फादर्स डे साठी गिफ्ट आयडीयाज Father days gift ideas in Marathi
खुप जणांना असा प्रश्न पडत असतो की फादर्स डेच्या दिवशी वडीलांना काय गिफ्ट देऊ?असे कोणते गिफ्ट देऊ की आपल्या वडिलांना ते आवडेल.
यासाठी मित्रांनो आपणास आपल्या वडिलांचा स्वभाव कसा आहे?त्यांना कशाची आवड आहे?त्यांची लाईफस्टाईल कशी आहे?ते माँर्डन आहे का त्यांचे विचार माँर्डन आहेत का?त्यांची राहणीमान साधे आहे का हे सर्व बघावे लागेल मग त्यानुसारच आपण आपल्या वडिलांना एखादे चांगले अप्रतिम योग्य गिफ्ट देऊ शकतो.
आज आपण अशाच काही गिफ्टविषयी माहीती जाणुन घेणार आहोत जे आपण फादर्स डे च्या दिवशी आपल्या वडिलांना गिफ्ट देऊ शकतो आणि त्यांना ते आवडेलही.
1)जर आपले वडील म्युझिक प्रेमी असतील आणि त्यांना गाणे ऐकायला आवडत असेल तर –
आपण त्यांना ब्लुटुथ स्पीकर गिफ्ट देऊ शकतो.ज्याने ते घरात,घराच्या बाहेर प्रवासात असताना देखील गाणे ऐकु शकतात.
किंवा आपल्या वडिलांना जुने गाणे ऐकायला आवडत असेल तर आपण त्यांना सारेगामा कारवा भेट म्हणुन देऊ शकतो.यात सर्व जुन्या गाण्यांचा संग्रह असतो.ही अशी जुनी गाणी त्यांच्या जुन्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करतील.
किंवा याचठिकाणी आपल्या वडिलांना गाणे ऐकण्यासोबत एखादे संगीत वाद्य वाजवण्याची आवड असेल तर आपण त्यांच्या आवडते एखादे संगीत वाद्य त्यांना भेट म्हणुन देऊ शकतो.
अणि समजा आपल्याकडे सारेगामा कारवा तसेच संगीत वाद्य घेण्याइतके पैसे नसतील तर येथे आपण आपल्या वडिलांना एखादे छोटेसे हातात घेऊन कुठेही नेता येईल फिरता येईल असे म्युझिक प्लेअर देखील गिफ्ट म्हणुन देऊ शकतो.
याचसोबत अजुन भरपुर पर्याय आहेत जसे की आपल्या वडिलांना एकांतात राहायला आवडत असेल तर दुर एकांतात बसुन त्यांना गाणे ऐकणे पसंद असेल तर अशा वेळी आपण त्यांना हेडफोन गिफ्ट म्हणून देऊ शकतो.जेणेकरून त्यांना एकांतात संगीताचा आनंद घेता येईल.
2) जर आपले वडिल पर्सनालिटी लव्हर असतील त्यांना एकदम हँण्डसम दिसण्याची टिपटाँप राहायची आवड तसेच सवय असेल तर –
जर आपल्याला वाटत असेल की आपल्या पर्सनँलिटी लव्हर वडिलांनी नेहमी हँण्डसम आणि स्मार्ट दिसावे तर आपण आपल्या वडिलांच्या पर्सनँलिटीला उठावदारपणा आणणारया वस्तु त्यांना गिफ्ट करायला हव्यात.
ट्रिमर शेव्हर ह्या दोन अशा वस्तु आहेत.ज्या आपल्या वडिलांना घरच्या घरी दाढी कटिंग करताना नेहमी कामे येतील.किंवा याचठिकाणी आपण त्यांना एखादे शेव्हिंग किट देखील गिफ्ट करू शकतो.
बाहेर उन्हात गेल्यावर आपल्या वडिलांच्या डोळयांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आपण त्यांना गाँगल देखील गिफ्ट म्हणुन देऊ शकतो.कारण कुठलाही सिझन असो बाहेर थोडेफार उन हे असतेच.गाँगलमुळे त्यांच्या डोळयांना उन्हाचा त्रास होणार नाही.
याचबरोबर आपण आपल्या वडिलांना एखादा चांगला टी शर्ट,कुडता तसेच जँकेट देखील गिफ्ट मध्ये देऊ शकतो.जँकेट घातल्यावर त्यांची पर्सनाँलिटी अजुन उठावदार दिसू लागेल आपले वडील अजुन डँशिंग दिसायला लागतील.
3) जर आपल्या वडिलांना चहा,काँफी इत्यादीची आवड असेल ते चहा तसेच काँफीप्रेमी असतील –
जर आपल्या वडिलांना रोज सकाळी उठल्यावर चहा काँफी पिण्याची सवय असेल तर आपण त्यांना एखादा टी/काँफी मग गिफ्ट करू शकतो.
किंवा आपल्या वडिलांना जर काँफी बिन्समध्ये रूची असेल तर आपण त्यांना काँफी बिन्स देखील भेट म्हणुन देऊ शकतो.किंवा रोज काँफी बनवण्यासाठी आपण त्यांना एखादे काँफी मेकर गिफ्टच्या स्वरूपात देऊ शकतो.
4) आपल्या वडिलांना जर फोटोग्राफीमध्ये रूची असेल ते फोटो ग्राफर असतील तर –
जर आपल्या वडिलांना फोटोग्राफीची आवड असेल तर आपण त्यांना एखादे कँमेरा फोन लेन्स गिफ्ट म्हणुन देऊ शकतो.जे त्यांना मोबाईलला कनेक्ट करून देखील वापरता येईल.
