पाच हजार रुपये पेक्षा अधिक पैसे विद ड्राॅल करता येणार आहे.
- बॅक ऑफ बडोदाचे भारतात सुमारे ११ हजार पेक्षा अधिक एटीएम मशीन आहेत.हया एटीएम्स दवारे बॅक ऑफ बडोदा मधील खातेधारकांना अणि इतर बॅकेतील खातेधारकांना देखील युपीआय अॅप दवारे आता पैसे काढता येणार आहे.