भारतातील पहिले थ्रीडी प्रिंटेड पोस्ट ऑफिसबंगळुरू मध्ये सुरू India first 3d printed Post office open in Bengaluru
भारत देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल अशी एक महत्वाची बातमी आहे.
नुकतेच भारतातील बंगलोर येथे पहिले थ्रीडी प्रिंटेड पोस्ट ऑफिसउघडण्यात आले आहे.
केंद्रीय रेल्वे दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे उद्घाटन शुक्रवारच्या दिवशी बंगलोर येथे केले आहे.
लारसन अॅण्ड टर्बो कंपनीच्या वतीने ह्या पोस्ट आॅफिसच्या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.हया इमारतीच्या उभारणीसाठी आय आयटी मद्रासने टेक्नीकल गाईडन्स केले आहे.
भारतातील बंगलोर येथे उभारण्यात आलेल्या भारतातील ह्या पहिल्या थ्रीडी प्रिंटेड पोस्ट आॅफिसची थ्रीडी क्राॅकिट तंत्रज्ञानाच्या आधारे उभारणी करण्यात आली आहे.
भारतातील हे पहिले थ्रीडी प्रिंटेड पोस्ट ऑफिसकेंब्रिज ले आऊटचे आहे.याचे एकुण क्षेत्रफळ १०२१ चौरस फुट इतके आहे.
ह्या थ्रीडी प्रिंटेड इमारती मधून पोस्ट ऑफिसमधील कामकाजास देखील आरंभ झाला असल्याचे सांगितले जात आहे.
ह्या इमारतीच्या उभारणीसाठी २३ ते २५ लाखापर्यंत खर्च लागला आहे.अणि याच्या बांधकाम दरम्यान करण्यात आलेल्या एकुण खर्चात ३० ते ३५ टक्के बचत झाली आहे.
भारतातील पहिल्या थ्रीडी प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे वैशिष्ट्य –
ह्या इमारतीचे काम स्वयंचलित पद्धतीने रोबोटिक प्रिंटरच्या साहाय्याने करण्यात आले आहे.
- संपुर्ण इमारतीचे कामकाज एकुण ४५ दिवसांच्या कालावधीत पुर्ण करण्यात आले आहे.
- जर ह्या कामासाठी पारंपारिक पदधतीचा वापर केला गेला असता तर ह्या इमारतीच्या उभारणीसाठी साधारणत सहा ते आठ महिने इतका कालावधी लागु शकला असता.अणि ह्यावर पैसा देखील अधिक खर्च झाला असता.
- पण थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत उभारण्यात आल्याने खुप कमी कालावधीत अणि कमी खर्चात ही इमारत उभारण्यात आली आहे.
- विशेष दर्जा असलेल्या घट्ट क्राॅकिटने थरावर थर रचुन ह्या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.
- इमारत कमी कालावधीत उभी करण्यात आली आहे पण गुणवत्तेमध्ये ही एकदम सरस असल्याचे दिसुन येते.
थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
थ्रीडी प्रिंटिंग हे एक तंत्रज्ञान आहे ज्याच्या मध्ये कंप्यूटरच्या साहाय्याने कुठल्याही इमारतीचे डिझाईन तयार केले जाते.यात आपणास लेअर टु लेअर तीन डायमेंशन असलेले डिझाईन बनवता येते.
साध्या प्रिंटिंग मशिन मध्ये शाई अणि कागदाचा उपयोग केला जातो पण थ्रीडी प्रिंटिंग मशिन मध्ये वस्तुंचा आकार रंग निश्चित करून बांधकामाचे साहित्य टाकले जाते.
थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर प्रामुख्याने सिक्युरिटी अणि एरोस्पेस मध्ये केला जातो.