गुगल वेब स्टोरीज – Complete Guide : Benefits, Guidelines, And How To Enable
गुगल वेबस्टोरी हे गुगल कंपनीचेच लाँच केलेले एक फिचर आहे.जे खुप आधीपासुन लाँच करण्यात आले होते पण सुरुवातीला ह्या फिचरला प्रमोट करण्याकडे गुगलने एवढे लक्ष दिले नव्हते.
पण सध्या आता गुगल देखील आपल्या ह्या नवीन फिचरला प्रमोट करीत आहे.
युटयुब तसेच गुगलवर सर्च केल्यावर आपल्याला याविषयी अनेक आर्टिकल तसेच व्हिडिओ दिसुन येतात ज्यात वेबस्टोरीज मधून ब्लाँगर्स लाखो रूपये महिन्याला कसे कमवितात हे सांगितलेले असते.
तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम हा प्रश्न निर्माण होत असतो की वेब स्टोरीज म्हणजे काय?आणि ह्या वेबस्टोरीद्वारे ब्लाँगर्स महिन्याला लाखो रूपये कसे कमवितात.आणि सगळयात महत्वाचे म्हणजे ह्या वेबस्टोरी कशा बनविल्या जातात?
अशा पदधतीचे खुप प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात.आपल्या डोक्यात निर्माण होत असलेल्या ह्याच विविध प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्राप्त व्हावी म्हणुन आजच्या लेखात आपण गुगल वेबस्टोरी विषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
गुगल वेब स्टोरीज म्हणजे काय? What are Google Web Stories in Marathi
गुगल वेब स्टोरी हा एक शाँर्ट स्टोरीचाच प्रकार आहे.ज्यात टेक्सटमध्ये शाँर्ट स्टोरी दिल्या जात असतात.ह्या स्टोरीजला बघण्यासाठी आपण गुगल डिस्कव्हर मध्ये जाऊ शकतो.
वेब स्टोरीजचे पेजेस पाच किंवा त्यापेक्षा अधिक देखील असतात.ज्यात आपल्याला कोणत्याही विषयाची माहीती देण्यासाठी कमीत कमी दोनशे कँरेक्टर दिले जात असतात.
आणि समजा आपल्याला यापेक्षा अधिक विस्तृतपणे माहीती द्यायची असेल तर आपण अधिक माहीतीसाठी आपली लिंक खाली शेअर करू शकतो.
जेणेकरून ज्या रीडरला त्या विषयावर अधिक माहीती हवी असेल तो त्या लिंकवर जाऊन सविस्तरपणे माहीती प्राप्त करू शकतो.
याने रीडरला परिपुर्ण माहीती देखील प्राप्त होते.आणि आपल्या ब्लाँगवर देखील जास्तीत जास्त ट्रँफिक येत असते.
गुगल वेब स्टोरी बनवण्याचे फायदे कोणकोणते असतात? – Google Web Stories – Benefits Guidelines And How To create
गुगल वेब स्टोरीचे आपणास अनेक फायदे होत असतात आणि ते फायदे पुढीलप्रमाणे आहेत :
- गुगल वेब स्टोरीजचा पहिला फायदा आपणास हा असतो की याचा वापर करून ब्लाँगर्स आपल्या वेबसाईटवर भरपुर ट्रँफिक आणु शकतात.कारण इथे आपल्या वेबसाईटची लिंक शेअर करू शकतो.
- गुगल वेब स्टोरीजला माँनिटाईज करून आणि त्यावर गुगल्सच्या अँड लावून आपण गुगल वेब स्टोरी द्वारे पैसे कमावू शकतो.
- आपण आपल्या व्हाँटस अँपला इंस्टाग्राम अकाऊंटला जसे नवनवीन स्टेटस टाकतो एकदम त्याचप्रमाणे वेब स्टोरी देखील असते.यात आपल्याला हजार वर्डचा कंटेट लिहिण्याची आवश्यकता नसते इथे आपण 100 शब्दांचा कंटेट जरी लिहिला तरी तो गुगलवर टाँपला रँक होत असतो.
