चेक आणि डिमांड ड्राफ्ट या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference between cheque and Demand Draft in Marathi

चेक आणि डिमांड ड्राफ्ट  फरक  – Difference between cheque and Demand Draft in Marathi

 

आज आपण कँशलेस पेमेंट करण्यासाठी चेक तसेच डिमांड डाफ्ट या दोघे यंत्रणांचा वापर करत असतो.

पण ज्या पदधतीने पेमेंट करण्यासाठी आपण चेकचा नेहमी वापर करत असतो त्यापदधतीने डिमांड ड्राफ्टचा नेहमी वापर करत नसतो.फक्त काही विशेष कार्यासाठीच आपण डिमांड ड्राफ्टचा वापर करतो.

चेक आणि डिमांड ड्राफ्ट या दोघांचा वापर जरी आपण सेम प्रोसेससाठी म्हणजेच पेमेंटसाठी करत असलो तरी दोघांच्या कार्यात बराच फरक असलेला आपणास दिसून येतो.

आजच्या लेखात आपण चेक आणि डिमांड ड्राफ्ट या दोघांमधला फरक जाणून घेणार आहोत.

 

चेक म्हणजे काय?

 एक व्यक्ती जेव्हा दुसरया व्यक्तीचे पैसे आपल्या अकाऊंटद्वारे फेडण्यासाठी पे करण्यासाठी त्याला एक लेखी आदेश लिहुन देत असतो जो त्या दुसरया व्यक्तीला बँकेतुन पैसे काढण्यासाठी बँकेला दाखवायचा असतो ज्याने त्याला पहिल्या व्यक्तीच्या अकाऊंटमधून पैसे काढता येतील त्यालाच चेक असे म्हणतात.

ह्या चेकचे देखील वेगवेगळे प्रकार असतात ज्यात बेरर चेक,आँडर्र चेक,क्राँस थर्ड पार्टी चेक,क्राँस चेक,बाऊन्स चेक इत्यादींचा समावेश होत असतो.

बँक अकाऊंट  किती प्रकारचे असतात ?-

डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय?

जेव्हा दोन व्यक्ती आपापसात व्यवहार करत असतात पण त्यांच्यात कुठल्याही प्रकारची ओळख नसते.म्हणुन त्यांना एकमेकांसोबत व्यवहार करण्यासाठी रिस्क घ्यायची नसते.

अशा परिस्थितीत विक्रेता खरेदी करत असलेल्या व्यक्तीला डिमांड ड्राफ्ट द्वारे पेमेंट करण्यास सांगत असतो.

See also  फ्लर्ट म्हणजे काय _ Flirt meaning in Marathi

चेक आणि डिमांड ड्राफ्ट या दोघांमध्ये फाय फरक असतो?difference between cheque and Demand Draft in Marathi

चेक

चेक आणि डिमांड ड्राफ्ट ये दोघेही आँप्शन आपण पेमेंट करण्यासाठी,आँनलाईन ट्रान्झँक्शन करण्यासाठी युझ करत असतो.

डीमांड ड्राफ्ट

चेक आणि डिमांड ड्राफ्ट ये दोघेही आँप्शन आपण पेमेंट करण्यासाठी,आँनलाईन ट्रान्झँक्शन करण्यासाठी युझ करत असतो

कारण चेकद्वारे आपण बँकेतुन कँशमध्ये पेमेंट काढु शकतो.चेकपेक्षा डिमांड ड्राफ्टने पेमेंट करणे अधिक सेफ असते
तसेच समजा आपला चेक चुकुन हरवला आणि इतर व्यक्तीच्या हातात लागला तर तो व्यक्ती त्या चेकचा वापर करून आपल्या अकाऊंटमधून पैसे देखील काढु शकतो.हा सगळयात मोठा ड्राँ बँक चेकने पेमेंट करण्याचा असतो.

 

 

पण डिमांड ड्राफ्टचे असे नसते आपण ज्याच्या नावाने डिडी तयार करत असतो त्याच व्यक्तीच्या अकाऊंटला ते पैसे जमा होत असतात इतर कोणत्याही व्यक्तीच्या अकाऊंटला हे पैसे जमा केले जात नसतात.हा सगळयात महत्वाचा फायदा डिमांड ड्राफ्टने पेमेंट करण्याचा असतो.
याचसोबत चेक हा बाऊन्स होण्याची देखील शक्यता असते.चेकसाठी आपले बँकेत खाते असणे गरजेचे असते पण डिमांड ड्राफ्टसाठी आपले बँकेत खाते असण्याची कोणतीही गरज नसते.पण डिमांड ड्राफ्ट कधीच बाऊन्स होत नसतो.कारण डिमांड ड्राफ्ट जेव्हा जारी केला जातो त्याचवेळेस डिमांड ड्राफ्ट जारी करणारी व्यक्ती याचे पेमेंट करून देत असते.
चेकचा वापर आपण जास्तीत जास्त रोजचे डेली पेमेंटसाठी करता करत असतोपण डिमांड ड्राफ्टचा वापर आपण नेहमी न करता विशेष कार्यासाठी करत असतो. जसे की सरकारी संस्थेत तसेच फी पे करण्यासाठी डिमांड ड्राफ्टचा वापर विशेषकरून केला जात असतो.

