दुरदर्शनवरील प्रसिद्ध न्युज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन Gitanjali Aiyer passed away in Marathi

दुरदर्शनवरील प्रसिद्ध न्युज अँकरगीतांजली अय्यर यांचे निधन – Gitanjali Aiyer passed away in Marathi

महिला अँकर गीतांजली अय्यर यांचे 7 जुन रोजी निधन झाले आहे.गीतांजली ह्या प्रथम इंग्लिश न्युज अँकरम्हणून आपणा सर्वांना परिचित आहे.वयाच्या 72 व्या वर्षी गीतांजली यांचे निधन झाले आहे.

गीतांजली अय्यर यांनी आपला 30 वर्षांपेक्षा अधिक कालावधी हा दुरदर्शनवर न्युज अॅकरींग करण्यात

व्यतीत केला होता.

Gitanjali Aiyer passed away in Marathi

गीतांजली एकेकाळच्या टिव्ही न्युज इंडस्ट्री मधील स्टार म्हणून ओळखल्या जायच्या.

गीतांजली अय्यर यांना त्यांच्या दुरदर्शनवरील केलेल्या न्युज अॅकरींग करीता त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत चार ते पाच वेळा बेस्ट अॅकरचा पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे.

1971 मध्ये गीतांजली अय्यर यांनी दुरदर्शनवर काम करावयास सुरुवात केली होती.गीतांजली अय्यर यांनी इंग्रजी विषयात आपले पदवीपुर्ण शिक्षण पुर्ण केले होते.

याचसोबत गीतांजली अय्यर यांनी नृत्य राष्ट्रीय शाळा मधील national school of drama चा डिप्लोमा देखील केला होता.

गीतांजली यांनी कोलकता शहरातील लोरेटो काॅलेमधुन त्यांचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पुर्ण केले होते.

गीतांजली अय्यर जेव्हा आपल्याकडे केबल कनेक्शन उपलब्ध नसायचे रोजच्या बातम्या ऐकण्यासाठी आपण दुरदर्शनवर पुर्णपणे अवलंबून असायचो त्या काळी गीतांजली अय्यर दुरदर्शनवर न्यूज अॅकरींग करीत होत्या.

म्हणजेच त्या काळात जगभरात कुठे काय घडले ह्या महत्वाच्या घडामोडी तसेच बातम्या ऐकण्यासाठी कळण्यासाठीचे एकमेव माध्यम साधन दुरदर्शन होते.

न्युज अॅकरींग व्यतिरीक्त गीतांजली अय्यर यांनी जाहीरात क्षेत्रात देखील काम केले आहे.त्या काळात गीतांजली यांनी अनेक मोठमोठ्या ब्रॅडसोबत जाहीरातीचे काम देखील केले होते.

याचसोबत त्यांनी कार्पोरेट कम्युनिकेशन अणि मार्केटिंग मध्ये देखील काम केले होते.गीतांजली अय्यर ह्या उद्योग संघटना सीआय आयच्या सल्लागार पदी देखील बराच काळ कार्यरत होत्या.

गीतांजली अय्यर हया दुरदर्शनचाच सर्व लोक बातम्या चित्रपट मालिका बघण्यासाठी ऐकण्यासाठी सर्वत्र वापर करायचे अशा काळातील प्रसिद्ध नावाजलेल्या महिला न्युज अॅकरपैकी एक होत्या.

See also  जिओने लाॅच केले ८४ दिवसांच्या वैधतेचे २ नवीन रिचार्ज प्लॅन Jio 84 days new recharge plan in Marathi

पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी करीता,सदर क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानाकरीता 1989 मध्ये त्यांना उत्कृष्ट महिलांना दिला जात असलेला इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

गीतांजली अय्यर यांच्या दुखद निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

गीतांजली अय्यर आज ह्या जगात नाहीये पण त्यांचा आवाज आजही लोकांच्या हृदयात आपले एक घर करून बसलेला आहे.