- गुगल वेब स्टोरीजचा वापर करून आपण दिवसभरात जास्तीत जास्त कंटेट प्रोडयुस करू शकतो.कारण इथे मोठमोठे आर्टिकल लिहायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आपणास लागत नसतो.
- गुगल वेब स्टोरीजचा प्रमुख फायदा हा आहे की आपल्याला ब्लाँगवर ट्रँफिक येण्यासाठी दोन तीन महिने थांबावे लागत नसते कारण गुगल वेब स्टोरीजवरून आपल्या ब्लाँगवर पहिल्या दिवसापासुनच ट्रँफिक येणे सुरू होत असते.
- इथे आपण जी स्टोरी पब्लिश करतो तिच्यात कमी शब्द असतात आणि तिचा कालावधी देखील कमी असतो म्हणुन ती जलदगतीने लोड होत असते.
- गुगल वेब स्टोरीजद्वारे आपण आपली अँफिलिएट लिंक शेअर करून आपल्या अँफिलिएट प्रोग्रामचे,लिंकचे प्रमोशन करू शकतो.
- गुगल वेब स्टोरीज ह्या युझर्सला किवर्ड सर्च न करता दिसुन येत असतात म्हणजे यात आपल्याला कंटेट रँक करण्याची त्यासाठी बँक लिंक तयार करण्याची,आँनपेज एससीओ करण्याची कुठलीही चिंता करावी लागत नाही.
- गुगल वेब स्टोरीजवर लिंक शेअर करून आपण आपल्या युटयुब चँनलला,इंस्टाग्राम अकाऊंटला,टेलिग्राम चँनलचे प्रमोशन करू शकतो.
- गुगल वेब स्टोरीज ह्या युझर फ्रेंडली असतात.म्हणुन यात आपण टेक्सट इन्फ्रोग्राफिक्स फारमँटसोबत आँडियो तसेच व्हिडिओ फाँरमँटमधील कंटेट देखील पब्लिश करू शकतो.
- वेब स्टोरीज मुळे युझरला कंटेट रीडींगचा एक नवीन अनुभव प्राप्त होतो ज्याने युझर रीडर्स एंगेजमेंट देखील वाढत असते.
- गुगल वेब स्टोरीत जो कंटेट दिलेला असतो तो एकदम शाँर्ट असतो आणि तो इनफोग्राफीक्स आँडिओ तसेच व्हिडिओच्या फाँरमँटमध्ये असतो ज्याने रीडरला तो कंटेट सहजपणे शेअर देखील करता येतो.
- गुगल वेबस्टोरीजला आपण गुगल अँनेलिटीक्सचा वापर करून ट्रँक देखील करू शकतो.
गुगल वेब स्टोरीजमुळे होणारे नुकसान कोणकोणते असते?
गुगल वेबस्टोरीजचे जसे आपण अनेक फायदे जाणुन घेतले तसेच याचे काही तोटे देखील असतात जे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.
कारण कोणत्याही नाण्याच्या दोन बाजु असल्यामुळे जसे त्याचे लाभ आपणास मिळत असतात तसेच त्याचे नुकसान देखील आपणास सहन करावे लागत असते.
चला तर मग जाणुन घेऊया गुगल वेबस्टोरीजचा वापर करण्याचे तोटे कोणकोणते असतात.
गुगल वेब स्टोरीजमुळे होणारे नुकसान :
- गूगल वेब स्टोरीजचा वापर केल्याने आपल्याला अँडसेन्स सीपीसी फार कमी प्राप्त होत असतो.
- गुगल वेब स्टोरी तयार करायला आपणास हाय काँलिटी इमेजेस लागत असतात आणि त्यातच आपल्या होस्टिंग प्लँनमध्ये अधिक स्टोरेजची सुविधा नसेल तर याने आपल्याला स्टोरेजची खुप अडचण येत असते.किंवा जुन्या वेब स्टोरीजच्या इमेजेस डिलीट देखील कराव्या लागत असतात.
गुगल वेब स्टोरीजच्या महत्वाच्या गाईडलाईन्स कोणकोणत्या आहेत? Google Web Stories – Guidelines
गुगल वेब स्टोरीजच्या महत्वाच्या गाईडलाईन पुढीलप्रमाणे आहेत :
- यात आपण 200 कँरेक्टर पेक्षा अधिक कँरेक्टरचा वापर करू शकत नाही.
