इव्हेंट मॅनेजर कसे बनावे?How to become Event manager
आज आपल्या दैनंदिन जीवनात लग्नाचा कार्यक्रम, सत्कार समारंभाचा कार्यक्रम समारंभ, बर्थ डे पार्टी,मॅरेज अॅनिव्हरसरी पार्टी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्या तसेच कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो.
ह्या सर्व प्रकारच्या घरगुती तसेच बिझनेस फंक्शन्सचे कार्यक्रमांचे व्यवस्थापन करण्याचे काम इव्हेंट मॅनेजर करीत असतात.इव्हेंट मॅनेजर याला आपण इव्हेंट प्लॅनर म्हणून देखील ओळखतो.
इव्हेंट मॅनेजर म्हणजे काय?
इव्हेंट मॅनेजर यालाच आपण आपल्या मराठी भाषेत कार्यक्रम व्यवस्थापक असे देखील म्हणतो.
इव्हेंट मॅनेजरचे काम काय असते?
इव्हेंट मॅनेजर हा लग्न समारंभ,वेगवेगळ्या पार्टी,बिझनेस फंक्शन्स अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन तसेच व्यवस्थापन करीत असतात.
याकरीता आधी इव्हेंट मॅनेजर आपल्या क्लाईटची भेट घेतात त्यांना कोणत्या प्रकारचा कार्यक्रम ठेवायचा आहे कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थापन कशा पद्धतीने हवे आहे हे इव्हेंट मॅनेजर सर्वप्रथम जाणुन घेत असतात.
मग यानंतर सदर कार्यक्रमात किती लोक येणार आहे, त्या कार्यक्रमात डेकोरेशन वगैरे कशा पद्धतीने करायचे कार्यक्रमात आलेल्या लोकांच्या जेवणात कोणकोणत्या अन्न पदार्थांचा समावेश करायचा,तसेच त्या क्लाईटचे एकूण बजेट किती आहे इत्यादी सर्व गोष्टी जाणून घेत असतात.
मग क्लाईंटच्या बजेटनुसार इव्हेंट मॅनेजर सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन करीत असतो.त्यासाठी प्लॅनिंग नियोजन करत असतो.
कार्यक्रमात ज्या डेकोरेशन वगैरे करण्यासाठी ज्या काही वस्तुंची आवश्यकता असते त्या वस्तू मागवणे त्या त्या विक्रेत्यांकडून त्यांची खरेदी करणे,कार्यक्रमात जेवण वगैरे वाढण्यासाठी वर्कसची तजवीज व्यवस्था करणे.
कार्यक्रमादरम्यान कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास तिचे निवारण करणे,कार्यक्रमात आलेल्या लोकांच्या गाड्या पार्क करण्यासाठी सोय करणे इत्यादी सर्व कामे इव्हेंट मॅनेजरला करावी लागत असतात.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर कुठल्याही कार्यक्रमाचे संपुर्ण व्यवस्थापनाचे कार्य इव्हेंट मॅनेजर बघत असतो याने आपली कार्यक्रमात ऐनवेळी एखादी वस्तू कमी पडल्यास धावपळ देखील होत नाही.कारण ही सर्व कामे इव्हेंट मॅनेजर हाताळत असतात.
जागोजागी आज लग्न समारंभ,बर्थडे पार्टी,बिझनेस फंक्शन्स इत्यादी मधील सर्व लहानापासून मोठमोठ्या कामांचे योग्यरीत्या व्यवस्थापन करण्यासाठी इव्हेंट मॅनेजरला हायर केले जाते.
इव्हेंट मॅनेजर कसे बनायचे?
इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करण्यासाठी आपण एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मध्ये कर्मचारी म्हणून काम करू शकतो किंवा आपली स्वताची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी एजन्सी फर्म सुरू करू शकतो.
