MPSC आणि UPSC माहिती -DIFFERENCE BETWEEN MPSC AND UPSC
जेव्हा आपण बारावीनंतर तसेच पदवीचा अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकडे वळत असतो तेव्हा आपल्यापुढे दोन पर्याय असतात.एक आहे एमपीएससी आणि दुसरा आहे युपीएससी.
कारण ह्या दोघे अशा महत्वपुर्ण परिक्षा आहे ज्यात उत्तीर्ण होऊन आपण मोठया अधिकारी पदावर जाऊ शकतो.दोघे क्षेत्रांमध्ये समान करिअरची संधी आपल्याला उपलब्ध असते.
अशा वेळी विदयार्थ्यांना हा संभ्रम पडत असतो की युपीएससीची तयारी करावी की एमपीएससीची तयारी करावी?कारण ह्या या दोघांमध्ये काय फरक आहे हे बहुतेक विदयार्थ्यांना माहीत नसते.
म्हणुन आजच्या लेखात आपण एमपीएससी आणि युपीएससी या दोघांमधील फरक जाणुन घेणार आहोत.
जेणेकरून स्पर्धा परिक्षेकडे वळत असलेल्या विदयार्थ्यांच्या मनामध्ये एमपी एससी युपीएससी विषयी जे कन्फ्युझन असते ते दुर होण्यास नक्कीच मदत होईल.आणि विदयार्थ्यांना आपल्या करिअरनुसार या दोघांपैकी एकाची निवड करता येईल.
चला तर मग जाणुन घेऊया एमपीएससी आणि युपीएससी मध्ये कोणते साम्य आहे आणि कोणता फरक आहे?
विदयार्थ्यांनी दहावी बारावीनंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करायला हवी का? –
MPSC आणि UPSC या दोघांमध्ये कोणता फरक आहे? -Difference Between MPSC and UPSC
MPSC
- एमपीएससीचा फुल फाँर्म (MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION) महाराष्ट लोकसेवा आयोग असा होतो.
- एमपीएससी ही एक महाराष्टातील RECRUITING AGENCY असते.
- एमपीएससीकडुन गृप ए,गृप बी आणि गृप सी मधील पदांची भरती करण्यासाठी परिक्षा घेतली जात असते.
- एमपी एससीचे मुख्य कार्यालय हे मुंबई येथे एम जी रोड हुतात्मा चौक येथे स्थित आहे.
- एमपीएससीकडुन डेप्युटी कलेक्टर,तहसिलदार,बीडीओ,एसटी आय आँफिसर,पी एस आय,एएसओ आणि सीडीपीओ अशा इत्यादी पदांसाठी परिक्षा घेतली जात असते.
- एमपीएससीमध्ये अलग अलग परिक्षा घेतली जात असते म्हणजेच गृप ए साठी एक अलग परिक्षा येथे घेतली जाते.आणि मग गृप बी साठी पीएस आय,एसटीआय,एएस ओ ह्या पदांसाठी एक अलग परिक्षा आणि गृप सी साठी देखील अलग परिक्षा घेतली जात असते.
- एमपीएससीच्या परिक्षेत जे प्रश्न विचारले जातात त्यांची भाषा ही मराठी किंवा इंग्लिश अशी असते.एमपीएससी एक्झँम ही मराठी आणि इंग्लिश ह्या दोन भाषेच्या माध्यमातुन घेतली जाते.
- एमपीएससीमध्ये सीसँटच्या पेपरमध्ये COMPREHENSION SKILL म्हणजे आकलन क्षमतेसाठी इंग्रजी आणि मराठी या दोन भाषेत परिच्छेद म्हणजेच पँसेज आपल्याला विचारले जात असतात.
- एमपीएससीमध्ये एक लँग्वेजचा पेपर थेरी असतो आणि बाकीचे MCQ पँटर्नमध्ये असतात. म्हणजे यात मल्टीपल चाँईस असलेले क्वेशन आपणास विचारले जात असतात ज्यात आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी कुठलाही एक अचुक पर्याय निवडायचा असतो आणि त्यावर टीक करायचे असते.
- एमपीएससीमध्ये मुख्य परिक्षेसाठी आपल्याला कुठलाही आँप्शनल विषय निवडावा लागत नसतो.
- एमपीएससीसाठी फक्त महाराष्टातील तरूण तरुणी अँप्लाय करू शकतात.
- एमपीएससीमध्ये आपले सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला फक्त महाराष्टामध्येच नोकरी मिळु शकते
- एमपीएससीमध्ये उच्च श्रेणीच्या अधिकारींची निवड केली जाते.
- उदा. एमपीएससी -डेप्युटी कलेक्टर,तहसिलदार,बीडीओ,एसटीआय,पीएस आय, एएसओ इत्यादी.
- एमपीएससीमध्ये कमीत कमी 24 पदांसाठी भरती केली जाते.
- एमपीएससी परिक्षा ही तीन टप्पयात घेतली जाते.ज्यात पुर्व परिक्षा,मुख्य परिक्षा आणि मुलाखतीचा समावेश असतो.