त्यांच्या कँमेरयाची बँटरी संपल्यावर त्यांना उपयोगी पडेल असे एखादे गिफ्ट देऊ शकतो.जसे की सोलार पाँवर कँमेरा स्ट्रँप ज्याने आपल्या वडिलांना कोणत्याही इलेक्ट्रिक सपोर्टविना तसेच बँटरीविना त्यांचा कँमेरा चार्ज करता येईल.किंवा आपण त्यांना कँमेरा युएसबी ड्राईव्ह देखील गिफ्ट म्हणुन देऊ शकतो.
5) आपल्या वडिलांना फिरण्याची प्रवास,भटकंती करण्याची आवड असेल तर –
जर आपल्या वडिलांना फिरायला भटकंती करायला आवडत असेल तर अशा आपल्या प्रवासप्रेमी वडिलांना आपण एखादी ट्ँव्हल बँग गिफ्ट म्हणुन देऊ शकतो.
तसेच बाहेरगावी तसेच प्रवासात असताना आपल्या वडिलांना त्यांच्या मोबाईलची बँटरी लवकर रिचार्ज करता यावी यासाठी एखादे पाँवर बँक देखील आपण त्यांना देऊ शकतो.
किंवा प्रवासात वापरायला आपण त्यांना एखादे हँण्ड फ्री हेडफोन गिफ्ट करू शकतो.जे त्यांना ब्लुटुथला कनेक्ट करून युझ करता येतील.
जर आपले वडिल नेहमी विमानाने प्रवास करत असतील तर अशा वेळी आपण त्यांना प्रवासात झोपताना त्यांची मान खालीवर होऊ नये याकरीता एखादा ट्रँव्हल पिलो गिफ्टमध्ये देऊ शकतो.
किंवा प्रवासामध्ये चहा काँफी ने आण करायला फ्लास्कची आवश्यकता ही प्रत्येकाला असतेच.याकरीता आपण आपल्या वडिलांना ट्ँव्हल फ्लास्क गिफ्ट देऊ शकतो.
6) जर आपले वडील वाचनप्रेमी असतील त्यांना वाचणाची लिखाणाची आवड असेल तर –
जर आपल्या वडिलांना वाचनाची आवड असेल त्यांना पुस्तक वाचायला आवडत असेल तर आपण त्यांना एखादा त्यांच्या आवडत्या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकांचा संच गिफ्ट करू शकतो.किंवा बाजारात आलेले एखादे नवे चांगले पुस्तक देखील गिफ्टमध्ये देऊ शकतो.
आपल्या वडिलांना नेहमी वाचन करता यावे याकरीता एखादे एखाद्या मँगझिनचे सबस्क्रिप्शन घेऊन त्यांना ते गिफ्ट करू शकतो.
7) जर आपले वडील फुडलव्हर असतील त्यांना खाण्यापिण्याचा शौक असेल तर –
जर आपले वडील फुडलव्हर असतील त्यांना खाण्यापिण्याचा शौक असेल तर आपण त्यांना एखाद्या चांगल्या हाँटेलात त्यांच्या आवडीचे सर्व पदार्थ समाविष्ट असलेली एखादी ट्रिट सरप्राईज डिनर पार्टी देऊ शकतो.किंवा घरच्या घरी सुदधा आपण त्यांच्या आवडीचा एखादा चांगला पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालू शकतो.
8) जर आपले वडील फिटनेस फ्रीक असतील त्यांना नेहमी एक्सर्साईज व्यायाम करायची आवड,सवय असेल तर –
जर आपले वडिल त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत दक्ष असतील नियमित जिम जात असतील तर आपण त्यांना जिममध्ये नेहमी लागणारया महत्वाच्या वस्तु गिफ्ट देऊ शकतो.
दिवसभरात त्यांनी केलेल्या शारीरीक अँक्टीव्हीटीकडे लक्ष ठेवता यावे आणि त्यातुन त्यांची किती कँलरी बर्न झाली हे कळावे यासाठी आपण त्यांना पँडोमीटर तसेच फिटबीट गिफ्ट करू शकतो.
जिमला जाण्यासाठी आपल्या वडिलांनी एखादी चांगली जिम बँग गिफ्ट म्हणुन आपण देऊ शकतो.
9) आपले वडील जर देवध्यानी आणि धार्मिक प्रवृत्तीचे असतील तर –
जर आपले वडील देवध्यान करणारे आणि धार्मिक प्रवृत्तीचे असतील तर आपण त्यांना फादर्स डेला एखादे धार्मिक देवाचे पुस्तक गिफ्टमध्ये देऊ शकतो.
उदा,भगवदगीता,रामायण,महाभारत इत्यादी.
किंवा त्यांना एखाद्या देवधार्मिक स्थळी फिरायला जाण्यासाठी सहलीची ट्रँव्हलिंगची एखादी ट्रीप प्लँन करू शकतो किंवा एखाद्या धार्मिक स्थळी त्यांना घेऊन जाण्यासाठी आँनलाईन तिकिट बुक करू शकतो.
किंवा सर्व फँमिली मिळून एखाद्या धार्मिक स्थळी बाहेरगावी देवदर्शनाला जाऊ शकतो.
10) जर आपल्या वडिलांना लेटेस्ट मोबाईल वापरायला आवडत असेल तर–
जर आपल्या वडिलांना लेटेस्ट मोबाईल वापरायला आवडत असेल ते नेहमी लेटेस्ट मोबाइल वापरत असतील तर आपण त्यांना बाजारात आलेला एखादा लेटेस्ट मोबाइल देखील गिफ्ट करू शकतो.