गूगल डूडल – सुंदर आणि आकर्षक – नवीन वर्षाच्या च स्वागत – New Year’s Eve: Google doodle ready to welcome 2022
2022 हे नवीन वर्ष आज रात्रीपासुन सुरू होत आहे त्यामुळे सर्व जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या पदधतीने काही ना काही नवीन उपक्रम राबविताना तसेच प्लँनिंग करताना दिसुन येत आहे.तसेच खुप जणांची तयारी झाली देखील आहे.
आज रात्री पुर्णजग नवीन वर्षाचे मोठया हर्ष उल्हासाने स्वागत करणार आहे.संपुर्ण जगासोबत गूगल देखील नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कामाला लागलेले आपणास दिसुन येत आहे.गुगलने नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला न्यु इयर सेलिब्रेशनसाठी एक खास डुडल तयार केले आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच गुगलने तयार केलेल्या डुडलविषयी जाणुन घेणार आहोत.
नवीन वर्षाच्या पुर्व संध्येला गुगलने का तयार केले डुडल?
नवीन वर्षाची सुरूवात होण्यासाठी आता फक्त काहीच तास उरलेले आहेत.म्हणुन सर्व जग जुन्या वर्षाचा निरोप घ्यायला आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीला जोरात लागले असताना गुगल देखील आपल्या खास शैलीत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयार झालेले आहे.
31 डिसेंबर 2021 रोजी नववर्षाच्या पुर्वसंध्येस गुगलने एक खास डुडल तयार केले आहे.ज्याला गुगलकडुन new year eve असे नाव देखील देण्यात आले आहे.
- गुगल नेहमी कुठल्याही शानदार क्षणाचे डुडल तयार करत असते.आणि त्या क्षणाला आपल्या शैलीत साजरा करत असते.
- जसे जगभरात नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला जल्लोषात धुमधडाक्यात नेहमी साजरे केले जाते.त्याचप्रमाणे गुगल देखील आपल्या अंदाज शैलीत असे महत्वाचे क्षण साजरा करत असते.
- गुगलने जे डुडल तयार केले आहे त्याची मेणबत्तीने,कंफेटीने जँफलाईटस तसेच स्पारकलने छान सजावट केलेली आहे.
- आज बारा वाजेच्या दरम्यानच गुगलने हे डुडल लाईव्ह केलेले आहे.गुगलने बनवलेल्या डुडलमध्ये २०२१ कँप्शनचे एक कँन्डी आपल्याला दिसुन येते.
- गुगलने आपले हे डुडल एखाद्या पाँपिंग मेणबत्तीप्रमाणे तयार केले आहे.गुगलने हे डुडल खुपच आकर्षक पदधतीने बनवले आहे.
- जेव्हा आपण ह्या डुडलवर क्लीक करतो तेव्हा लगेच एक पेज ओपन होत असते.याचबरोबर काही रंगीबेरंगी असे पेपरचे तुकडे वरून खाली येतानाचे दृश्य देखील आपणास दिसुन येते.
- याचसोबत उजव्या बाजुस बाँक्सच्या मध्ये एक कोनाचे अँनिमेशन तयार केले आहे.जर आपण त्यावर क्लीक केले का लगेच हे फुटते.आणि आपणास एक आवाज ऐकु येत असतो.
- नवीन वर्ष आपणा सर्वाना सुखाचे,आनंदाचे आणि समृदधीचे जावे अशा शुभेच्छा देण्यासाठी गुगलने हे खास डुडल तयार केले आहे.
- गुगल आपल्या डुडल मार्फत लोकांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांना नेहमी काहीतरी नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करीत असते.