दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार २०२३ विषयी माहिती – Dadasaheb Phalke Film Award 2023 In Marathi
दादासाहेब फाळके पुरस्कार म्हणजे काय? हा पुरस्कार कोणाला दिला जातो?
दादासाहेब फाळके हा भारतीय चित्रपट क्षेत्रातील एक सर्वोच्च पुरस्कार आहे जो दरवर्षी भारतीय चित्रपटांत असामान्य तसेच प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना दिला जातो.
१९६९ पासुन दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो आहे.हा पुरस्कार माहीती प्रसारण मंत्रालय भारत यांचेकडून दिला जात असतो.
दरवर्षी भरविण्यात येणारया राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात ह्या पुरस्काराचे वितरण केले जात असते.
दादासाहेब फाळके पुरस्काराचे स्वरुप काय असते?
दादासाहेब फाळके ह्या पुरस्काराच्या दिल्या जात असलेल्या बक्षिसांच्या रक्मेमध्ये आतापर्यंत अनेकदा बदल करण्यात आले आहे.
ह्या पुरस्कारात स्वर्ण कमळ,शाल मेडल अणि ठाराविक बक्षिसाची रोख रक्कम दिली जाते.
दादासाहेब फाळके कोण आहेत?
दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात.दादासाहेब हे एक भारतीय चित्रपट निर्माता होते त्यांनीच भारतातील पहिला पुर्ण लांबीचा चित्रपट राजा हरिश्चंद्र याचे दिग्दर्शन केले होते.
त्यांच्याच नावाने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांपासून भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रभावी अणि प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जात असतो.
दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वप्रथम कोणत्या वर्षी देण्यात आला होता?
दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वप्रथम १९६९ मध्ये देण्यात आला होता.
सर्वप्रथम हा पुरस्कार देवीका राणी हयांना दिला गेला होता अणि २०२० मधील पुरस्कार आशा पारेख यांना कोरोना महामारीमुळे २०२२ मध्ये देण्यात आला होता.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव पुरस्कार २०२३ –
आता आपण २०२३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणकोणत्या कलाकारांना कोणकोणत्या कार्यासाठी दिला गेला आहे हे जाणुन घेणार आहोत.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२३ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२३ चे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते.
दादासाहेब फाळके फिल्म महोत्सव पुरस्काराची सुरूवात २०१२ मध्ये झाली होती.
दादासाहेब फाळके पुरस्कार अणि दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव पुरस्कार हे दोघे वेगवेगळे पुरस्कार आहेत.दादासाहेब फाळके पुरस्कार हा एकाच व्यक्तीला दरवर्षी दिला जातो.
२०२३ मधील दादासाहेब फाळके पुरस्कार विजेता अजुन घोषित करण्यात आलेला नाहीये.मागच्या वर्षी २०२२ मध्ये हा पुरस्कार आशा पारेख यांना देण्यात आला होता.यंदा कोणाला दिला जाईल हे लवकरच कळेल.
● दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार म्हणजे बेस्ट फिल्म अवाॅर्ड हा काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाला मिळाला आहे.हया चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री हे होते.
● दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ ह्या सोहळ्यात वर्षातील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार म्हणजेच फिल्म आॅफ द इयर हा पुरस्कार ट्रीपल आर ह्या चित्रपटाला मिळाला आहे.याचे दिग्दर्शक एस एस राजमौली हे होते.
भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक – List Of Women Freedom Fighter Of India In Marathi
● दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ ह्या सोहळ्यामध्ये सर्वोत्तम अभिनेता म्हणजेच बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार रणबीर कपूर ह्याला देण्यात आला आहे.ब्रम्हास्त्र भाग एक शिवा ह्या अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी रणबीर कपूर याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
● दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सोहळ्यात सर्वोत्तम अभिनेत्री म्हणजेच बेस्ट अॅक्ट्रेस हा पुरस्कार आलिया भट्ट हिला मिळाला आहे.आलिया भटट हिला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी या चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
● दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ ह्या सोहळ्यामध्ये समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रीटीक बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार वरून धवण याला देण्यात आला आहे.वरूण धवण याला अमर कौशिक दिग्दर्शीत भेडिया ह्या चित्रपटासाठी क्रीटीक बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार देण्यात आला आहे.
● दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ ह्या सोहळ्यामध्ये समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रीटीक बेस्ट अॅक्ट्रेस हा पुरस्कार विद्या बालन हिला देण्यात आला आहे.विदया बालन हिला सुरेश त्रिवेणी दिग्दर्शीत जलसा ह्या चित्रपटासाठी क्रीटीक बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार देण्यात आला आहे.
● दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ ह्या सोहळ्यामध्ये नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणजेच बेस्ट अॅक्टर इन निगेटिव्ह रोल हा पुरस्कार सलमान दुलकर याला देण्यात आला आहे.सलमान दुलकर याला चुप ह्या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
● दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ च्या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणजे बेस्ट डायरेक्टर हा पुरस्कार आर बालकी यांना देण्यात आला आहे.चुप ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आर बालकी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
● दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ च्या सोहळ्यामध्ये मोस्ट प्राॅमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार त्रषभ शेटटी यांना देण्यात आला आहे.त्रषभ शेटटी हे कांतारा चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
● दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ च्या सोहळ्यामध्ये मोस्ट व्हर्सेटाईल अॅक्टर सर्वात अष्टपैलू अभिनेता हा पुरस्कार अनुपम खेर यांना देण्यात आला आहे.द काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटातील अभिनयासाठी अनुपम खेर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
● चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानाबद्दल दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ हा पुरस्कार अभिनेत्री रेखा यांना देण्यात आला आहे.
● सर्वोत्कृष्ट वेब सीरीज हा पुरस्कार रूद्र द एज ऑफ डार्कनेस ह्या वेबसीरीजला देण्यात आला आहे.
● वर्षभरातील सर्वोत्तम दुरदर्शन मालिका टेलिव्हिजन सीरीज आॅफ द इयर हा पुरस्कार स्टार प्लस वरील अनुपमा ह्या मालिकेला देण्यात आला आहे.
● टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता बेस्ट टिव्ही अॅक्टर हा पुरस्कार जैन इनाम यांना फना इश्क मे मरजावा ह्या टिव्ही सीरीजसाठी देण्यात आला आहे.
● सर्वोत्कृष्ट पुरुष गायक बेस्ट पुरूष प्ले बॅक सिंगर हा पुरस्कार सचेत टंडन हयांना माहीना मेनु गाण्यासाठी मिळाला आहे.
● Best Female Playback Singer सर्वोत्कृष्ट गायिका हा पुरस्कार नीती मोहन यांना गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील मेरी जान ह्या गाण्यासाठी देण्यात आला आहे.
● सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर हा पुरस्कार पीएस विनोद यांना चित्रपट विक्रम वेधासाठी देण्यात आला आहे.
● संगीत उद्योगात अतुलनीय कामगिरीचे योगदान दिल्याबद्दल दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ हा पुरस्कार हरिहरन यांना देण्यात आला आहे.
● दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव पुरस्कार २०२३ मध्ये बेस्ट टिव्ही अॅक्ट्रेस हा पुरस्कार नागीन ६ ह्या टिव्ही सीरीजसाठी तेजस्वी प्रकाश यांना देण्यात आला आहे.
● दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव पुरस्कार २०२३ मध्ये बेस्ट अॅक्टर इन सपोर्टिंग रोल हा पुरस्कार मनीष पाॅल यांना जुग जुग जियो साठी देण्यात आला आहे.