Hacking व Ethical Hacking म्हणजे काय? -Ethical Hacking Marathi information
Hacking म्हणजे काय?
Hacking म्हणजेच एखाद्या संगणक प्रणाली मधील कमतरता शोधून त्या कमतरतेचा फायदा घेत संगणकाला किंवा संगणकाच्या मालकाला त्याविषयी सांगणे किंवा त्याचा फायदा घेणे होय. अनेकदा हॅकिंग म्हणजे एखादे सोशल मीडिया खाते हॅक करून त्यावरून विचित्र काहीतरी अपलोड करणे हे आपण ऐकतो मात्र याशिवाय देखील हॅकिंगचे विश्व भरपूर मोठे आहे.
हॅकिंग मध्ये संगणकाशी निगडित सर्व गोष्टी हॅकर हॅक करून त्याच्या फायद्याने त्या संगणकाच्या मालकाचा डेटा चोरी करून त्याला ब्लॅकमेल देखील करतात. अशा काही गोष्टी आपण दररोज ऐकत असतो की आपल्याला वाटते की हॅकिंग पूर्णपणे illegal आहे. मात्र तसे नाही, अनेकदा हॅकिंगच्या चांगल्या बाजूचा विचार देखील आपण करत नसतो.
Hacking चा इतिहास
1960 या वर्षी MIT मध्ये हॅकिंग या शब्दाचा जन्म झाला असावा असे सांगितले जाते. त्यावेळी सर्वात आधी एक संगणक हॅक केले गेले होते. त्यानंतर अनेकांनी आपल्या डेटा ची सुरक्षितता लक्षात घेता आपला डेटा हॅकिंग कसा होणार नाही याकडे लक्ष दिले. मात्र अनेक हॅकर्स ने सिस्टम मधील कमतरता शोधून काढत आजतागायत अनेकदा अनेक सिस्टम हॅक केल्या आहेत.
हॅकर्सचे प्रकार
हॅकर्स काय काम करतात आणि त्यांचा हेतू काय असतो यावरून हॅकर्सचे मुख्य 3 प्रकार आहेत.
- ब्लॅक हॅट हॅकर्स
शक्यतो आपण ज्या घटना ऐकतो त्या या ब्लॅक हॅट हॅकर्स कडूनच घडलेल्या असतात. हे हॅकर्स कोणत्याही परवानगी शिवाय एखाद्या संगणक प्रणाली मध्ये शिरकाव करतात आणि त्या व्यक्तीचा किंवा कंपनीचा डेटा ते चोरी करतात. यामध्ये फायनान्शियल माहिती चोरी करण्याचे प्रमाण अधिक असते. नेट बँकिंग किंवा एटीएम पिन सारख्या महत्वाच्या गोष्टी शक्यतो।हे हॅकर्स हॅक करतात.
व्हाईट हॅट हॅकर्स
ब्लॅक हॅट हॅकर्सच्या पूर्णपणे विरुद्ध कार्य हे व्हाईट हॅट हॅकर्सचे असते. संगणक प्रणाली किंवा वेबसाईटच्या मालकी कंपनीकडून परवानगी घेऊनच मग हे व्हाईट हॅट हॅकर्स हॅकिंग करत असतात. आपल्या संगणक प्रणाली किंवा वेबसाईट किंवा अँप मधील कमतरता दूर करून तिला अधिकाधिक मजबूत आणि सुरक्षित बनविण्यासाठी व्हाईट हॅट हॅकर्स आपली मदत करत असतात.
ग्रे हॅटहॅकर्स
ग्रे हॅट हॅकर्स हे स्वतःच्या फायद्यासाठी किंवा पैशांसाठी हॅकिंग करत नाहीत मात्र ते शिकण्यासाठी एखाद्याची परवानगी न घेता त्यांची साईट हॅक करत असतात. मात्र हे देखील गैरकानुनी आहे. ते कोणत्याही प्रकारे परवानगी घेत नाहीत म्हणून ते illegal च आहे. ब्लॅक हॅट हॅकर्स प्रमाणे ते स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी चोरी करत नसतात. ते त्या कंपनीला सापडलेल्या कमतरतेची माहिती देखील देतात. त्यामुळे हे हॅकर्स तसे ब्लॅक हॅट हॅकर्स इतके धोकादायक नसतात.
