भारतीय स़ंविधानाची मुलभूत कर्तव्ये | Fundamental Duties of Indian Constitution
भारतीय संविधानाने जसे आपल्याला भारत देशातील नागरिक म्हणून आपले काही मुलभूत अधिकार प्राप्त करून दिले आहे त्याचप्रमाणे काही मुलभूत जबाबदारया देखील आहेत ज्या पार पाडण्यासाठी नेमुन दिलेल्या आहेत.
आजच्या लेखात आपण ह्याच भारतीय संविधानाच्या मुलभूत कर्तव्यांविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
भारतीय संविधानाच्या मुलभूत कर्तव्यांचे महत्व काय आहे?
भारतीय संविधानाची मुलभुत कर्तव्ये ही भारत देशातील सर्व नागरिकांना आपल्या देशाप्रती समाजाप्रती असलेल्या आपल्या मुलभुत कर्तव्यांची जाणीव करून देण्याचे काम करतात.
ही मुलभुत कर्तव्ये भारत देशातील नागरिकांना देशाच्या विरोधात होत असलेल्या कृतींपासुन समाजाला घातक ठरत असलेल्या गोष्टींपासून सावध राहायला सांगतात.
भारतीय संविधानाची मुलभुत कर्तव्ये ही भारतातील नागरीकांना प्रेरणा तर देतात शिवाय आपल्यातील शिस्त अणि वचन बदधता ह्या भावनेमध्ये वाढ घडवुन आणतात.
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही मुलभूत कर्तव्य न्यायालयास कायद्याची घटनात्मक वैधता तपासायला अणि ती निश्चित करायला साहाय्य करीत असतात.
मुलभुत कर्तव्यांनुसार नागरीकाने वर्तन नाही केले तर संसदेकडुन त्यावर एखादा कायदा तयार करून कायद्याचे उल्लंघन करणारयास शिक्षेची तरतुद केली जाऊ शकते.
भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रारंभीस कोणतीही कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली नव्हती पण १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्ती नुसार भारताच्या घटनेत दहा मुलभुत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली होती.
अणि मग पुढे जाऊन २००२ साली ८६ व्या घटना दुरुस्ती नुसार अकरावे मुलभूत कर्तव्य देखील यात समाविष्ट करण्यात आले.
भारताच्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेली सर्व मुलभूत कर्तव्य ही सोव्हिएत रशिया ह्या देशाच्या राज्यघटना वरून स्वीकारण्यात आली आहे.
अणि अशा प्रकारची मुलभूत कर्तव्य आपणास फक्त भारताचा शेजारील देश जपानच्या राजयघटनेमध्ये पाहायला मिळुन येतात.
Fundamental Duties of Indian Constitution
भारतीय संविधानातील मुलभूत कर्तव्यांचे प्रमुख वैशिष्ट्य –
● भारतीय संविधानात जी अकरा मुलभूत कर्तव्ये दिलेली आहेत त्यातील काही कर्तव्य नागरीक कर्तव्य आहे तर काही नैतिकतेवर आधारलेली कर्तव्य असल्याचे आपणास दिसून येते.
● ही सर्व मुलभूत कर्तव्य भारतीय संस्कृती अणि तिच्या जीवन पद्धतीचा समृद्ध वारसा जपण्याच्या दृष्टीने खुप महत्वपूर्ण आहे.
● मूलभूत कर्तव्य ही भारत देशातील सर्व नागरीकांना पार पाडावी लागतात कारण ती सर्व नागरिकांना समानरीतीने लागु होत असतात.
स्वर्ण समिती काय आहे स्वर्ण समितीची स्थापना का करण्यात आली?
जेव्हा देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा त्या काळात भारत सरकारच्या वतीने सरदार स्वर्ण समितीची स्थापना करण्यात आली होती.
तेव्हा या समितीकडुन एक शिफारस करण्यात आली की मुलभूत कर्तव्यांचे एक स्वतंत्र प्रकरण घटनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे.
