CSC -VLE -कॉमन सव्हीस सेंटर आज सामान्य जनते करता खूपच उपयोगी ठरत आहेत, केंद्र किंवा राज्य सरकार वेळोवेळी ज्या शैक्षणिक. आरोग्य, कृषि, ग्राहकभिमुख , बँकिंग किंवा आर्थिक समाजोपयोगी योजना जाहीर करत असते त्या ग्रामीण आणि शहरी भागात पोचवण्याच काम कॉमन सव्हीस सेंटर CSC तर्फे IT नेटवर्क च उपयोग करून केले जाते . थोडक्यात CSC कॉमन सव्हीस सेंटर काय तर महाराष्ट्रात परिचित असलेले -आपले सरकार सेवा केंद्र.
VLE -village level entrepreneur हे सरकारी , राज्य योजना ह्या सामान्य नागरिका पर्यन्त पोहचवण्यास मदत करतात.
नोंदणी करता पात्रता -VLE:
- सर्वात म्हत्वाच म्हणजे आपण Telecentre Entrepreneur Course (TEC) पूर्ण केलेला असावा. कोर्स ची माहिती करता TEC वर क्लिक करा॰
- वय 18 असेल, आपण दहावी पास असाल, स्थानिक भाषा अवगत असेल, इंग्लिश बोलता लिहता येत असेल.
- संगणक च ज्ञान असेल आणि समाजोपयोगी काम करण्याची धडपड असेल तर तुमी नक्की VLE बनू शकता.
- तुमला VLE नोंदणी करता करता कसली ही fee लागत नाही.
- VLE नोंदणी करता तुमाला – पॅन कार्ड , तुमी जिथ CSC केंद्र उभारणार त्या खोलीचे , रूम चे फोटो आणि cancelled चेक तुमाला द्यावा लागेल.
CSC केंद्र उभारण्या साठी काय आवश्यक आहे :
- एक चांगला computer ,काम फास्ट होण्या करता 240GB डिस्क आणि 1जीबी ram असेल तर उत्तम ,
- इंटरनेट कनेक्शन
- CD , DRIVE, विंडोज सिस्टिम , लायस्न्स कॉपी उत्तम
- वीजे करता 4 तासाचा UPS backup
- प्रिंटर, स्कॅनर
- वेब कॅमेरा
- CSC सेंटर हवेशीर व सुरक्षित असावे , वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यन्त देवा देता यावी.
नोंदणी करता ऑनलाइन अर्ज कसा कराल –
- http://register.csc.gov.in ह्या संकेतस्थळ वर जायचे आहे॰
- apply वर क्लिक केल की आपल्या आधार कार्ड ची माहिती भरून verifay करावी लागेल.
- त्यांतरआपल्याला आपल्या बँकेचे, आपलायकड असलेल्या सुविधांची माहिती त्या फॉर्म मध्ये भरावी लागेल.
- पुन्हा एकदा भरलेली माहिती चेक करून फॉर्म submit बटन दाबा , त्यांनातर तुमला एक application ID मिळेल।
- तुमचं नोंदणी यशस्वी झाली म्हणून तुमला एमेल द्वारे तसे कळवण्यात येईल.
- तुमच्या कडे असलेल्या application ID वरुन वेळोवेळी तुमाला अर्जाचे status पाहता येईल.
- काही अडचणी असल्यास आपण टोल फ्री क्रमांक 1800 3000 3468 किंवा एमेल [email protected]
महाराष्ट्रात ह्या कॉमन सव्हीस सेंटर CSC नाच “आपले सरकार सेवा केंद्र” हे नाव देण्यात आले आहे. ह्यात मिळणार्या सुविधा
आपले आधार | आधार प्रिंट | मोबाएल अपडेट्स | नोंदणी | केवायसी | ||
शैक्षणीक | डिजिटल शिक्षण | सायबर ग्राम | अनिमेशन कोर्स | Tally | ||
आर्थिक | बँक खाते उघडणे | विमा | पेन्शन | |||
सरकारी | पॅन कार्ड रेशन कार्ड जात प्रमाण पत्र | पासपोर्ट जन्म मृत्य नोंदणी | टॅक्स भरणे | रोजगार नोंदणी | स्वच्छ भारत | पीएम निवास योजना कृषि योजना |
निवडणूक | मतदार नोंदणी | |||||
दैनदिन | वीजबिल भरणे | नवीन वीज कनेक्शन | ||||
ग्राहक सेवा | रेल्वे, रीचार्ज , तिकीट बुकिंग | बी बियाणे | खत खरेदी |
I need new csc centre self office