- एमपीएससीच्या मुख्य परिक्षेत एकुण सहा पेपर घेतले जातात.
- एमपीएससीमध्ये पुर्व परिक्षेत 400 मार्क असतात.मुख्य परिक्षेत 800 मार्क असतात आणि शेवटी मुलाखतीसाठी 100 मार्क दिले जात असतात.
- एमपीएससी परीक्षेत ओपन कँटँगरी असलेल्या विदयाथ्यांना 524 रूपये फी लागते.
- एमपीएससीच्या परिक्षेविषयी माहीती प्राप्त करण्यासाठी,परिक्षेचे वेळापत्रक जाणुन घेण्यासाठी,हाँल तिकिटसाठी तसेच मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका प्राप्त करण्यासाठी आपणCOM ह्या वेबसाईटला व्हिझिट करू शकतो.
एमपीएससीचा पेपर एक दोन आणि पेपर दोन देखील दोनच तासांचा असतो
UPSC
- युपीएससीचा फुल फाँर्म (UNION PUBLIC SERVICE COMMISSION) संघ लोकसेवा आयोग असा होतो
- युपीएससी ही एक भारत देशामधील CENTRAL RECRUITING AGENCY म्हणजेच केंद्रीय भरती संस्था आहे.
- युपीएससीकडुन ज्या परिक्षा घेतल्या जात असतात त्या गृप ए आणि गृप डी साठी घेतल्या जात असतात.
- आणि युपीएससीचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे ढोलपुर हाऊस शहाजहान रोड येथे आहे.
- युपीएससीकडुन आय ए एस आँफिसर,आयपी एस आँफिसर,आय एफ एस आणि आय आर एस आँफिसर इत्यादी अधिकारी पदांसाठी परिक्षा घेतली जात असते.
- युपीएससीमध्ये उमेदवारांची प्रत्येक पदासाठी अलग अलग परिक्षा घेतली जात नसते म्हणजेच आय एएस पदासाठी अलग परीक्षा घेतली जाणे आयपी एस पदासाठी अलग परिक्षा घेतली जाणे असा कुठलाही प्रकार नसतो यात सर्व पदांसाठी एकच परिक्षा येथे घेतली जात असते.
- युपीएससीच्या परिक्षेत जे प्रश्न विचारले जात असतात त्यांची भाषा इंग्लिश आणि हिंदी असते.म्हणजेच युपीएससी एक्झँम ही इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन भाषेच्या माध्यमातुन घेतली जाते
- युपीएससीमध्ये सीसँटच्या पेपरमध्ये COMPREHENSION SKILL म्हणजे आकलन क्षमतेसाठी इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत परिच्छेद म्हणजेच पँसेज दिलेला असतो.
- युपीएससीमध्ये पुर्व परिक्षेत एमसीक्यु आणि मुख्य परिक्षेत आपल्याला थेरीमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात.
- यूपीएससी मध्ये मुख्य परिक्षेसाठी (MAINS EXAM साठी)आपल्याला आँप्शनल विषय निवडावा लागत असतो
- यूपीएससीसाठी संपुर्ण भारतातील तरूण तरूणी अँप्लाय करू शकतात.
- युपीएससीमध्ये सिलेक्शन झाल्यावर आपल्याला महाराष्टातच न्व्हे तर संपुर्ण भारतात कुठेही नोकरी मिळु शकते.
- आणि युपीएससीमध्ये सर्वोच्च श्रेणीच्या अधिकारींची निवड केली जाते. युपीएससी- आय ए एस,आय पी एस,आय एफ एस,आय आर एस इत्यादी.
- आणि यूपीएससीमध्ये कमीत कमी 22 पदांसाठी भरती होत असते.
- युपीएससीमध्ये देखील तीन टप्पयात परिक्षा घेतली जाते ज्यात पुर्व परिक्षा,मुख्य परिक्षा आणि मुलाखत या तिघांचा समावेश असतो.
- आणि यूपीएससीच्या मुख्य परिक्षेत एकुण 9 पेपर घेतले जातात.
- युपीएससीमध्ये पुर्व परिक्षा 400 मार्काची असते.मुख्य परिक्षेत दोन काँलिफाय पेपर घेतले जातात ज्याचे एकुण 1750 मार्क असतात.आणि मुलाखतीसाठी 275 मार्क दिले जातात.
- आणि युपीएससीमध्ये ओपन कँटँगरी वाल्यांना फक्त शंभर रूपये लागतात.
- युपीएससीच्या परिक्षेविषयी माहीती प्राप्त करण्यासाठी,परिक्षेचे वेळापत्रक जाणुन घेण्यासाठी,हाँल तिकिटसाठी तसेच मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका प्राप्त करण्यासाठी आपणCOM ह्या वेबसाईटला व्हिझिट करू शकतो.
- .आणि युपीएससीचा पेपर एक,दोन देखील दोन तासांचाच असतो.
Thank s for giving information
Thankyoy ,glad that you liked this article.
Thanks 🙏🏻
Thank you
Thank you very much