मग ह्या १९७६ मध्ये ह्या स्वर्ण समितीकडुन करण्यात आलेल्या शिफारसीला मान्यता प्राप्त झाल्यानंतर ४२ व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये घटनेमधील भाग चार अ मध्ये कलम ५१ चा समावेश करण्यात आला.यामध्ये एकुण दहा मुलभूत कर्तव्य दिली गेली.
हेमोटोक्रिट टेस्ट विषयी माहिती – Hematocrit test information in Marathi
भारतीय संविधानातील अकरा मुलभूत कर्तव्य कोणकोणती आहेत? |11 fundamental duties in Indian constitution
पहिले कर्तव्य –
भारतीय नागरीकांनी भारतीय संविधानाचे शिस्तबद्धरीत्या काटेकोरपणे पालन करायला हवे.संविधानात्मक आदर्श संस्था, राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करायला हवा.
दुसरे कर्तव्य –
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्फुर्ती तसेच प्रेरणा देत असलेल्या आदर्शाची जोपासना करावी अणि त्याचे अनुकरण देखील करावे.
तिसरे कर्तव्य –
भारत देशातील सार्वभौमत्व एकता एकातमेला उन्नत ठेवावे तसेच त्यांचे नेहमी संरक्षण देखील करावे.
चौथे कर्तव्य –
राष्ट्राचे संरक्षण करणे राष्ट्राने आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा देखील बजावणे.
Fundamental Duties of Indian Constitution
पाचवे कर्तव्य –
सर्व प्रकारच्या धार्मिक/जातीय/वर्गीय प्रादेशिक इत्यादी भेद भावाच्या पलीकडे जाऊन भारतातील जनतेमध्ये सामंजस्य ऐक्य अणि ब़ंधुभावाची भावना निर्माण करणे स्त्रियांच्या अब्रु प्रतिष्ठेस उणेपणा येईल अशा रीती रीवाज प्रथा परंपरा यांचा त्याग करणे.
सहावे कर्तव्य –
आपल्या संमिश्र संस्कृती मधील वारसांचे प्रत्येक नागरीकाने जतन करणे.
सातवे कर्तव्य –
नैसर्गिक पर्यावरणातील नद्या सरोवरे तलाव तसेच इतर वन्यजीव यांचे रक्षण करणे.
आठवे कर्तव्य –
प्रत्येक नागरिकाने विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन ठेवून मानवतावाद अणि शोधक बुदधी मध्ये विकास घडवून आणण्याचे काम करणे.
नववे कर्तव्य –
देशातील जेवढ्या सर्व सार्वजनिक मालमत्ता संपत्ती आहे तिचे भारतातील प्रत्येक नागरीकांने रक्षण करावे अणि हिंसाचाराचा त्याग करावा.
What is a Philanthropist? – परोपकारी म्हणजे काय – दानशूरता
दहावे कर्तव्य –
सर्व प्रकारच्या व्यक्तीगत तसेच सामुदायिक कार्यात उतमता संपादित करावी अणि आपल्या देशाला उच्च प्रगतीपथावर नेण्याचा सदैव प्रयत्न करणे.त्यासाठी सदैव प्रयत्नशील देखील असणे.
अकरावे कर्तव्य –
जन्मदाता तसेच पालकांनी आपल्या लहान मुलांना पाल्यांना वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदा वर्षाचे होईपर्यंत त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी.
मुलभूत कर्तव्य यांच्या विषयी नागरीकांकडुन केल्या जाणारया टिका तसेच आरोप-
● मुलभूत कर्तव्य हे भारतातील नागरीकांचे वर्तन वागणुकीस नियंत्रित करते.
● मुलभूत कर्तव्याच्या दिलेल्या यादीमध्ये वोटिंग करणे, नियमित टॅक्स भरणे कुटुंब नियोजन करणे अशा काही मुलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला नाहीये.
● यात काही संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीये.
● मुलभूत कर्तव्य भाग चार मध्ये न देता तीन मध्ये देणे अधिक योग्य ठरले असते.
● मुलभूत कर्तव्य ही न्यायप्रविष्ट नाहीये म्हणून याला दंडसतेचा आधार नसल्याने ही तत्वे नैतिक तत्वे ठरत असतात.
Fundamental Duties of Indian Constitution