Education Loan विषयी संपूर्ण माहीती , प्रकार , कागदपत्रे – Education Loan detail information in Marathi  

Education Loan विषयी संपूर्ण माहीती  – Education Loan detail information in Marathi

 आज आपल्या प्रत्येकाची ईच्छा असते की आपण उच्च शिक्षण प्राप्त करावे.आणि शिकुन खुप मोठा इंजिनिअर डाँक्टर,वकिल तसेच अधिकारी व्यक्ती बनावे पण कधी कधी आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला आपल्या ह्या महत्वकांक्षेचा त्याग करावा लागत असतो.

कारण उच्च शिक्षण प्राप्त करून आपली स्वप्र पुर्ण करण्यासाठी आपल्याकडे इतके पुरेसे पैसेच नसतात ज्यात आपल्याला आपले शिक्षण पुर्ण करता येईल.म्हणुन आपल्याला अर्धवट शिक्षण सोडावे लागत असते.

पण आता शिक्षण क्षेत्रात कधीच अशी समस्या निर्माण होणार नाही.कारण शिक्षणावरचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ज्यांची उच्च शिक्षणाचा खर्च करण्याइतकी आर्थिक परिस्थिती नाही पण त्यांना उच्च शिक्षण प्राप्त करायचे आहे.

अशा आर्थिक दृष्टया दुर्बल आणि गरीब विदयार्थ्यांसाठी आज एज्युकेशन लोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आज विविध बँकाकडुन विदयार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन दिले जात असते.

आजच्या लेखात आपण ह्याच एज्युकेशन लोनविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Education Loan म्हणजे काय?

एज्युकेशन लोन हे एक शैक्षणिक कर्ज असते जे आर्थिक दृष्टया कमकुवत तसेच आपल्या शिक्षणाचा खर्च करण्यातकी ऐपत नसलेल्या गरीब घरातील विदयार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पुर्ण करण्यासाठी बँकेकडुन दिले जात असते.

 ज्या विदयार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करायचे आहे पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे,पैशांच्या टंचाईमुळे हे शक्य होत नाहीये.अशा ईच्छुक विदयार्थ्यांना एज्युकेशन लोन हे आर्थिक साहाय्य करण्याचे काम करते.

आपण Education Loan का घ्यायला हवे?

एज्युकेशन लोन घेण्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात.म्हणजे समजा आपल्याकडे जर एज्युकेशन फंड कमी असेल तर एज्युकेशन लोन ही कमतरता भरून काढत असते.

आणि आज एज्युकेशन लोन घेण्याचे इतके फायदे आहेत की श्रीमंत घरातील विदयार्थी देखील एज्युकेशन लोन घेणे अधिक पसंद करतात.

एज्युकेशन लोनचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :

  • एज्यूकेशन लोनमुळे विदयार्थ्यांना आपल्या शिक्षणाची स्वता जबाबदारी उचलून आर्थिक दृष्टया स्वावलंबी बनता येते.
  • एज्युकेशन लोन घेऊन ते वेळेवर फेडल्याने आपली क्रेडिट हिस्टरी तसेच स्कोअर देखील बँकेच्या दृष्टीत चांगला बनवता येत असतो.ज्याने आपल्याला पुढे बँकेकडुन अधिकाधिक सुविधा प्रदान केल्या जात असतात.
  • आणि याचसोबत आईवडिलांवर आपल्या शिक्षणाचा खर्चाचा जो अधिक लोड येत असतो तो आपण एज्युकेशन लोन घेऊन कमी करू शकतो.
  • ज्यांची शिक्षणासाठी खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना एज्युकेशन लोनमुळे शैक्षणिक साहाय्य प्रदान होत असते.
  • आणि शिवाय एज्युकेशन लोनमुळे आपल्याला टँक्स मध्ये देखील बेनिफिट मिळत असतो.
See also  समतोल आहार म्हणजे काय ? What is balanced diet Marathi

Education Loan चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

 एज्युकेशन लोनचे तीन प्रमुख प्रकार पडतात :

1) स्थान आधारीत एज्युकेशन लोन (Location Based Education Loan) :

2) कोर्स तसेच अभ्यासक्रमावर आधारीत एज्युकेशन लोन (Course Based Education Loan) :

3) कोलँटरील बेझिड एज्युकेशन लोन (Collateral Based Educational Loan) :

1)स्थान आधारीत एज्युकेशन लोन (Location Based Education Loan) :

स्थान आधारीत एज्यूकेशन लोन हे दोन प्रकारचे असतात :

  1) देशांतर्गत एज्युकेशन लोन :

