सिम कार्ड साठी सरकारचे नवीन नियम – बल्क मध्ये सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आता पोलिस व्हेरिफिकेशन होणार Government new rules for sim Card in Marathi

सिम कार्ड घेण्यासाठी सरकारचे बनवला नवीन नियम बल्क मध्ये सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आता पोलिस व्हेरिफिकेशन होणार Government new rules for sim Card in Marathi

आपल्या भारत देशामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले फसवणुकीचे प्रकार बघता ह्या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने एक नवीन नियम बनवला आहे.

ज्यानुसार बल्क मध्ये सिम कार्डच्या खरेदीवर आता शासनाकडुन बंदी घातली गेली आहे.

सिम कार्ड करीता शासनाने बनवलेल्या नवीन नियमानुसार आता शासनाने सिम कार्ड डीलर करीता पोलिस व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक केले आहे.ज्यामुळे कुठलाही फसवणुकीचा प्रकार घडुन येणार नाही.

समजा एखाद्या व्यक्तीने शासनाच्या ह्या नियमाचे पालन केले नाही तर त्याला १० लाखापर्यंत दंड देखील भरावा लागु शकतो असे केंद्रीय दुरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

केंद्रीय दुर संचार मंत्री अश्विनी वैष्णव असे देखील म्हटले आहे की सिम कार्डच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांना रोखण्यासाठी आतापर्यंत शासनाने ५२ लाखापेक्षा अधिक मोबाईल कनेक्शन बंद केली आहेत.

याचसोबत ६७ हजार सिम कार्ड डिलर्सला ब्लँक लिस्ट करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायचे देखील ठरवले आहे.

मागील मे महिन्याच्या दरम्यान जवळपास ३०० सिमकार्ड डिलर्स विरुद्ध एफ आय आर नोंदविण्यात आली होती.

Government new rules for sim Card in Marathi
Government new rules for sim Card in Marathi

व्हाटस अपने ह्या सोशल मिडिया अॅपने देखील अशा आॅनलाईन फसवणुकी करत असलेल्या फसवणुकी सदृश्य तब्बल ६६ हजार अकाऊंटला आपल्या प्लॅटफॉर्म वरून काढुन टाकले आहे.

नवीन नियमानुसार कंपनी अणि सिम कार्ड वापरकर्त्याची ओळख पटावी म्हणून आता सिम कार्ड डिलर्सला स्वताचे तसेच सिम कार्ड विकत घेत असलेल्या व्यक्तीचे देखील केवायसी करावे लागेल.

शासनाच्या ह्या नवीन नियमाचे फायदे –

  • शासनाच्या ह्या नवीन नियमामुळे सिम कार्ड अणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून होत असलेल्या गुन्हेगारी प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल.
  • लोकांची मोबाईल नंबरच्या सिम कार्डच्या साहाय्याने होत असलेल्या फसवणुकीला आळा बसेल.
  • शासनाच्या ह्या नवीन नियमामुळे कोणालाही आता एकाच वेळी भरपुर सिम कार्ड बल्क मध्ये खरेदी करता येणार नाही
  • शासनाच्या ह्या नवीन नियमामुळे जे भारतातील सिम कार्ड डिलर्स मोठ्या प्रमाणात सिम कार्डची खरेदी विक्री करतात त्यांना पोलिस व्हेरिफिकेशन प्रोसेसला सामोरे जावे लागणार आहे.
  • जर त्यांनी पोलिस व्हेरिफिकेशन नाही केले तर त्यांना दहा लाखांपर्यंत दंड भरावा लागेल.आज आपल्या भारत देशात १० लाखापेक्षा अधिक सिम कार्ड डीलर असलेले आपणास पाहावयास मिळते.
  • ह्या नवीन नियमामुळे बनावट सिम कार्ड विकणे एकाच व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त सिम कार्ड विकणे ह्या गोष्टींना आळा बसणार आहे.
See also  जागतिक हास्य दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? - World laughter day in Marathi