३१ मार्च अगोदर ही 5 कामे नक्की करा आणि व्हा चिंतामुक्त | Complete these 5 task before 31 march 2023
मित्रांनो मार्च महिना चालू आहे म्हणजे आर्थिक वर्षांची अखेर.
ह्या मार्च महिन्यामध्ये अनेक नवीन गोष्टी अद्यावत करण्यासाठी शासनाकडून ३१ मार्च २०२३ ही शेवटची तारीख नागरीकांना दिली गेली आहे.
यात पहिली गोष्ट आहे प्रत्येक नागरिकाला ३१ मार्च २०२३ अगोदर सरकारने आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करायला लावले आहे
वरिष्ठ तसेच परदेशातील भारतात आलेले लोक वगळता प्रत्येक भारतीय नागरिकाला हे करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नाहीतर १ एप्रिलपासून आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाणार आहे. ३१ मार्च २०२३ अगोदर जे नागरीक आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करतील त्यांना वाढीव मुदतीनुसार हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
ज्या भारतातील नागरीकांनी पीपीएफ,सुकन्या समृद्धी योजना,पाच वर्षीय एफडी,ईएल एस एस यात गुंतवणूक केली नाहीये अशा नागरीकांना ३१ मार्च २०२३ ही तारीख गुंतवणूक करण्यासाठी देण्यात आली आहे.
ही गुंतवणूक केल्याने नागरीकांना कलम ८० सी अंतर्गत टॅक्स बेनिफिट प्राप्त होणार आहे.
ज्या नागरीकांनी अद्याप पंतप्रधान वय वंदना ह्या ज्येष्ठ नागरिक वर्गासाठी सुरू करण्यात आलेल्या पेंशन योजनेत गुंतवणूक केलेली नाहीये अशा नागरीकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत लवकरात लवकर गुंतवणूक करायची आहे अन्यथा आपणास ह्या योजनेत १ एप्रिल २०२३ पासुन कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही.
Instagram Facebook ची ब्लू टिक्स मिळतेय विकत किंमत जाणून घ्या
कारण ही योजना पुढे चालू ठेवली जाणार किंवा बंद केली जावी अशी कुठलीही अधिसुचना शासनाने दिलेली नाहीये.म्हणुन ३१ मार्च २०२३ अगोदर आपण हे काम पुर्ण करणे अत्यावश्यक आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया कडुन सुरू करण्यात आलेल्या अमृतकलश ह्या योजनेचा हा शेवटचा महिना असणार आहे यानंतर ही योजना देखील बंद केली जाणार आहे.ही एक मुदत ठेव योजना आहे जी ज्येष्ठ नागरीक वर्गासाठी तसेच इतर सामान्य व्यक्तींच्या हितासाठी सुरू करण्यात आली होती.
ह्या योजनेमध्ये वरिष्ठ नागरीकांना आपल्या गुंतवणुकीवर ७.६ टक्के इतके व्याज दिले जात आहे.अणि इतर सामान्य व्यक्तींना ७.१ टक्के इतके व्याज दिले जात आहे.
म्हणून ज्यांना ह्या योजनेमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी लवकरात लवकर गुंतवणूक करायची आहे.
ज्या गुंतवणूक दारांनी म्युच्युअल फंड मधील आपली नाॅमिनेशनची प्रक्रिया अद्याप पुर्ण केली नाहीये.त्यांना ही प्रक्रिया ३१ मार्च अगोदर पुर्ण करायची आहे अन्यथा फंड हाऊस कडुन आपले म्युच्युअल फंड अकाऊंट रद्द केले जाऊ शकते.
३१ मार्च २०२३ ही आयटी आर फाईल करण्याची ह्या वर्षीची शेवटची तारीख आहे.ज्यांनी ३१ मार्च २०२३ अगोदर दंड भरला नाही त्याला १ एप्रिल २०२३ नंतर दंड भरावा लागणार आहे.
ज्या व्यक्तींनी आपल्या बॅक अकाऊंट डिटेल अपडेट केली नाहीये त्यांनी लवकरात लवकर ३१ मार्च २०२३ अगोदर आपले बॅक खाते तपशील अपडेट करून घ्यायचे आहे कारण आरबी आयने बँक तपशील अपडेट करण्यासाठी आपणास ३१ मार्च २०२३ ही शेवटची तारीख दिली आहे.