भारत बनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश
सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे भारताचे चंद्रयान ३ ही ऐतिहासिक मोहीम अखेरीस यशस्वीपणे पार पडली आहे.नुकतेच चंद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर साॅफ्ट लॅडिंग केली आहे.
चंद्रावर स्वारी करणारा भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे.याआधी अमेरिका चीन सारखे देशांनी देखील चंद्रावर आपले यान पाठवले होते.
पण हे यान विषुववृत्तीय ध्रुवावर पाठवण्यात आले होते.दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवण्यात अद्याप कुठलाही देश यशस्वी झालेला नव्हता.
पण भारताने दक्षिण ध्रुवावर आपले चंद्रयान ३ हे यान आज २३ आॅगस्ट रोजी अलगदपणे उतरवून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकणारा पहिला देश बनण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
भारताच्या अगोदर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी रशियाने आपले यान लुना २५ पाठवले होते पण ते क्रॅश झाल्याने रशियाला हा इतिहास रचण्यात अपयश आले होते.
आजचा दिवस भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी खुप महत्वाचा दिवस आहे.कारण आज अखेरीस चंद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यश प्राप्त केले.
इस्रोच्या शास्त्रज्ञांकडुन असे म्हटले जात होते की चंद्रयान ३ ला चंद्रावर लॅड करण्यासाठी पोषक वातावरण नाही मिळाले तर चंद्रयान ३ चे लॅडिग पुढे ढकलण्यात येऊ शकते
पण चंद्रावरील घटकांची अनुकुलता लक्षात घेता आजच सायंकाळी ६ वाजुन ४ मिनिटांनी चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय तसेच संपूर्ण जग ह्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते अखेरीस हा क्षण आला.
आज चंद्रयान ३ ह्या मिशनच्या यशस्वी होण्यात भारतातील अंतराळ संशोधन संस्था अणि त्यातील अधिकारी वर्गाच्या पथकाचा सिंहाचा वाटा आहे.
संध्याकाळी पाच वाजुन ३४ मिनिटांनी लॅडर माॅडयुलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पाडण्यात भारताला यश केले.
नंतर पाच वाजुन ४४ मिनिट झाल्यावर इस्रोच्या मिशन कंट्रोल कडुन लॅडर माॅडयुलला पावर डिसेंटची कमांड देण्यात आली.
मग लॅडर माॅडयुलने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रियेस प्रारंभ केला.यानंतर चार टप्प्यांत ही प्रोसेस पार पाडण्यात आली.यातील पहिला टप्पा रफ ब्रेकिंग फेज हा होता.
५ वाजुन ५६ मिनिट झाल्यावर लॅडर माॅडयुलचे रफ ब्रेकिंग फेज यशस्वीपणे पार पडली.यानंतर अलटी टयुड होल्डिंग्स फेजला आरंभ करण्यात आला.
यात विक्रम लॅडरला चंद्रापासुन ७.५ किलोमीटर इतक्या अंतरावर खाली आणण्यात आले अणि ६.८ इतक्या उंचीवर नेण्यात आले होते.हया टप्प्याचा एकुण कालावधी दहा सेकंद इतका होता.
अलटीटयुड होल्डिंग्स फेज पाच वाजुन ५७ मिनिटांनी यशस्वीपणे पार पाडली.यानंतर फाईन ब्रेकिंग फ्रेजला आरंभ करण्यात आला होता.
५ वाजुन ५९ मिनिट झाल्यावर फाईन ब्रेकिंग फेज यशस्वीपणे पार पडला.
मग ६ वाजुन ४ मिनिट झाल्यावर लॅडर माॅडयुल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आले.
चंद्रयान ३ मिशनच्या यशाचे फायदे –
भारत देशाला आता खाजगी अंतराळ प्रक्षेपण अणि उपग्रह आधारीत व्यवसायांत गुंतवणूक वाढवण्याची संधी प्राप्त होणार आहे.