व्हिनेगर म्हणजे काय? Vinegar meaning in Marathi
व्हिनेगर ह्या शब्दाची निर्मिती एका फ्रेंच शब्द vyn egre पासुन झाली आहे.Vyn egre ह्या शब्दाचा अर्थ सोर वाईन म्हणजेच आंबट दारू असा होतो.
व्हिनेगर हा एक चवीने आंबट असलेला अंमलीय द्रव तसेच खाद्यपदार्थ आहे.व्हिनेगर मध्ये अॅसिटिक अॅसिड हा मुख्य घटक समाविष्ट असतो.हया घटकाचे प्रमाण साधारणतः ४ ते ८ टक्के इतके असते.
व्हिनेगरचा वापर हा प्रामुख्याने कुठल्याही खाद्यपदार्थाचा स्वाद वाढवायला ह्याचा उपयोग केला जातो.
व्हिनेगर मुळे कुठल्याही खाद्य पदार्थाला आंबट चव प्राप्त होते.याचा उपयोग सॅलिड,साॅस केच अप,मांसाहारी खाद्य पदार्थ,चायनीज खाद्य पदार्थ,इत्यादी मध्ये केला जातो.
व्हिनेगरचा उपयोग कुठलाही अन्नपदार्थ खराब होऊ नये म्हणून परिरक्षक म्हणून देखील केला जातो.
मांस,मासे चटणी,साॅस,केच अप,लोणच इत्यादी खाद्यपदार्थामध्ये व्हिनेगर अन्न खराब होऊ नये त्याची नासाडी होऊ नये म्हणून परिरक्षक म्हणून वापरतात.
व्हिनेगर निर्माण करण्यासाठी कंदमुळाचा स्टार्च,कोटस तांदुळ सफरचंद,द्राक्षे नारळपाणी उसाच्या रस इत्यादीवर सेक्रोमाईसिस सेरिव्हीसीज ह्या ईस्ट दवारे किण्वन प्रक्रिया केली जाते.
ह्या किण्वन प्रक्रिया मध्ये धान्य तसेच फळामधील साखरेचे रूपांतर इथेनॉल अल्कोहोल मध्ये केले जाते.हया प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड वायुची देखील निर्मिती होते.
इथेनॉल वर अॅसिटिक अॅसिड बॅक्टेरिया अॅसिटो बॅक्टर ग्लुकोनोबॅक्टर ह्या जिवाणुच्या साहाय्याने किण्वन प्रक्रिया केली जात असते.
ह्या किण्वन प्रक्रियेमध्ये इथेनॉल अल्कोहोलला अॅसिटीक अॅसिड अणि पाण्यामध्ये रूपांतरित केले जाते.
व्हिनेगरचे काही प्रमुख प्रकार कोणकोणते आहेत?
व्हिनेगरची निर्मिती कशापासून केली आहे त्यावरून त्याचे प्रकार निर्धारित केले जातात.
व्हिनेगरचे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत –
१) डिस्टिल्ड व्हाईट व्हिनेगर-
२) अॅपल साईडर व्हिनेगर-
३) बलसामिक व्हिनेगर-
४) व्हाईट वाईन व्हिनेगर-
५) रेड वाईन व्हिनेगर-
६) माल्ट व्हिनेगर –
७) ग्रेप व्हिनेगर –
८) बिअर व्हिनेगर –
९) केंट व्हिनेगर –
१०) ब्लँक व्हिनेगर –
११) शॅम्पेन व्हिनेगर –
१२) राईस वाईन व्हिनेगर-
१३) डेट व्हिनेगर –
१४) अॅपरीकोट व्हिनेगर –
१५) कोकोनट व्हिनेगर –
१६) पाम व्हिनेगर –
परिरक्षक कशाला म्हणतात?
अन्न पदार्थ खराब होऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या पदार्थाला परिरक्षक असे म्हटले जाते.
व्हाईट व्हिनेगरचा उपयोग कशासाठी केला जातो?
व्हाईट व्हिनेगरचा उपयोग हा कुठलीही वस्तु स्वच्छ किंवा निर्जंतुक करण्यासाठी केला जातो.