सीपी आरचा फुलफाँर्म काय होतो?CPR full form in Marathi
सीपी आरचा फुलफाँर्म cardiopulmonary resuscitation असा होत असतो.
सीपी आर म्हणजे काय?CPR meaning in Marathi
टीव्ही सीरीअलमध्ये आपण अनेकदा बघत असतो की एक व्यक्ती असतो जो त्याचा श्वास रोखला जाऊन अचानक जमिनीवर कोसळतो अशा अशा परिस्थितीत त्याच्या आजुबाजुला असलेला दुसरा व्यक्ती त्याला वाचवण्यासाठी सीपीआर देत असतो.
यात तो दुसरा व्यक्ती त्या रूग्णाच्या छातीवर हाताने जोरात दाब देत असतो.किंवा मुव्हीज मध्ये आपण असेही बघतो की हदय बंद पडल्यावर हिरो हिरोइनला हिरोईन हिरोला वाचवण्यासाठी तोंडाने आपला श्र्वास एकमेकांना देत असतात.हे दुसरे काहीही नसुन यालाच सीपीआर असे म्हटले जाते.
हार्ट अटँक आलेल्या रुग्णाला आँक्सिजनची कमी पडु नये म्हणुन आँक्सिजन देण्यासाठी असे प्रामुख्याने केले जात असते.
आगीमध्ये अडकलेल्या व्यक्तीला नाका तोंडात धूर गेल्यावर जेव्हा आँक्सिजनची कमतरता भासते श्वास कोंडु लागतो तेव्हा सुदधा ह्याच पर्यायाचा उपयोग केला जात असतो.
तसेच पोहता न येणारया व्यक्तीला अचानक नदीत पडल्यामुळे नाकात तोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरतो आँक्सिजन न मिळल्याने जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा देखील त्याला वाचवण्यासाठी त्याची छाती जोरात दाबली जाते किंवा तोंडादवारे श्वास दिला जात असतो म्हणजेच सीपीआर दिला जात असतो.
सीपीआरचा उपयोग का अणि कुठे केला जातो?
आपत्कालीन परिस्थितीमध्ये श्र्वास बंद पडलेल्या,श्वास कोंडला गेलेल्या,हार्ट अटँक आल्याने आँक्सीजन कमी पडल्याने श्वास घेण्यास त्रास होणारया व्यक्तीला
रूग्णाला आँक्सीजन देण्यासाठी, त्याच्यावर त्वरीत तातडीचा उपचार करण्यासाठी सीपी आरचा उपयोग केला जात असतो.
कधी कधी कार्डीअँक अरेस्टमुळे रुग्णाचा श्वास कोंडला जात असतो.ज्यामुळ त्याला नियमितप्रमाणे सामान्य पदधतीने श्वास घेता येत नही.अशा वेळेला त्या रूग्णाला आर्टिफिशिअल आँक्सीजन देणे महत्वपूर्ण ठरते.
पण प्रत्येक रूग्णाला गरज असताना तातडीने मेडिकल हेल्प मिळेलच याची गँरंटी नसल्याने तत्काल रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याला सीपीआर ट्रिटमेंट दिले जात असते.
कुठल्याही व्यक्तीला सीपीआर कसा देतात?
सीपीआर ट्रिटमेंट ही फार साधी अणि सोपी असते यात आपल्याला रूग्णावर उपचार करण्यासाठी कुठल्याही डाँक्टरने लिहुन दिलेल्या मेडिकलमधील गोळयांची डाँक्टरच्या इंजेक्शनची गरज नसते.
समजा अचानक एखाद्या व्यक्तीचा श्वास गुदमरतो आहे अणि त्याची हदयाची गती सुदधा कमी होत चालली असेल अशा वेळी जो पर्यत त्या व्यक्तीची हदयाची गती पुर्ववत म्हणजे पहिले सारखी सामान्य होत नही तो पर्यत त्या व्यक्तीच्या छातीवर हाताने दाब देण्यात येत असतो.याने त्याच्या शरीरामधील रक्ताचा जो प्रवाह आहे तो नाँरमल होण्यास साहाय्य होते.
किंवा त्याला श्वास कमी पडत असल्यास तोंडाने श्वास देखील दिला जात असतो.
सीपीआर देण्याचे फायदे कोणकोणते असतात?
● सीपीआर दिल्याने व्यक्तीचा जीव वाचत असतो.त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तोंडाने आँक्सिजन दिला जात असतो.
● एखाद्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असेल अणि त्याच्या हदयाची गती पण मंद झालेली असेल अशा वेळी त्याची हदयाची गती पुर्ववत होण्यासाठी छातीवर दाब दिला जात असतो म्हणुन तत्काल रुग्णावर उपचार करण्यासाठी सीपीआर खुप फायदेशीर ठरते.
एखाद्या व्यक्तीला वेळेवर सीपीआर दिला नाही तर काय होऊ शकते?
जर एखाद्या व्यक्तीचा श्वास बंद पडलेला असेल एवढेच नही तर त्याचे हदयाचे ठोकेही बंद पडले असतील तर अशा परिस्थितीमध्ये आँक्सिजनची कमतरता भासल्याने त्या व्यक्तीच्या शरीरामधल्या सर्व पेशया हळुहळु मृत होऊ लागत असतात.ज्याचे परिणाम स्वरूप त्या व्यक्तीचे प्राण देखील जाण्याची दाट शक्यता असते.
अशा तातडीच्या परिस्थितीत त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आपण त्याला सीपीआर देत असतो.जेणेकरून आपल्याला त्याचा जीव वाचवता येईल.
सीपीआर कोणी द्यायला हवा?
समजा एखाद्या व्यक्तीचा श्वास बंद पडला आहे त्याचे हदयाचे ठोके सुदधा बंद पडले आहे अशा परिस्थितीमध्ये त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याची हदयाची गती पुर्ववत करण्यासाठी सीपीआर कसा द्यायचा याची योग्य माहीती असलेल्या प्रशिक्षित अशा व्यक्तींनीच त्या व्यक्तीला सीपीआर द्यायला हवा.
सीपीआर देताना घ्यायची मुख्य काळजी –
● ज्या व्यक्तीला पाण्यात पडुन नाकातोंडात पाणी गेल्याने श्वास घ्यायला त्रास होत आहे ज्याचा आगीतील धुरामध्ये अडकल्याने श्वास गुदमरतो आहे किंवा ज्याला हार्ट अटँक आला आहे अशा रूग्णाला सर्वप्रथम एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचे.
● मग तो व्यक्ती श्वास घेत आहे का त्याच्या हदयाचे ठोके हाताची नस सुरू आहे का हे चेक करायचे.त्याचा श्वास चालू असेल हदयाचे ठोके सुरू असतील हाताची नस सुरु असेल तर त्याला सीपीआर कधीच देऊ नये.
● अणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला सीपीआर कसा देतात याचे योग्य प्रशिक्षण असेल त्यानीच सीपीआर द्यायला हवा.