इव्हेंट मॅनेजमेंटचा कुठलाही सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा डिग्री इत्यादी करण्यासाठी आपले किमान ५५ टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इव्हेंट मॅनेजर बनण्यासाठी कोणता कोर्स तसेच डिप्लोमा करावा लागतो?
इव्हेंट मॅनेजर बनण्यासाठी आपण एखादा इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करू शकतो.किंवा त्यात डिग्री मास्टर डिग्री देखील प्राप्त करू शकतो.
इव्हेंट मॅनेजर बनण्यासाठी आपण खालील दिलेले सर्टिफिकेट कोर्स करू शकतो –
इव्हेंट मॅनेजमेंट बॅचलर डिग्री –
बीएससी इन इव्हेंट मॅनेजमेंट
बीबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट
बीए इन इव्हेंट मॅनेजमेंट
मास्टर डिग्री इन इव्हेंट मॅनेजमेंट –
एम बीए इन इव्हेंट मॅनेजमेंट
एम ए इन इव्हेंट मॅनेजमेंट अॅण्ड पब्लिक रिलेशन
सर्टिफिकेट कोर्स इन इव्हेंट मॅनेजमेंट –
सर्टिफिकेट कोर्स इन इव्हेंट मॅनेजमेंट हा तीन महिने इतक्या कालावधीचा कोर्स आहे.हा कोर्स आपण बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर करू शकतो.याची एकुण फी ४० ते ६० हजार इतकी असते.
डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट –
हा एक वर्षाचा डिप्लोमा असतो.हा डिप्लोमा कोर्स करण्यासाठी आपले किमान ५५ टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हा कोर्स करण्यासाठी आपल्याला ४० ते ८० हजार इतका खर्च येऊ शकतो.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेस इन इव्हेंट मॅनेजमेंट –
इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आपण खालील दिलेल्या डिप्लोमा कोर्स पैकी कोणत्याही प्रकारचा पीजी डिप्लोमा कोर्स करू शकतो.
हे सर्व एक ते दोन वर्षे इतक्या कालावधीचे पीजी डिप्लोमा कोर्स आहेत हे कोर्सेस करण्यासाठी आपणास किमान एक ते दोन लाख इतका खर्च येऊ शकतो.
पीजी डीएम इन इव्हेंट मॅनेजमेंट
पीजी डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट
पीजी डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट अॅण्ड पब्लिक रिलेशन
इव्हेंट मॅनेजरचे वेतन काय असते?
- आपण कोणत्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मध्ये नोकरी करत आहात यावर आपले वेतन ठरत असते आपण एखाद्या मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मध्ये इव्हेंट मॅनेजर म्हणून कामाला लागलो तर आपणास जास्त वेतन मिळत असते.
- अणि एखाद्या छोट्या मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मध्ये कर्मचारी म्हणून काम केले तर आपणास कमी वेतन दिले जाते.
- इव्हेंट मॅनेजर म्हणून एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मध्ये कामाला लागल्यावर आपल्याला सुरूवातीला १८ ते २१ हजार इतके मासिक वेतन दिले जाते.
- इव्हेंट मॅनेजर बनण्यासाठी आपल्या अंगी कोणकोणते गुण कलाकौशल्य असणे आवश्यक आहे?
- आपले संवाद तसेच संभाषण कौशल्य उत्तम असणे आवश्यक आहे.
- आपल्या हाताखाली काम करत असलेल्या कामगारांकडुन कर्मचारी वर्गाकडुन उत्तमरीत्या काम करून घेण्यासाठी आपल्या अंगी नेतृत्व गुण leadership quality असणे आवश्यक आहे.
- आपल्या अंगी निगोशिएशन स्कील असायला हवे म्हणजे भावताव करण्याचे वाटाघाटी करण्याचे कौशल्य आपल्या अंगी असणे आवश्यक आहे.
- वेळेचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य देखील आपल्या अंगी असणे आवश्यक आहे.
- कुठलीही समस्या सोडविण्याची कला आपल्या अंगी असायला हवी.