फस्ट पार्टी,सेकंड पार्टी अणि थर्ड पार्टी इंशुरन्स म्हणजे काय?First party insurance, second party insurance and third party insurance
फस्ट पार्टी कोणाला म्हटले जाते?
गाडीचा,कारचा जो मुख्य मालिक असतो ज्याने गाडी खरेदी केलेली असते.अणि आपल्या गाडीचा कारचा इत्यादी वाहनाचा इंशुरन्स देखील काढलेला असतो.त्याला फस्ट पार्टी असे म्हटले जाते.
सेकंड पार्टी कोणाला म्हटले जाते?
वाहनाच्या मालकाने ज्या कंपनीकडुन विमा पाॅलिसी खरेदी केलेली असते.त्या इंशुरन्स कंपनीला सेकंड पार्टी असे म्हटले जाते.
थर्ड पार्टी कोणाला म्हटले जाते?
थर्ड पार्टी म्हणजे विमा पॉलिसी खरेदी करणारा अणि विमा पॉलिसी विकत असलेल्या कंपनी व्यक्तीरीक्त इतर तिसरी व्यक्ती जिला वाहनाच्या मालकापासुन नुकसान होण्याची शक्यता असते.
थर्ड पार्टी मध्ये अशा सर्व वाहनांचा तसेच व्यक्तींचा समावेश होत असतो ज्यांच्या वाहनाला आपल्या वाहनापासुन नुकसान होण्याची ईजा होण्याची शक्यता असते.
थर्ड पार्टी इंशुरन्स म्हणजे काय?
थर्ड पार्टी इंशुरन्स पाॅलिसी मध्ये आपल्या वाहनामुळे झालेल्या अपघातात समोरच्या व्यक्तीच्या वाहनाचे जे काही नुकसान झाले आहे त्या व्यक्तीच्या झालेल्या सर्व नुकसानाची भरपाई थर्ड पार्टी इंशुरन्स पाॅलिसी मध्ये केली जात असते.
म्हणजे यात वाहन मालकामुळे,आपल्यामुळे झालेल्या अपघातात इतर व्यक्तींचे त्यांच्या वाहनाचे जे नुकसान होते त्याची नुकसानभरपाई थर्ड पार्टी इंशुरन्स पाॅलिसी मध्ये केली जात असते.
थर्ड पार्टी इंशुरन्स हा इंशुरन्स कंपनी अणि पाॅलिसी धारक यांच्यात झालेला एक विशिष्ट करार असतो.यात पाॅलिसी धारक इंशुरन्स कंपनीला काही प्रिमियम देत असतो.
त्या बदल्यात इंशुरन्स कंपनी पाॅलिसी धारकाच्या वतीने समजा कुठल्याही वाहनाचे नुकसान झाले तर त्या वाहनाच्या नुकसान भरपाईचा खर्च पाॅलिसी धारकाच्या वतीने इंशुरन्स कंपनी पे करते.
थर्ड पार्टी इंशुरन्स घेणे का गरजेचे आहे?
मोटार वाहन नियम कायद्यानुसार वाहन मालकाने थर्ड पार्टी इंशुरन्स पाॅलिसी खरेदी करणे अनिवार्य आहे.
कारण वाहन चालवत असताना आपल्या वाहनामुळे रस्त्यावर चालणारया ज्या इतर वाहनांचे नुकसान झाले आहे त्यांची नुकसानभरपाई करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली म्हणजे मुख्य वाहन मालकाची असते.
म्हणुन ही नुकसानभरपाई करण्यासाठी वाहन मालकाने थर्ड पार्टी इंशुरन्स घेणे गरजेचे असते.
उदा, समजा एक गरीब वाहन चालक आहे ज्याचे इन्कम खुप कमी आहे.अणि त्याने एका अशा व्यक्तीला आपल्या कारने गाडीने धडक दिली ज्याचे इन्कम खुप जास्त आहे.
अणि ह्या अपघातात त्या श्रीमंत व्यक्तीचे खुप मोठे नुकसान झाले किंवा तो मृत्यू पावला आहे.अशा परिस्थितीत तो गरीब वाहन चालक त्या श्रीमंत व्यक्तीस नुकसानीचे पैसे देऊ शकत नाही कारण त्याची तेवढी आर्थिक परिस्थिती नसते.