- जर आपल्याला युझर्स तसेच रीडर इंगेजमेंटमध्ये वाढ करायची असेल तर आपण व्हिडिओचा वापर देखील वेब स्टोरीसाठी करू शकतो.पण यात आपण फक्त पंधरा ते साठ सेकंदाचाच व्हिडिओ टाकू शकतो.
- गुगल वेब स्टोरीजमध्ये कंटेट क्रिएट करण्यासाठी आपल्याला हाय काँलिटी ईमेजेस,आँडिओ व्हिडिओ यांचा वापर करणे गरजेचे आहे.
- वेब स्टोरीचे टायटल जास्तीत जास्त नव्वद कँरेक्टर ठेवावे त्यापेक्षा अधिक असु नये.
- आपल्याला वेब स्टोरीजच्या ईमेजमध्ये आँल्टर टँगचा वापर करायचा असतो.
- वेब स्टोरीजसाठी प्राँपर साईज असलेल्या ईमेजचाच वापर करायचा असतो.
गुगल वेब स्टोरीजद्वारे पैसे कमविण्याचे मार्ग कोणकोणते आहेत?
गुगल वेब स्टोरीजचा वापर करून आपण पुढील पदधतीने मार्गानी पैसे कमवू शकतो.
- अ़ँड : गुगल वेब स्टोरीजवर आपण गुगलच्या अँड लावुन अँडसेन्सद्वारे कमाई करू शकतो.
- अँफिलिएट प्रोग्राम :गुगल वेब स्टोरीजवर आपण आपल्या अँफिलिएट लिंकला शेअर प्रमोट करून अँफिलिएट प्रोग्रामद्वारे कमाई करू शकतो.
- ब्लाँग सोशल मिडिया प्रमोशन :गुगल वेब स्टोरीजद्वारे आपण आपल्या ब्लाँगची लिंक शेअर करून त्याला प्रमोट करू शकतो.आणि त्यावर ट्ँरफिक वाढवू शकतो.
याचसोबत आपल्या इतर सोशल मिडिया प्लँटफाँर्मला प्रमोट करू शकतो उदा.यु टयुब,टेलिग्राम,इंस्टाग्राम इत्यादी.
वर्ड प्रेसवर वेबस्टोरी कशी बनवावी? – Google Web Stories How To create
वेब स्टोरी आपण दोन पदधतीने तयार करू शकतो एक ब्लाँगर डाँट काँम वर तयार करू शकतो आणि वर्डप्रेसवर फ्री प्लग इनचा वापर करून देखील तयार करू शकतो.
वर्ड प्रेसवर वेबस्टोरी खालीलप्रमाणे बनवली जाते :
- वर्ड प्रेसवर वेब स्टोरी तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वर्डप्रेसच्या डँश बोर्डवर जावे लागते न्यु प्लग इनमध्ये जाऊन गुगल वेब स्टोरी असे सर्च करावे लागते.
- गुगल वेब स्टोरीज नावाचे प्लग इन इंस्टाँल करून झाल्यावर ते अँक्टीव्हेट करावे लागते.
- मग गुगल वेब स्टोरीजच्या सेटिंगमध्ये जावे लागते.आणि एक लोगो अपलोड करावा लागत असतो.जो ९६*९६ आणि त्याचा अँसपेक्ट रेशो १.१ असावा लागतो.
लोगो हा स्कव्हायर शेप मध्ये असावा लागतो.आणि त्याचे बँकग्राऊंड ट्रान्सपरंट असू नये.
- लोगो अपलोड करून झाल्यावर आपल्याला जशापदधतीने वेब स्टोरीजची सेटिंग हवी असेल तशी करून घ्यायची.जसे की गुगल अँनेलिटीक्सचा ट्रँकिंग कोड फिल करणे इत्यादी.
- यानंतर आपण क्रिएट वेबस्टोरी ह्या आँप्शनवर क्लीक करून न्यू वेब स्टोरी क्रिएट करू शकतो.