हॅकिंगचे प्रकार
वेबसाईट हॅकिंग – आपली वेब सर्व्हर वरील माहिती मग त्यात डेटाबेस असतील किंवा इंटरफेस असतील तर ते हॅक करून त्यावरून चुकीची माहिती वेबसाईट हॅकिंग मध्ये प्रदर्शित केली जाते.
ईमेल हॅकिंग – यामध्ये हॅकर्स कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता एखाद्याच्या ईमेल चा ऍक्सेस घेऊन त्याचा वापर करतो.
नेटवर्क हॅकिंग – एखाद्या ठिकाणी जर अनेक संगणक नेटवर्क मध्ये असतील आणि त्यांच्यातील एक संगणक हॅक करून त्यांचा सर्व डेटा आपल्याकडे घेणे याला नेटवर्क हॅकिंग म्हणतात. शक्यतो हे कंपन्यांमध्ये घडते.
सोशल मीडिया हॅकिंग – आपले सोशल खाते पासवर्ड आणि आयडीच्या साहाय्याने हॅक करून त्यावरून विचित्र कंटेंट प्रदर्शित केला जातो किंवा त्या सोशल मीडिया युझरला ब्लॅकमेल केले जाते.
Ethical Hacking काय आहे?
Ethical Hacking ती हॅकिंग असते ज्यामध्ये हॅकरला सर्व काही येत असते मात्र तो त्याच्या हॅकिंग मधील ज्ञानाचा वापर हा चोरीच्या मार्गाने ने करता त्या सिस्टमला अधिक सिक्युअर बनविण्यासाठी करत असतो. अनेकदा आपण एखादी सिस्टम वापरत असतो मात्र त्यातील कमतरता आपल्याला समजत नाही. अशा वेळी हे ethical hackers आपल्याला आपल्या सिस्टम मध्ये काय कमतरता आहेत ज्यांच्यावर इतर हॅकर्स नजर ठेवून असू शकतात, त्याविषयी माहिती देतात. याशिवाय Ethical Hackers हे आपली सिस्टम मधील कमतरता दूर करण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने मदत देखील करतात.
Ethical Hackers ला अनेक कंपन्या आता स्वतःच्या सिक्युरिटी कारणांसाठी जॉब देत आहेत. बँकांमध्ये त्यांचे डेटाबेस, कंपनीत त्यांच्या माहितीच्या सुरक्षिततेसाठी हे ethical hackers काम करतात. कंपन्यांकडून Ethical Hackers ला वेबसाईट किंवा डेटाबेस हॅक करण्यासाठी परवानगी दिलेली असते. हॅकिंग करताना कुठे कमतरता आहेत याची ते चाचणी घेतात आणि मग पुढे जाऊन कंपनीला त्या कमतरतेला सुधारता येते.
Ethical Hacking चे फायदे
- आपल्या प्रणालीची सुरक्षितता वाढविण्यासाठी आपण आधीच Ethical Hackers च्या मदतीने सिक्युरिटी वाढवू शकतो.
- जेव्हा कधी आपली एखादी माहिती हरवते मग त्यात पासवर्ड असतील किंवा युझरनेम असतील तर ते जर आपल्याला इतर पद्धतीने मिळत नसतील तर मग आपण Ethical Hacking मार्गाने ते मिळवू शकतो.
- Ethical Hackers आपल्या सिस्टमची सर्व बाजूनी सुरक्षितता तपासत असतात. त्यामध्ये हॅकिंग चे सर्व मार्ग बंद कसे करता येतील याकडे त्यांचे लक्ष असते.
Am interested in ethathicle hacking….Contact details pls
Hi Sir me bhi hecking sikna chathau but Muje social crime hacking interest ye muje samj nhi ara me konsi hecking sikhu. muje social crime hacking sikni ye ap madat kr sakte ho!