डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय?Domicile certificate meaning in Marathi

डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय?Domicile certificate meaning in Marathi

डोमेसाईल सर्टिफिकेटचा अर्थ वय अधिवास प्रमाणपत्र असा होत असतो.यालाच कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र,मुळ निवास असे देखील म्हटले जाते.

डोमेसाईल म्हणजे आपले राहण्याचे कायमस्वरूपी निवासाचे कायदेशीर अधिकृत ठिकाण असते.

ह्या सर्टिफिकेट मुळे उमेदवार भारताचा कायमस्वरूपी रहिवासी आहे किंवा नाही त्याचे घर निवासस्थान भारतातीलच आहे किंवा नाही याचा संदर्भ आपणास प्राप्त होत असतो.

पासपोर्ट बनवण्यापासुन इतर सर्व शैक्षणिक,नोकरी विषयक तसेच सर्व महत्वाच्या कामासाठी ह्या सर्टिफिकेटची आवश्यकता असते.

जेव्हा आपण एखाद्या शाळा महाविद्यालयात कुठल्याही पदवी पदविका, इंजिनिअरिंग तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता अॅडमिशन घेत असतो किंवा महाविद्यालयाकडुन शिष्यवृत्ती वगैरे प्राप्त करत असतो तेव्हा तिथे देखील आपल्याकडुन डोमेसाईल सर्टिफिकेट हे निवासी प्रमाण मागितले जात असते.

हे सर्टिफिकेट आपणास जिल्हाधिकारी यांच्या सेतु कार्यालयात महा ई सर्विस सेंटर मध्ये आॅनलाईन किंवा आॅफलाईन ह्या दोघे पद्धतीने उपलब्ध करून दिले जाते.

याचसोबत सीएससी सेंटर सायबर कॅफे वरून देखील आपण हे सर्टिफिकेट काढु शकतो.

हे सर्टिफिकेट आॅफलाईन पद्धतीने काढण्यासाठी आपणास सेतु कार्यालयात जाऊन सर्वप्रथम अर्ज करावा लागतो.

डोमेसाईल सर्टिफिकेट हे सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी करीता देखील खुप आवश्यक असते.याने आपणास निवासी सरकारी नोकरी मध्ये निवासी कोटयाचा लाभ घेता येतो.

आपण ज्या राज्याचे रहिवासी आहे त्याचा रहिवास दर्शवण्याचे काम ह्या सर्टिफिकेट मुळे होते.डोमेसाईल सर्टिफिकेट हे आपणास तहसिलदाराकडुन दिले जाते.

डोमेसाईल सर्टिफिकेट साठी कोणते महत्वाचे कागदपत्रे लागतात?

ओळखीचा पुरावा –

१)आधार कार्ड

२)मतदान कार्ड

३) पासपोर्ट

४) मतदान कार्ड

५) ड्रायव्हिंग लायसन्स

६) अर्जदाराचा दोन पासपोर्ट साईज फोटो

७) स्वयं घोषणा पत्र

See also  Jio Fiber Recharge Plans 2023 : अनलिमिटेड इंटरनेटसह मोफत OTT अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन

पत्याचा पुरावा –

१) पासपोर्ट

२) लाईट बील

३) शिधापत्रिका

४) भाडे पावती

५) पाणीपट्टी पावती

६) मालमत्ता नोंदणी उतारा सातबारा आठ अ उतारा

७) टेलिफोन बिल

वयाचा पुरावा –

१)बर्थ सर्टिफिकेट

२)बोनाफाईड सर्टिफिकेट

३) स्कुल लिव्हींग सर्टिफिकेट

४) वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र

रहिवासाचा पुरावा –

तलाठी तसेच कलेक्टरने दिलेला रहिवासाचा दाखला

डोमेसाईल सर्टिफिकेट आॅनलाईन बनवण्याची प्रक्रिया –

  • डोमेसाईल सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपणास महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईट आपले सरकार महा आॅनलाईन डाॅट जिओव्ही डाॅट इन वर सर्वप्रथम जायचे आहे.
  • वेबसाईटवर गेल्यावर आपल्या समोर एक होम पेज ओपन होईल तिथे आपणास सीटीजन लाॅग इन इ साथी नावाचा एक टॅब दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर new user registration वर क्लिक करून आपली नाव नोंदणी करून घ्यायची आहे.ज्यांचे आधीपासून रेजिस्ट्रेशन झाले आहे ते डायरेक्ट लाॅग इन देखील करू शकतात.
  • रेजिस्ट्रेशन करताना तयार केलेला आपला लाॅग इन आयडी पासवर्ड लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.
  • पुन्हा लाॅग इन केल्यावर प्रमाणपत्र सेवा विभागामध्ये निवास प्रमाणपत्र निवडुन घ्यायचे आहे.
  • यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यात निवास प्रमाणपत्रकरीता अर्ज दिलेला असेल.हा अर्ज व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.
  • ह्या अर्जासोबत आवश्यक ते डाॅक्युमेंट अपलोड करायचे आहे.यात आपला फोटो,स्वप्रमाणित घोषणापत्र, शिधापत्रिका झेरॉक्स इत्यादी.
  • सर्व महत्वाचे डाॅकयुमेंट अपलोड करून झाल्यावर अर्ज सबमिट करून आॅनलाईन पेमेंट करायचे आहे.
  • भरलेल्या अर्जाची झेराॅक्स अणि पेमेंटची पावती हार्ड कॉपी आपण आपल्याकडे संदर्भासाठी ठेवू शकतो.