एम एस सीआयटीचा फुलफाॅम काय होतो?MSCIT Full form in Marathi
एम-एस-सी आयटीचा फुलफाॅम maharashtra state certificate in information technology असा होतो.
एम एस सी आयटीचा अर्थ मराठी मध्ये माहीती तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र असा होत असतो.
आजच्या ह्या डिजीटल क्रांतीच्या युगात मोठ्या माणसांपासून अगदी लहान मुलांपर्यंत सर्वांनाच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक झाले आहे.
एम एस सी आयटी म्हणजे काय?ह्या कोर्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या जातात?
एम एस सी आयटी हा कंप्युटर संबंधित एक मुलभुत स्तरीय अभ्यासक्रम (basic course) आहे.हा कोर्स एमके(maharashtra knowledge corporation Ltd) सीएलने २००१ मध्ये सुरू केला होता.
एम एस बीटीई (maharashtra state board technical education) कडुन आॅफर करण्यात येणारा हा एक महत्वाचा संगणक साक्षरता अभ्यासक्रम आहे.
हया कोर्स मध्ये आपणास संगणकाविषयी सर्व महत्वपुर्ण माहीती दिली जाते.
हा कोर्स केल्यानंतर आपणास कुठेही कंपनीमध्ये तसेच सरकारी खाजगी संस्था तसेच कार्यालयात बॅकेत इत्यादी ठिकाणी कंप्यूटर आॅपरेटर तसेच डेटा एन्ट्री आॅपरेटर म्हणून सहज नोकरी मिळु शकते.
एम एस सी आयटी हा कंप्युटर संबंधित कोर्स महाराष्ट्र सरकारकडुन घेण्यात येत असतो.
ह्या कंप्यूटर संबंधित बेसिक कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना कंप्यूटरचा परिचय करून दिला जातो.कंप्यूटर कसा आॅपरेट करतात.
कंप्युटर आॅन आॅफ कसा करतात हे शिकविण्यात येत असते याचसोबत कंप्यूटर मधील सर्व महत्वाचे फंक्शन जसे की वर्ड,एक्सेल,पाॅवरपाॅईट,एम एस आऊटलुक इत्यादीचे संपूर्ण ज्ञान दिले जाते.
ह्या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना कंप्युटर मधील महत्वाच्या हार्डवेअर पार्ट नेटवर्किंग तसेच साॅफ्टवेअर विषयी माहिती दिली जाते.
जवळपास सर्वच विद्यार्थी हा कोर्स दहावी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा दहावी बारावी मध्ये शिकत असताना आवर्जुन करत असतात.कारण यामध्ये विद्यार्थ्यांना जाणुन घेणे आवश्यक असणारी कंप्यूटर संबंधित सर्व महत्वपूर्ण माहिती दिली जाते.
यात आपणास इंटरनेट,ईमेल वेगवेगळ्या आॅपरेटिंग सिस्टम विषयी माहिती देण्यात येते.
इंटरनेटचा तसेच युटयुब,गुगल, इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर कसा करायचा?ईमेल खाते कसे तयार करायचे ईमेल कसा लिहायचा हे देखील शिकवले जाते.
ह्या कंप्यूटर कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना कंप्यूटर विषयी थेरी, प्रॅक्टीकल ईरा असे तिघे स्वरूपाचे नाॅलेज दिले जाते.
एम एस सी आयटी करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
एम एस सी आयटी हा कोर्स करण्यासाठी कुठल्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली नाहीये.
हा कोर्स आठवी नववी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपासून पोस्ट ग्रॅज्युएट झालेली विद्यार्थी देखील करू शकतात.
एम एस सी आयटी कोर्सचा कालावधी काय असतो?
एम एस सी आयटी हा कोर्स साधारणत तीन ते चार महिने इतक्या कालावधीचा असतो.
हा कोर्स लावल्यावर आपण रोज किती तास कंप्यूटरवर शिकण्यासाठी बसतो यावर देखील ह्या कोर्सचा कालावधी अवलंबून असतो.
समजा आपण हा कोर्स लावल्यावर रोज तीन चार तास कंप्यूटरवर सरावासाठी शिकण्यासाठी बसलो तर अवघ्या तीन महिन्यांत देखील आपण हा कोर्स पुर्ण करू शकतो.
हा कोर्स करण्यासाठी आपणास किमान चार हजार,जास्तीत जास्त सहा हजार इतकी फी लागु शकते.हा कोर्स आपण कुठल्याही मध्यम स्तरीय तसेच मोठ्या संस्थे मध्ये देखील करू शकतो.
मध्यम स्तरीय संस्थेत ह्या कोर्सची फी तीन ते चार हजार इतकी असु शकते तर मोठ्या संस्थेत याची फी सहा हजार पर्यंत असु शकते.
एम एस सी आयटीचे महत्व –
कंप्युटर आयटी क्षेत्रात संगणकाशी निगडीत कुठल्याही एका क्षेत्रात करीअर करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करणे अत्यंत आवश्यक असते.
कारण ह्या कोर्समध्ये कंप्यूटर संबंधित सर्व बेसिक पासुन अॅडव्हान्सड लेव्हल पर्यंतचे नाॅलेज दिले जाते.
एम एस सी आयटी कोर्स केल्यानंतर आपणास महाराष्ट्र शासनाचे एक अधिकृत सर्टिफिकेट प्राप्त होत असते.
ज्याच्या बळावर आपणास कुठेही सरकारी खाजगी संस्था,कार्यालयात बॅकेत कंपनीत कंप्यूटर आॅपरेटर तसेच डेटा एन्ट्री आॅपरेटर नोकरी प्राप्त होऊ शकते.
आज आॅफलाईन तसेच आॅनलाईन पदधतीने देखील कंप्यूटरशी संबंधित विविध जाॅब आपण करू शकतो.
अणि आपण महिन्याला किमान १५ ते २० हजार इतके पैसे सहज कमवू शकतो.
एम एस सी आयटी अभ्यासक्रम –
विंडोज ७
एम एस एक्सेल २०१३
एम एस एक्सेल २०१३
एम एस पाॅवरपाॅईट २०१३
इंटरनेट
एम एस आऊटलुक
ईरा
एम एस सी आयटी परीक्षा स्वरूप –
एम एस सी आयटी परीक्षा ही एकुण १०० गुणांची असते.यात आपणास प्रॅक्टीकल अणि थेरी असे दोघे प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
ही परीक्षा पास झाल्यावर आपणास शासनाचे अधिकृत एम एस सी आयटी सर्टिफिकेट प्राप्त होते.