डिजी यात्रा सुविधा म्हणजे काय? | Digi Yatra facility meaning in Marathi

डिजी यात्रा सुविधा म्हणजे काय? | digi yatra facility meaning in Marathi

नुकतेच काही दिवसांपूर्वी डिजीयात्रा सुविधा मिळवणारे गुवाहाटी हे ईशान्येतील पहिले विमानतळ ठरले आहे.

आपल्यातील खुप जणांना प्रश्न पडला असेल की हे डिजीयात्रा म्हणजे काय असते?ह्या सुविधेचा फायदा काय असतो आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

डिजी यात्रा ही विमानाने प्रवास करत असलेल्या व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली एक विशेष सुविधा आहे.

याआधी आपणास कुठल्याही एअरपोर्ट मध्ये प्रवेश करण्याआधी आवश्यक ते कागदपत्रे जसे की आयडी, तिकिट बोर्डिंग पास दाखवावे लागायचे.

पण आता विमानाने प्रवास करत असलेल्या यात्रींना कुठल्याही एअर पोर्टवर दाखल होण्यासाठी कागदपत्रे दाखवण्याची आवश्यकता नसेल.

सर्व यात्रेकरूंचा चेहरा हीच त्यांची विमानतळावर प्रवेश करण्यासाठी प्रमुख ओळख अणि बोर्डिंग पास देखील ठरणार आहे.

यासाठी एक अॅप लाॅच करण्यात आले आहे ज्याचे नाव डिजी यात्रा असे आहे.हे अॅप भारताचे नागरीक विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हे अॅप लाॅच केले होते.

दिल्ली विमानतळापासुन ह्या सुविधेस आरंभ करण्यात आला होता.हया सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपणास सर्वप्रथम ह्या अॅपवर जाऊन रेजिस्ट्रेशन करावे लागते.

हे मोबाईल अॅप चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानावर(facial recognition technology) विशेषतः काम करते.याने विमान प्रवासींच्या चेहरयाची ओळख करून चेक इन बोर्डिंग प्रवेश दा

रात प्रवेश इत्यादी सुविधा दिली जाते.

यासाठी आपणास कुठल्याही बोर्डिंग पासची आवश्यकता भासत नाही.कारण ही पुर्ण पद्धत पेपरलेस स्वरूपाची असते.

डिजी यात्रा अॅपमुळे आपणास विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी देखील फक्त आपला चेहरा दाखवण्याची आवश्यकता असते.

यात सर्वप्रथम ई गेटवर आपला बार कोड स्कॅन करण्यात येत असतो यानंतर फेशियल रिकोगनाईझेशनच्या मदतीने आपली ओळख पटवली जाते.आपल्या चेहरयाला डाॅक्युमेंटसला व्हेरीफाय केले जाते.

मग फेस व्हेरिफिकेशन यशस्वीपणे पार पडल्यावर आपणास इंट्री दिली जाते.

See also  गुगल वन डार्क वेब रिपोर्ट फिचर म्हणजे काय? Google one dark web report feature meaning in Marathi

ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपणास सर्वप्रथम डिजी यात्रा आयडी डिजी यात्रा अॅपवर जाऊन बनवावा लागतो त्यानंतर आपणास ह्या सुविधेचा लाभ घेता येईल.

सध्या ही सुविधा डोमेस्टिक फ्लाईट मधील यात्रींकरीता लाॅच करण्यात आली आहे.

डिजी यात्रा आयडी तयार करण्यासाठी आपल्याला आपला नाव,ईमेल आयडी,कुठलेही एक ओळखपत्र लागते.

डिजी यात्रा आयडीचा उपयोग आपण एअरपोर्टवर टिकिट बुकिंग करण्यासाठी देखील करू शकतो.तिकिट बुक करताना यात्रेकरूंना काऊंटर वर आपले डिजीयात्रा आयडी द्यावे लागेल.

डिजी यात्रा सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपणास डिजी यात्रा अॅपवर आपली आवश्यक ती माहिती प्रदान करणे आवश्यक असते.

यानंतर आपण भरलेली माहीती चेक केली जाते मग ओटीपीच्या साहाय्याने लाॅग इन करून करायचे आहे.

डिजी यात्रा अॅपचे फायदे –

चेक इन वगैरे करण्यासाठी आपणास कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता भासत नाही.

सर्व प्रवासींची माहीती यामध्ये अत्यंत सुरक्षित राहत असते.

विमानतळावर स्कॅन केल्यानंतर ह्या अॅपवरून अवघ्या चोवीस तासात प्रवाशांची माहीती काढुन टाकण्यात येते.