Weather आणि climate म्हणजे काय आहे? – Difference between Weather and climate in Marathi
आपण जेव्हा इंटरनेटवर वेदर मिन्स इन मराठी असे टाईप करून सर्च करतो तेव्हा आपल्याला हवामान असा त्याचा अर्थ सर्च इंजिन दाखवत असते.आणि याच ठिकाणी आपण जर क्लाईमँट मिन्स इन मराठी असे टाईप करून सर्च केले तर त्याचा अर्थ देखील हवामान असाच येत असतो.
म्हणजेच वेदर आणि क्लाईमँट या दोघांचा मराठीत अर्थ हवामान असाच होत असतो.कारण या दोघांसाठी मराठीमध्ये कुठलेही वेगवेगळे अर्थ असलेले आपणास दिसुन येत नाही.
पण याचठिकाणी आपण इंग्रजी भाषेत पाहावयास गेले तर ह्या दोघे शब्दांचे वेगवेगळे अर्थ होताना आपणास दिसुन येते.
असे का होते हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो.याचसाठी आज आपण मराठीत वेदर आणि क्लाईंमँट या दोघांचा अर्थ मराठीत हवामान असाच का होतो. Difference between Weather and climate in Marathi
आणि याचठिकाणी इंग्रजीत याचे वेगवेगळे अर्थ का होत असतात हे आपण आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्याला आपल्या बोलण्यात लिहिण्यात आणि वाचण्यात एक अचुकता निर्माण करता येईल.
कारण समजा आपण क्लाईमँट आणि वेदर या दोघांचा अर्थ एकत्र केला तर आणि आपल्याला या दोघांपैकी कोणत्याही एका विषयावर लिहायचे तसेच बोलायचे असेल तेव्हा आपल्याला नेमकी दोघांपैकी कोणत्या विषयावर लिहायचे किंवा बोलायचे आहे हे कळणार नाही म्हणुन या दोघांमधला फरक आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहे.
मराठीत weather आणि climate या दोघे शब्दांचा अर्थ हवामान असा का होतो?
जेव्हा आपण वेदर आणि क्लाईमँट ह्या दोन शब्दांचा इंटरनेटवर मराठीत अर्थ शोधत असतो तेव्हा आपल्याला ह्या दोघांचा अर्थ सर्च रिझल्टमध्ये हवामान असाच दिसुन येत असतो.
याला कारण मराठीत ह्या दोघा शब्दांना वेगवेगळे अर्थ असणारे शब्दच आपणास दिसुन येत नाही.म्हणजेच क्लाईमँट आणि वेदर या दोघा इंग्रजी शब्दांना मराठीत हवामानाशिवाय दुसरा पर्यायी शब्दच नाहीये.असे सिदध होते.
ज्यामुळे आपण इंटरनेटवर सर्च रिझल्टमध्ये दोघांपैकी कोणताही एक शब्द सर्च केल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला हवामान असाच दिसुन येत असतो.
इंग्रजीत weather आणि climate या दोघा शब्दांचा अर्थ वेगवेगळा का होतो?
- वेदर हा शब्द आपण क्रियापद म्हणुन वापरत असतो.किंवा नाम म्हणुन वापरत असतो.याचाच अर्थ वेदर ह्या शब्दाचा वापर क्रियापद म्हणुन तसेच नाम म्हणुन केला जात असतो.
- वेदर हा शब्द आपण क्रियापद म्हणुन वापरतो तेव्हा त्याचा अर्थ निभावणे तसेच प्रतिकुल परिस्थितीत देखील तग धरून राहणे असा होत असतो.म्हणजेच परिस्थिती कशीही असो कितीही बिकट असो तिला सामोरे जाऊन तग धरून राहणे.
- उदा the sturdy boat has weathered the storm well.
- वरील उदाहरणाचा अर्थ असा होतो की एक मजबुत भक्कम अशा बोटीने वादळाला चांगल्या पदधतीने तोंड दिले आहे तसेच त्याचा सामना केला आहे.
