डीबीटीचा फुलफाॅम काय होतो DBT full form in Marathi
डीबीटीचा फुलफाॅम direct benefit transfer असा होत असतो.यालाच मराठीत थेट लाभ हस्तांतरण असे म्हटले जाते.
डीबीटी म्हणजे काय? DBT meaning in Marathi
डीबीटी हे एक भारत सरकारच्या वतीने चालविण्यात येणारे एक सिस्टम आहे. ज्यामध्ये कुठल्याही शासकीय योजनेद्वारे दिल्या जात असलेल्या रक्कमेचा लाभ लाभार्थी व्यक्तीस करून दिला जातो.
डीबीटी मध्ये कुठल्याही शासकीय योजनेचे पैसे लाभार्थी व्यक्तीच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्स्फर केले जात असतात.
डीबीटी हे एक असे माध्यम तसेच साधन आहे.हया माध्यमातून सरकारी योजनेमधून कुठल्याही व्यक्तीला प्राप्त असलेली लाभाची रक्कम ही थेट त्याच्या बॅक खात्यात आॅनलाईन पाठविली जाते.
डीबीटीची सुरूवात कधी करण्यात आली होती?
डीबीटीची सुरूवात १ जानेवारी २०१३ मध्ये भारत सरकारच्या वतीने करण्यात आली होती.
प्रथम ह्याचा प्रारंभ भारतातील २० जिल्ह्यात करण्यात आला होता.पण त्यावेळी याचे कुठलेही अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले नव्हते.फक्त लाभार्थी व्यक्तीस अनुदानाचे पैसे ट्रान्स्फर केले जायचे.
पण पुढे जाऊन काही दिवसांनी ६ जानेवारी २०१३ रोजी डिबीटीचे उद्घाटन करण्यात आले.हे उद्घाटन आंध्र प्रदेश राज्यातील मुख्यमंत्री एन किरण कुमार रेड्डी अणि ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांच्या हस्ते करण्यात आले होते.
डीबीटीचा मुख्य हेतु काय आहे?
कुठल्याही शासकीय योजनेतुन जी काही लाभाची रक्कम लाभार्थी लोकांना निर्धारित केली गेली आहे ती शासनाकडून दिली जात असलेली विशिष्ट रक्कम लाभार्थी व्यक्तीच्या बॅक खात्यात थेट जमा व्हावी ह्या हेतुने डीबीटीची स्थापना करण्यात आली आहे.
अणि डिबीटीचे मुख्य उद्दिष्ट देखील हेच आहे लाभार्थींना त्यांची लाभाची रक्कम थेट बँक खात्यात पाठविणे जेणेकरून त्यांना लाभाची रक्कम प्राप्त करण्यासाठी कुठल्याही सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागणार नाहीत.
अणि सगळ्यात महत्वाची बाब ह्या डिबीटी सिस्टममुळे योजनेची रक्कम प्राप्त असलेल्या लाभार्थी व्यक्तीला कुठल्याही दलाल मध्यस्थी यांची मदत देखील घ्यावी लागत नाही.जेणेकरून फसवणुकीचे प्रकार घडुन येत नाही व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते.
कारण डिबीटी सिस्टममुळे कुठल्याही योजनेतुन प्राप्त होत असलेली लाभाची रक्कम लाभार्थी व्यक्तीच्या थेट खात्यात जमा होत असते.अणि ही रक्कम लाभार्थी व्यक्तीच्या बॅक खात्यात एकदम सुरक्षित राहत असते.
डिबीटी सिस्टममुळे होणारे फायदे –
लाभार्थी व्यक्तीला त्याच्या लाभाची रक्कम ही डिबीटी सिस्टम द्वारे थेट बँक खात्यात पाठविली जाते.याने एजंट मध्यस्थी यांची आवश्यकता भासत नाही.
आधी सरकारच्या कुठल्याही योजनेमुळे येत असलेली लाभाची रक्कम व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या मा़ध्यमातुन प्राप्त व्हायची तो व्यक्ती शासनाकडुन अनुदान प्राप्त करून देण्याच्या बदल्यात काही टक्के रक्कम स्वताकडे ठेवून घेत होता.
पण डिबीटी सिस्टममुळे हे सर्व प्रकार कायमचे बंद झाले आहे.