अशा वेळी थर्ड पार्टी इंशुरन्स कंपनीदवारा हा सर्व खर्च त्या गरीब व्यक्तीच्या वतीने केला जातो.याने ज्या श्रीमंत व्यक्तीचे त्या गरीब व्यक्तीमुळे नुकसान झाले आहे त्याला त्याची नुकसानभरपाई देखील मिळुन जाते.अणि त्या गरीब वाहन चालकावर खर्चाचा बोजा देखील येत नाही.
सरकारने ह्याच साठी थर्ड पार्टी इंशुरन्स काढणे अनिवार्य केले आहे.
जेणेकरून कोणा गरीब व्यक्तीकडून आपल्या वाहनादवारे जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या वाहनाचे जिवाचे नुकसान झाले तर त्याच्या वतीने इंशुरन्स कंपनी त्या व्यक्तीला पे करेल.
फस्ट पार्टी इंशुरन्स घेणे कोणासाठी आवश्यक ठरते? फस्ट पार्टी इंशुरन्स कोणी खरेदी करायला हवा?
ज्या वाहन चालकाला आपल्या वाहनामुळे नुकसान झालेल्या इतर वाहनांची नुकसान भरपाई करण्यासोबत स्वताच्या वाहनाची नुकसानभरपाई देखील हवी आहे.
अशा वाहन मालकांनी फस्ट पार्टी इंशुरन्स घेणे गरजेचे आहे.कारण यात वाहन मालक अणि वाहन मालकाच्या वाहनामुळे नुकसान झालेला व्यक्ती ह्या दोघांचेही नुकसानीची भरपाई केली जाते.
थर्ड पार्टी इंशुरन्स मध्ये किती क्लेम करता येतो?
थर्ड पार्टी इंशुरन्स मध्ये वाहन मालकाला एकुण दोन प्रकारच्या नुकसानभरपाई करीता क्लेम करता येतो.
पहिल्या प्रकारात जेव्हा वाहन मालकाच्या वाहनामुळे एखाद्या निर्जीव वस्तू गाडी कार इत्यादी साधन संपत्तीचे नुकसान होते त्याचा समावेश होतो.
यात वाहन मालकाच्या कारमुळे एखाद्या साधन संपत्तीचे नुकसान झाल्यास वाहन मालकास ७ लाख ५० हजार इतक्या नुकसानभरपाई साठी दावा करता येतो.
अणि वाहन मालकाच्या बाईकमुळे एखाद्या साधन संपत्तीचे नुकसान झाल्यास १ लाख इतक्या नुकसानभरपाई साठी वाहन मालकास दावा करता येतो.
अणि दुसरया प्रकारात वाहन मालकाच्या वाहनामुळे नुकसान झालेल्या शारीरिक इजा पोहचलेल्या जीव गेलेल्या सजीव व्यक्तींचा स्त्री पुरुष इत्यादींचा समावेश होतो.
ह्या दुसरया प्रकारामध्ये वाहन मालकाच्या वाहनामुळे झालेल्या अपघातात ज्या व्यक्तीला शारीरिक दुखापत झाली आहे इजा पोहचली आहे तो अपघातात अपंग झाला आहे किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
त्या व्यक्तीला त्याचे किती नुकसान झाले आहे या आधारावर तसेच तो महिन्याला किती कमाई करायचा त्याचे इन्कम किती होते ह्या सर्व गोष्टींच्या आधारावर नुकसानभरपाई दिली जाते.
थर्ड पार्टी इंशुरन्स क्लेम प्रक्रिया –
सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा एका वाहन चालकामुळे दुसरया वाहन चालकाच्या गाडीचे बाईकचे नुकसान होते
तेव्हा ज्याच्यामुळे अपघात झाला आहे तो वाहन चालक त्या दुसरया व्यक्तीला वाहनाच्या नुकसानीची भरपाई म्हणून जेवढे त्याचे नुकसान झाले आहे तेवढी
उदा,पाच ते दहा हजार इतकी छोटी मोठी रोख रक्कम देत असतो.अणि सर्व प्रकरण पोलिस स्टेशन कोर्ट कचेरीत न नेता थोडक्यात बाहेरच मिटवण्याचा प्रयत्न करत असतो.
यात ज्या पार्टीची चुकी असते ती पार्टी आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या वाहनाचे जे काही छोटे मोठे नुकसान झाले आहे त्याच्या दुरूस्ती करीता जागीच भरपाई रक्कम देऊन मोकळी होते.