- वेदर ह्या शब्दाचा वापर आपण जेव्हा नाम म्हणुन करतो तेव्हा त्याचा अर्थ हवामान असा होत असतो.
- वेदर म्हणजे हवामानात रोज तसेच दोन चार दिवसांत जो तात्पुरता बदल घडुन येत असतो त्याला आपण वेदर असे म्हणत असतो.
- यात एखाद्या दिवसाचे किंवा तासाचे हवामान जेव्हा आपण इंग्लिशमध्ये सांगत असतो.तेव्हा आपण वेदर हा शब्द वापरत असतो.
उदा.if weather is good i can go for walk.
वरील उदाहरणाचा अर्थ असा होतो की जर आत्ताचे,आजचे हवामान चांगले असेल तर मी चालायला जाऊ शकतो किंवा जाईल.
म्हणजे यात एकदम short period of time विषयी आपण बोलत असतो.तात्पुरत्या कालावधीतील हवामानाविषयी सांगण्यासाठी आपण वेदर हा शब्द वापरत असतो.यात आपण long period of time हवामानाविषयी बोलत नसतो.
पण याच ठिकाणी आजुबाजुचे वातावरण जर आपल्याला ढगाळ झालेले दिसुन येते आहे तर तेव्हा आपण the weather has become cloudy असे म्हणत असतो.
म्हणजेच आजुबाजुचे हवामान हे तात्पुरता ढगाळ झालेले आहे असे आपण सांगत असतो.म्हणजे हवामानात झालेला एक तात्पुरता बदल आपण येथे सांगत असतो.
यात अचानक उन पडणे,पावसाचे वातावरण निर्माण होणे अशा छोटयाशा हवामानातील बदलांचा समावेश हा होत असतो.
आपला दुसरा शब्द आहे climate ज्याला आपण मराठीत हवामान असेच म्हणत असतो.
- पण क्लायमँट ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की एखाद्या प्रदेशाची तसेच भुभागाची कायमची वर्षोनू वर्षांची हवामानाची स्थिती दिर्घकाळासाठी एकच आहे.
- यात आपण एखाद्या प्रदेश तसेच भुभागातील हवामानाची वर्षानुवर्षाची परिस्थिती सांगत असतो जी अल्पकालीन नसुन दिर्घकालीन असते.
- म्हणजेच आपण राहत असलेल्या तसेच एखाद्या विशिष्ट भुभाग तसेच प्रदेशातील कायमचे हवामान कसे आहे हे सांगण्यासाठी आपण climate हा शब्द वापरत असतो.
- उदा एखाद्या न्युज चँनल वर वेदर रिपोर्ट मध्ये एखाद्या विशिष्ट प्रदेशाचे रोजचे तसेच वर्षानुवर्षीचे दैनंदिन हवामान कोरडे आहे का दमट आहे हे सांगत असतात.
- म्हणजेच समजा आपण मुंबईत जर गेलो तर आपल्याला तेथील वर्षानुवर्षीचे हवामान हे नेहमी दमट असलेले दिसुन येते.
- एखाद्या ठिकाणाचे,प्रदेशाचे,भुभागाचे वैशिष्टय सांगताना आपण तिथल्या दिर्घकालीन हवामानाचा जो उल्लेख करत असतो तेच तिथले climate असते.
म्हणजेच
- एखाद्या भुभाग तसेच प्रदेशातील तात्पुरता हवामानाची स्थिती सांगण्यासाठी आपण वेदर हा शब्द वापरतो
- तर याच ठिकाणी तेथील दिर्घकालीन म्हणजेच कायमची रोजची हवामानाची स्थिती सांगण्यासाठी आपण क्लायमँट शब्द वापरत असतो.
Very nice information. Thanku you. So much.
Thank-you very much . we are glad that you liked this article. Thanks again