  2) परदेशात शिक्षण करण्यासाठी एज्युकेशन लोन :

  •  देशांतर्गत एज्युकेशन लोन : भारतीय शैक्षणिक संस्थेत शिक्षणासाठी सहभागी होण्याची ईच्छा असणारे विदयार्थी हे लोन घेत असतात.हे कर्ज आपल्याला तेव्हाच दिले जाते जेव्हा आपण एखाद्या संस्थेत शिक्षणासाठी प्रवेश घेत अस
  • परदेशात शिक्षण करण्यासाठी एज्युकेशन लोन :ज्या विदयार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण पुर्ण करायचे असेल ते ह्या लोनसाठी अँप्लाय करत असतात. यात अर्जदाराने लोन अँप्रूव्ह करण्यासाठी संस्थेतील एज्युकेशन लोन दिले जात असलेल्या विदयार्थ्यांच्या यादीत आपले नाव असावे लागते.

2)कोर्स तसेच अभ्यासक्रमावर आधारीत एज्युकेशन लोन (Course Based Education Loan) :

हे लोन पालक तसेच विदयाथ्यांने निवडलेल्या शाखा म्हणजेच स्ट्रीममध्ये शिक्षण करण्यासाठी फायनान्स कंपनी देत असतात.

कोर्सवर आधारीत शिक्षणाचे तीन प्रकार पडतात :

  1. स्कुल एज्युकेशन लोन :
  2. काँलेज एज्युकेशन लोन :
  3. करिअर एज्यूकेशन लोन :

    1)स्कुल एज्युकेशन लोन :

स्कुल एज्युकेशन लोन हे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण पुर्ण करण्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणुन आपण घेत असतो.यात आपण बारावी पर्यतच्या शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकतो.

    2) काँलेज एज्युकेशन लोन :

ग्रँज्युएट तसेच अँडर ग्रँज्यूएट शिक्षणासाठी हे लोन दिले जात असते.यात बी एस्सी बी टेक एम एस्सी एम टेक इत्यादींचा समावेश होत असतो.

   3) करिअर एज्यूकेशन लोन :

 विदयार्थी देशांतर्गत राबविल्या जात असलेल्या टेक्निकल काँलेजमध्ये विविध करिअर कोर्स प्रोग्राम मध्ये शिक्षण घेण्यासाठी करिअर एज्युकेशन लोन घेत असतात.

अशा करिअर कोर्समध्ये कंप्युटर सर्टिफिकिट कोर्स,डिप्लोमा कोर्स,आयटी आय कोर्स सर्टिफिकिट नर्सिंग कोर्स सर्टिफिकिट,जाँब देणारा एखादा स्कील बेझिड सर्टिफिकिट कोर्स इत्यादीचा समावेश होत असतो.

3) कोलँटरील बेझिड एज्युकेशन लोन (Collateral Based Educational Loan) :

बहुतेक बँक ह्या लोन देण्यासाठी तारण म्हणुन काहीतरी तारण मागत असतात.यात मालमत्ता,ठेवी,सिक्युरीटी आणि थर्ड पार्टी गँरंटी वर बँक आपल्याला कर्ज देत असतात.

See also  HSN कोड म्हणजे काय ? HSN code information Marathi - 6 अंकीकोड - 5 कोटीपेक्षा जास्त व्यावसायिक उलढाल

Education Loan प्राप्त करण्यासाठी Qualification काय लागते?

एज्युकेशन लोन प्राप्त करण्यासाठी आपल्याला बँकेच्या काही नियम तसेच पात्रतेच्या अटी असतात.ज्या पुर्ण करणे गरजेचे असते.

  • एज्यूकेशन लोन घेत असलेली व्यक्ती भारताची नागरीक असावी.
  • एज्युकेशन लोन घेत असलेल्या उमेदवाराचे वय 18 तसेच 18 पेक्षा अधिक असायला हवे.
  • लोन घेणारया व्यक्तीचे बँकेत खाते असायला हवे.
  • एज्यूकेशन लोन प्राप्त करण्यासाठी आधी विदयाथ्याने संस्था तसेच महाविद्यालयात प्रवेश करणे गरजेचे असते.
  • जो व्यक्ती एज्युकेशन लोनसाठी अँप्लाय करत आहे त्याचे उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.

Educational Loan प्राप्त करण्यासाठी कोणकोणत्या Documents ची आवश्यकता असते?

एज्युकेशन लोन प्राप्त करण्यासाठी आपल्याला पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते.

