फायनान्शिअल फ्रिडम म्हणजे काय? – Financial freedom meaning in Marathi
आज आपल्यातील प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की त्याच्या जीवनात कुठलीही आर्थिक अडचण असु नये त्यास पैशांची चणचण भासू नये.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर आज प्रत्येकाला पैसे कमविण्याच्या चिंतेपासुन मुक्त व्हायचे आहे.यासाठी आज प्रत्येकाला फायनान्शिअल फ्रिडम हवे आहे म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचे आहे.
आजच्या लेखात आपण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? आर्थिक स्वातंत्र्य कशाला म्हणायचे?हे जाणुन घेणार आहोत.
फायनान्शिअल फ्रिडम म्हणजे काय?फायनान्शिअल फ्रिडम कशाला म्हणायचे?
फायनान्शिअल फ्रिडम म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणे तसेच पैशांच्या अडचणीपासुन चिंतेपासुन मुक्त होणे होय.
फायना्नशिअल फ्रीडमचा अर्थ असा होतो की आपल्याकडे किमान इतकी पैशांची सेव्हींग तसेच गुंतवणूक असायला हवी.ज्यात आपण आपला अणि आपल्या कुटुंबाचा महिन्याचा राहण्याचा,खाण्याचा मुलभूत खर्च तसेच दैनंदिन जीवनातील इतर खर्च आरामशीर भागवू शकतो.
फायना्नशिअल फ्रीडमचे उदाहरण:
उदा,राहुल नावाचा एक नोकरदार व्यक्ती आहे जो एका क़ंपनीत नोकरीला आहे राहुलचा महिन्याचा राहण्याचा,खाण्याचा तसेच प्रवास वगैरे करण्याचा,घरातील इतर मुलभूत खर्च एकुण ३० ते ४० हजार इतका आहे.
अणि हेच ३० ते ४० हजार राहुलला दररोज नोकरीवर न जाता जर दर महिन्याला त्याच्या गुंतवणूकीतील पैशांमधुन जर दरमहा मिळत असतील तर राहुल हा फायनान्शिअली फ्री आहे असे म्हणता येईल.
थोडक्यात रोज अँक्टिव्हली काम न करता देखील आपणास आपल्या केलेल्या गुंतवणुकीतुन बचती मधून आपला रोजच्या दैनंदिन जीवनातील मुलभूत खर्च
भागवता येईल इतका पैसा प्राप्त होत असेल तर समजायचे आपण फायना्नशिअली फ्री आहोत.आपण पैशाच्या चिंतेपासुन मुक्त झालो आहे.
फायनानशिअल फ्रीडम प्राप्त करण्यासाठी आपणास कशाची आवश्यकता असते?
फायनानशिअल फ्रीडम प्राप्त करण्यासाठी आपणास भविष्यात चांगले रिटर्न प्राप्त होतील अशा एखाद्या चांगल्या ठिकाणी आपल्या पैशांची गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते.
तसेच पेसिव्ह इन्कमचे विविध सोर्स तयार करण्याची आवश्यकता आहे.जिथून आपणास अँक्टिव्हिली काम न करता देखील मंथली इन्कम येत राहील.
फायनानशिअल फ्रीडम प्राप्त करणे का गरजेचे आहे?
रोजच्या दैनंदिन जीवनातील पैशांच्या अडी अडचणीपासुन चिंतेपासुन कायमचे मुक्त होण्यासाठी आपणास फायनानशिअल फ्रीडम प्राप्त करणे गरजेचे आहे.
फायना्नशिअल फ्रीडम प्राप्त कसे करायचे?
● सर्वप्रथम आपली सध्याची आर्थिक स्थिती काय आहे आपल्या खात्यात सध्या किती पैसे शिल्लक आहे आपल्याकडे किती सेविंग इन्वहेस्ट्मेंट आहे हे बघायचे.
● फायनानशिअली फ्री होण्यासाठी आपल्याला किती पैशांची आवश्यकता आहे आपले फायनान्शिअल ध्येय हे नोट करून घ्यायचे.
● मंथली किती गुंतवणूक केल्यावर आपले टार्गेट किती वर्षात पूर्ण होईल हे बघायचे.त्यानुसार गुंतवणूक करण्यासाठी स्कीम बघायची.अणि तिची गुंतवणूक करण्यासाठी निवड करायची.
● अनावश्यक खर्च करणे टाळावे.
● आपल्या सर्व खर्चाचा हिशोब ठेवत जायचा.
● आधी बचत तसेच गुंतवणूक मग खर्च हा नियम पाळायचा.