पण समजा दुसरया वाहन चालकाच्या वाहनाचे खुप मोठे गंभीर नुकसान झाले आहे किंवा त्या वाहन चालकाला गंभीर शारीरिक दुखापत झाली आहे किंवा त्यात त्याचा मृत्यू झाला तर
अशा परिस्थितीत ज्या वाहन चालकाचे नुकसान झाले आहे त्याला थर्ड पार्टी क्लेम करीता पोलिस स्टेशन मध्ये जाऊन एफ आय आर तसेच चार्जशीट दाखल करावे लागेल.
यात जर आपल्याला समोरच्यावर क्लेम करायचा तर आपणास सर्वप्रथम पोलिस स्टेशन मध्ये जाऊन एफ आय आर तसेच चार्जशीट दाखल करावे लागेल.
यानंतर मोटर इंशुरन्स क्लेम वकिलाशी संपर्क करावा लागेल यानंतर सर्व प्रकरण मोटर इंशुरन्स क्लेम ट्रीब्युल कोर्टात जाते.
यानंतर कोर्टात दोघे पक्षांची बाजु कागदपत्रे लक्षात घेतली जाईल.कोणाची चुकी होती कोणाची चुकी नव्हती हे बघितले जाईल.
नुकसान झालेल्या पार्टीला कोर्टाकडून किती दाव्याची रक्कम मिळते?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली अणि त्यात त्याचा मृत्यू झाला तर त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे किती नुकसान झाले हे बघितले जाते.
त्याच्या कुटुंबाला किती नुकसान झाले आहे हे जाणुन घेतले जाते.यासाठी त्या मृत व्यक्तीचे इन्कम किती होते तो किती कमाई करायचा इत्यादी गोष्टी जाणुन घेतले जाईल.अणि त्यानुसार इंशुरन्स कंपनीला किती क्लेम द्यावा लागेल हे ठरवले जाईल.
थर्ड पार्टी क्लेम अंतर्गत गाडीच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी नुकसान झालेल्या वाहन चालकास गाडीच्या दुरूस्ती संबंधित सर्व काही आवश्यक कागदपत्रे कोर्टासमोर दाखवावे लागतील.
ज्यात गाडीचे सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच रिपेअरींगचे इन्वहाॅईस इत्यादी हे सर्व बघितल्यावर कोर्ट जी रक्कम ठरवेल तेवढीच रक्कम विमा कंपनीला आपणास द्यावी लागेल.
समोरच्या व्यक्तीने आपल्यावर थर्ड पार्टी क्लेम केल्यावर काय करावे?
- यात समजा समोरच्या व्यक्तीने आपल्यावर थर्ड पार्टी क्लेम दाखल केला तर अशा परिस्थितीत अपघातात आपली चुकी नाही हे आपणास सिदध करावे लागते.
- यासाठी अपघात झाला तेव्हाचे गाडीचे सर्व कागदपत्रे आरसी,व्हॅलीड इंशुरन्स ड्रायव्हिंग लायसन्स प्रदुषण सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे कोर्टासमोर सादर करावे लागतील.
- याचसोबत आपण यात वाहतुकीचा कुठल्याही प्रकारचा नियमभंग केलेला नसावा.आपण चुकीच्या दिशेने वाहन चालवत नसावे.वाहन चालवताना नशेत नसावे.प्रमाणापेक्षा जास्त सीट गाडीवर बसवलेले नसावे कुठलेही अवैध सामान आपल्या वाहनाने नेत नसावे.
- मग कोर्टात हे सिदध झाले की अपघातात आपली कुठलीही चुक नव्हती.आपण कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा नियमभंग केलेला नाहीये.आपल्याकडे आपली सर्व गाडीची कागदपत्रे देखील आहेत.
- तर यानंतर समोरच्या व्यक्तीला कोर्टाच्या आदेशानुसार सर्व ठाराविक नुकसानाची भरपाई देण्याचे दायित्व विमा कंपनी कडे जाते.
- यात आपल्याला फस्ट पार्टी म्हणून फक्त हे सिदध करायचे आहे की अपघातात आपली कुठलीही चुक नव्हती आपण वाहतुकीचा कुठलाही नियम देखील मोडलेला नाहीये अणि आपल्याकडे आपल्या गाडीची सर्व कागदपत्रे देखील आहेत.