  • के वायसी डाँक्युमेंटस
  • मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • संस्था तसेच महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा अँडमिशन लेटर तसेच अँडमिशन फी पावती इत्यादी.
  • दहावी बारावीचा रिझल्ट सर्टिफिकिट

आपल्याला जास्तीत जास्त बँकेकडुन किती Education Loan प्राप्त होऊ शकते?

  • आपण किती ऋण घेत आहात या आधारावर बँकेकडुन आपल्याला 100% पर्यत लोन प्राप्त होवू शकते .
  • सध्या एज्युकेशन लोनसाठी चार लाख मार्जिन मनीची आवश्यकता नसते.म्हणजेच आपल्याला चार लाखापेक्षा कमी लोन हवे असेल तर मार्जिन मनी द्यायची आवश्यकता पडत नसते.आणि बँक चार लाखापर्यतच्या लोनसाठी कोणतेही तारण देखील मागत नसते.किंवा थर्ड पार्टी गँरंटी देखील मागत नाही.
  • चार लाखापेक्षा अधिक लोनसाठी भारतातील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आपल्याला 5 टक्के आपल्याला स्वता भरावे लागत असतात.आणि परदेशातील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी 15 पर्यत मार्जिन मनीत वाढ होत असते.
  • आणि शैक्षणिक कर्ज प्राप्त करण्यासाठी चार लाखापासुन 5 लाख पर्यत कोणत्याही थर्ड पार्टी गँरंटीची गरज नसते.
  • लोनचे अँप्लीकेशन स्वीकार केल्यानंतर बँक दिलेल्या फीच्या स्टेटमेंटनुसार महाविद्यालय तसेच विद्यापीठाकडे कँश पाठवत असते.

Education Loan घेण्यासाठी Best Bank कोणकोणत्या आहेत?

आज भारतातील अनेक बँक आहेत ज्या आपल्याला एज्युकेशन लोनची आँफर देत असतात.एवढेच नाही तर अनेक फायनान्स कंपनी देखील आपल्याला एज्युकेशन लोन प्रोव्हाईड करत असतात.

ज्युकेशन लोन देत असलेल्या भारतातील काही फेमस बँक तसेच फायनान्स संस्था पुढीलप्रमाणे आहेत :

  • एस बी आय एज्युकेशन लोन
  • एच डी एफ सी एज्यूकेशन लोन
  • अँक्सिस बँक एज्युकेशन लोन
  • कँनरा बँक एज्युकेशन लोन
  • पंजाब नँशनल बँक एज्यूकेशन लोन
  • विजया बँक एज्युकेशन लोन
  • आय डी बी आय बँक एज्युकेशन लोन

एन बी एफसी –

  • अवनसे
  • इंक्रिड

इत्यादींचा समावेश यात होतो.

Educational Loan साठी Apply करण्याची संपुर्ण Process काय असते?

 एज्यूकेशन लोनसाठी अर्ज करताना सर्वप्रथम आपल्याला हे पहावे लागते की ज्या कोर्ससाठी आपण अँडमिशन घेतो आहे तो पुर्ण करण्यासाठी बँककडुन आपल्याला एज्युकेशन लोन प्राप्त होणार आहे की नाही.

  • आपल्याला बँकेकडुन किती एज्युकेशन लोन हवे आहे आणि आपल्याकडे किती रक्कम आहे जी आपण एज्यूकेशनसाठी खर्च करणार आहे.
  • आणि मग सर्व एज्युकेशन लोन देत असलेल्या बँकांची एक यादी तयार करावी आणि मग सगळयांची व्यवस्थित तुलना करून कोणतेही एक असे बँक निवडायला हवे जे आपल्या गरजांची पुर्तता करेल.
  • मग कोणत्या बँकेत लोन घ्यायचे आणि किती लोन घ्यायचे हे ठरवून झाल्यावर बँकेत लोनसाठी अँप्लाय करायचे असते.
  • मग बँकेकडुन आपले लोन अप्रूव्ह करून झाल्यावर बँकेने सांगितलेल्या सर्व महत्वाचे डाँक्युमेंट बँकेत जमा करायचे असतात.
  • मग शेवटी लोनच्या डाँक्युमेंटस वर सही करून झाल्यावर बँक लोनचे अमाऊंट आपल्याला हपत्यानुसार देत असते किंवा आपण शिक्षण घेत असलेल्या काँलेज इंस्टीटयुट मध्ये डायरेक्ट जमा करत असते.
See also  FSSAI फुल फॉर्म मराठी - FSSAI  संपूर्ण माहिती - FSSAI full form in Marathi

Education Loan मध्ये काय काय Cover केले जाते?

