गणेश चतुर्थी पूजा ,मुहूर्त आणि गणेश चतुर्थीचे महत्व – Ganesh Chaturthi 2023 in Marathi :

गणेश चतुर्थी पूजा – Ganesh Chaturthi 2023 in Marathi

गणेश चतुर्थी तारीख : या वर्षाची गणेश चतुर्थी उद्या म्हणजे १९ सप्टेंबर ला आहे ,जाणून घ्या गणेश चतुर्थी दिवशी करावयाची पूजा ,मुहूर्त आणि गणेश चतुर्थीचे महत्व –

तुम्हाला माहित असेल की ,श्री गणेश हे शिव जी आणि पार्वती जी यांचे पुत्र आहेत आणि माता पार्वतीनी श्री गणेशांना तयार केले होते ,व राग आल्यामुळे महादेवांनी आपल्या मुलाचे म्हणजे गणेश जिंचे मुंडके उडवले होते व परत हातीचे मुंडके श्री गणेशांना जोडले होते.

आपल्या भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये गणेश चतुर्थी च्या दिवशी घरामध्ये गणपती बसवले जातात.महाराष्ट्र सोबत बाकीच्या काही राज्यांमध्ये देखील गणेश चतुर्थी दिवशी गणपती बसवले जातात.हे गणपती काही ठिकाणी दीड दिवस घरात बसवले जातात तर ,काही घरांमध्ये चार दिवस बसवले जातात,तर बऱ्याच घरामध्ये १० दिवस गणपती असतात आणि शेवटच्या दिवशी पाण्यामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते.

हिंदू धर्मातील लोक आपल्या घरी बसलेल्या दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करतर ,त्यांच्यासाठी उकडीचे मोदक करतात ,नंतर गणपती बाप्पांना दुर्वा आवडते म्हणून दररोज रानात जाऊन किंवा शहरात राहत असतील तर ,बाजारात जाऊन दुर्वा आणून ती दुर्वा गणपती बाप्पांना वाहतात

.या दहा दिवसांमध्ये घरामध्ये अगदी आनंदाचे वातावरण असते ,घरातली सगळी मंडळी गणपतीच्या आगमनाने खुश झालेली असतात ,गणपती बाप्पा आल्याच्या काही दिवसातच गौरी पूजन असते ,व नंतर गौरी विसर्जन चा कार्यक्रम केला जातो.या दहा दिवसांमध्ये आनंदी असणारी सगळी घरची मंडळी अक्षरशः गणपती विसर्जन केल्यानंतर रडतात.प्रत्येकाला गणपती बाप्पा गेल्याचे दुःख होते ,परंतु परत तेच लोक ,“गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर या !!’ असे शब्द म्हणत पुढच्या वर्षीच्या गणपती बाप्पा येण्याची तयारी करतात.

See also  छपरी म्हणजे काय?आदीपुरूष चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सोशल मिडिया वर हा शब्द मोठ्या प्रमाणात ट्रेंड का करतोय?

सर्वप्रथम गणपती बसवणे ही प्रथा महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी चालू केली होती.त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव ची प्रथा चालू केली ,याचसोबत त्यांनी महाराष्ट्राचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती देखील चालू केली .

Ganesh Chaturthi
गणेश चतुर्थी पूजा ,मुहूर्त आणि गणेश चतुर्थीचे महत्व

शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा एकच उदेश्य होता की , “समाजातील माणसे एकत्र यावी आणि एकत्र येऊन त्यांनी हे सण साजरे करावेत. “

श्री गणेशा ही बुद्धी ची देवता आहे .आपण कोणत्याही कामाची सुरवात गणपती बाप्पाच्या नावापासून च करतो.गणपती बाप्पांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता देखील म्हणले जाते .

सुखकर्ता म्हणजे ज्यांचे नाव घेतले ,तरी सुखाची अनुभूती होते आणि दुःखहर्ता म्हणजे जे दुःख हरतात , म्हणजे जर एखादा व्यक्ती दुःखात असेल आणि त्याने जर गणपती बाप्पांचे नाव घेतले तर गणपती बाप्पा त्या व्यक्तीचे दुःख दूर करतात ,त्यामुळे गणपती बाप्पांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता देखील म्हणले जाते.

गणेश चतुर्थी दिवशी श्री गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ?


हिंदू धर्मातील पंचाग नुसार या वर्षी गणेश चतुर्थी दिवशी श्री गणेशाची मूर्ती विराजमान करण्याचा योग्य मुहूर्त सकाळी १० वाजून ४९ मिनिटा पासून ते दुपारी १ वाजून १६ मिनिटापर्यंत आहे.

गणेश चतुर्थी दिवशी श्री गणपती बाप्पांची पूजा विधी खालीलप्रमाणे करू शकता :

गणेश चतुर्थी पूजा ,मुहूर्त आणि गणेश चतुर्थीचे महत्व – Ganesh Chaturthi 2023 in Marathi :


१) सर्वात आधी लवकर उठून तुम्ही स्नान करा आणि जिथे कुठे गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली आहे ,तिथे जाणून गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी आणा .शक्य असेल तर मातीचा गणपती घरी बसवा,जेणेकरून त्याचा फायदा आपल्या पर्यावरणाला होईल.
२) त्यानंतर घरी आल्यानंतर ती गणेश मूर्ती पाटा वरती विराजमान करा.
३) त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला सिंधूर लावून मूर्तीला दुर्वा अर्पण करा आणि त्यांना २१ मोदकाचा नैवेद्य दाखवा.नैवैद्य दाखवल्यानंतर २१ मधील पाच मोदक गणपती बाप्पांच्या मूर्ती पुढे ठेवा आणि उरलेले १६ मोदक गरिबांमध्ये वाटा.
४) नंतर जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान आहेत ,तेवढे दिवस दररोज रात्री गणपती बाप्पांची आरती नक्की करा.शक्य असेल तर गणपती बाप्पांची आरती तुम्ही सकाळची देखील करू शकता.
५) गणपती बाप्पांना तुळशीचे पान सोडून इतर सर्व पाने अर्पित करा.

See also  एनसी व्हीटी आयटी आयचा निकाल जाहीर - NCVT ITI result 2023 in Marathi

आजच्या लेखामध्ये आपण गणेश चतुर्थीचे महत्व ,गणेश चतुर्थी २०२३ मध्ये गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करण्यासाठीचा शुभ मुहूर्त आणि गणेश चतुर्थी वेळी करावयाची पूजा विधी या सर्वांची माहिती पाहिली.