 

आणि जेवढया रक्कमेचा डीडी आपल्याला तयार करायचा असतो तेवढे पैसे आपल्याला फाँर्म सोबत जमा करावे लागत असतात.सोबत आपल्याला काही चार्ज देखील पे करावा लागत असतो.डिमांड ड्राफ्ट आपण आँफलाईन देखील तयार करू शकतो तसेच तो आपल्याला आँनलाईन देखील तयार करता येत असतो.

 

याचठिकाणी आपल्याला जर आँनलाईन डिमांड ड्राफ्ट बनवायचा असेल तर आपण नेट बँकिंद्वारे डिमांड ड्राफ्ट तयार करू शकतो.

 

आँफलाईन डिमांड ड्राफ्ट तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्याही एका बँकेत जावा लागते.तिथे आपले अकाऊंट नसले तरी चालेल फक्त तेथे आपल्याला एक फाँर्म भरावा लागत असतो.

 

 डीडी आपण रुपया सोबत इतर करंसी मधी देखील बनवु शकतो.डीडीचा वापर इंटरनँशनल ट्रान्झँक्शनसाठी केला जात असतो.

 

नेट बँकिंगद्वारे डिमाँड ड्राफ्ट जारी करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असते:

 

  • ज्यात आपल्याला नेट बँकिंगवर आपला आयडी पासवर्ड टाकुन सर्वप्रथम लाँग इन करावे लागते.

 

  • लाँग इन करून झाल्यावर आपल्याला पेमेंट आणि ट्रान्सफर वर क्लीक करावे लागते.जेथे पेमेंट ट्रान्सफरचे विविध पर्याय येत असतात.ज्यात आपल्याला इशु डिमांड ड्राफ्टचे एक आँप्शन दिसुन येत असते.

 

  • इशु डिमांड ड्राफ्टवर ओके करून आपण डिमांड ड्राफ्ट इशु करू शकतो.फक्त आपल्याला इथे लिमिट किती दिले आहे ते चेक करून घ्यावे लागत असते.आपण जास्तीत जास्त पाच लाखापर्यतचा डिमांड ड्राफ्ट इशु करू शकतो.

 

  • यानंतर आपल्याला ज्या बँक अकाऊंटद्वारे डिमांड ड्रिफ्ट इशु करायचा आहे ते अकाऊंट सिलेक्ट करायचे असते.

 

  • यानंतर आपल्याला जेवढया रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट तयार करायचा असेल तेवढी रक्कम अमाऊंटमध्ये भरावी.

 

  • मग ज्याच्या नावाने डिमांड ड्राफ्ट आपण बनवतो आहे त्याचे नाव द्यावे लागते.आणि आपल्याला त्या व्यक्तीचे त्याच्या बँक खात्यात जे नाव असेल तेच नाव इथे टाकावे लागते.कारण डिमांड ड्राफ्ट त्या व्यक्तीच्या बँक अकाऊंटमध्ये जात असतो.

 

  • यानंतर पर्पज मध्ये जाऊन कशासाठी डिमांड ड्राफ्ट देतो आहे गिफ्ट म्हणुन का डोनेशन देण्यासाठी का फी भरण्यासाठी देतो आहे हे देखील तिथे द्यावे लागते.

 

  • ज्या बँकेतुन आपल्याला डीडी जारी करायचा असेल त्या बँकेचे नाव आणि कोड लिहावा लागतो.

 

  • यानंतर आपल्याला ज्या पदधतीने डीडी पाठवायचा आहे ती मेथड सिलेक्ट करावी

ज्यात आपण कुरिअर तसेच हँण्ड टु हँण्ड यापैकी कोणतेही आपल्याला हवे ते एक आँप्शन सिलेक्ट करू शकतो.

 

  • यानंतर सर्व माहीती व्यवस्थित बघुन कनफर्म करायचे असते.
  • यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जातो जो भरून झाल्यावर आपला डिमांड ड्राफ्ट जारी होऊन जातो.
See also  झुकिनी ची माहिती - Zucchini information in Marathi

Comments are closed.