 एज्युकेशन लोनमध्ये पुढीलप्रमाणे अनेक बाबी कव्हर केल्या जातात.

  • अँडमिशन फी
  • महिन्याभराची फी
  • परिक्षा फी
  • वहया पुस्तके इत्यादी एज्यूकेशन मटेरिअल
  • परदेशात एज्यूकेशनला जाताना विमानाचा खर्च
  • अभ्यासासाठी लँपटाँप तसेच कंप्युटर
  • होस्टेलचा राहण्या खाण्याचा खर्च
  • इंशुरन्स प्रिमियम
  • शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रोजेक्ट वगैरे साठी लागणारा इतर खर्च

आज अशा अनेक बँक आहेत ज्या एज्युकेशन लोनसोबत आपल्या इतर बाबींचा खर्च देखील कव्हर करत असतात.

ज्यात एसबी आय एज्युकेशन लोन,बँक आँफ बडोदा एज्युकेशन लोन,एचडी एफसी एज्यूकेशन लोन इत्यादी एज्युकेशन आँफर देत असलेल्या बँकांचा समावेश होतो.

Educational Loan चा Interest Rate काय असतो?

 एज्यूकेशन लोन म्हणजे लोन घेत असलेला अँप्लायर मुळ लोन अमाऊंट घेण्यासाठी काही व्याज बँकेला देत असतो तसेच बँक ते आकारत असते.यालाच इंटरेस्ट रेट असे म्हणतात.

आय बी ए आणि आरबी आयच्या रूल्सनुसार लोन इंटरेस्ट हा सारखा राहत नसतो त्यात वेळोवेळी बँकेकडुन लोन अमाऊंटनुसार बदल केले जात असतात.

Education Loan घेण्याचे Tax Benefit कोणकोणते असतात?

 एज्युकेशन लोन घेण्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात.

  • 1961 च्या कलम 80E (इनकम टँक्स लाँ) एज्युकेशन लोनवरील व्याजावर कर्जदाराच्या इन्कममधून वजावट म्हणून आपण दावा करू शकतो.
  • यात आपण कोणतीही वरची कमाल मर्यादा तसेच कँपशिवाय बेनिफिटसाठी क्लेम करू शकतो.
  • इंडियामध्ये तसेच फाँरेनमध्ये फुल टाईम पार्ट टाईम एज्युकेशन,बिझनेस एज्युकेशनसाठी सवलत उपलब्ध होत असते.
  • आपल्या स्वताच्या,पार्टनरच्या किंवा मुलाच्या एज्युकेशनसाठी किंवा ज्या विद्यार्थांचे कायदेशीर पालक आहेत त्यांच्यासाठी दिलेल्या लोन मधील व्याजवर सवलत उपलब्ध असते.

Education Loan ची Repayment Process कशी असते?

  •  जोपर्यत आपण घेतलेले पुर्ण एज्युकेशन लोन परतफेड होत नाही तोपर्यत आपल्याला नियमितपणे ईएम आय भरावा लागतो ज्यात आपल्याला व्याज देखील भराव लागत असते .
  • आणि आपण हे लोन परतफेडीस सुरूवात कधीपासुन करायची हे लोनच्या प्रकारवर देखील अवलंबुन असते.यात आपल्याला भागवता येईल तशी ईम आय रक्कमची निवड आपण करू शकतो.
  • आणि यात आपण मुख्य कँश लोन वेळेत परतफेड केली नाहीत नाही तर आपल्याला दिलेल्या कालावधीनुसार त्याचे व्याज देखील भरावे लागते.
  • म्हणजेच थकलेले लोन अमाऊंट कमी न होता आपल्यावर व्याजाचा भार वाढत जातो.आणि एकुण लोनचची रक्कम देखील वाढत असते.
  • पण आपण लवकरात लवकर लोनचे अमाऊंट फेडले तर आपला क्रेडिट स्कोअर देखील चांगला राहत असतो.
  • एज्युकेशन लोनचे रिपेमेंट करण्यासाठी आपल्याला बँक मँनेजरशी संपर्क साधावा लागतो मग बँक मँनेजर आपल्या खात्याच्या संपुर्ण तपशीलाची नोंद करून आँटो डिडकशन मोडवर रिपमेंटची सुरूवात करत असतो.

RBI लोन नियमावली

1 thought on “Education Loan विषयी संपूर्ण माहीती , प्रकार , कागदपत्रे – Education Loan detail information in Marathi  ”

  1. परदेशी शिक्षनासाठी 20लाख रू education loan हवे असल्यास प्रॉपर्टी मोर्गेज करणे गरजेचे आहे का

Comments are closed.