ब्लाॅक चेन इंजिनिअर कसे बनावे?How to become blockchain Engineer
ब्लाॅक चैन टेक्नाॅलाजी म्हणजे काय?
ब्लाॅक चैन हा एक नवीन साॅफ्टवेअर टेक्नाॅलाजीचा एक महत्वाचा प्रकार आहे ज्यात कुठल्याही इनफरमेशन तसेच डेटाला ब्लाॅक वाईज सिस्टम मध्ये रेकाॅर्ड केले जाते.
ज्यामुळे कोणीही ह्या डेटा मध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार किंवा अदलाबदल करू शकत नाही किंवा त्याला हॅक देखील करू शकत नाही.
सध्या ह्या टेक्नाॅलाजीचा वापर बॅकिंग क्षेत्रात क्रिप्टोकरंसी इत्यादी मध्ये केला जातो आहे.याचसोबत मिडिया, इंटरटेनमेंट,हेल्थ केअर ट्रान्सपोर्टेशन सेक्टर अशा विविध क्षेत्रात देखील ह्या टेक्नाॅलाजीचा वापर केला जातो आहे.
ब्लाॅक चैन क्षेत्रात असलेल्या करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत?
ब्लाॅक चैन इंडस्ट्री मध्ये आपण खालील दिलेल्या विविध पदांवर काम करू शकतो.
ब्लाॅकचैन लिगल कन्सल्टंट
ब्लाॅक चैन इंजिनिअर
ब्लाॅक चैन डेव्हलपर
ब्लाॅक चैन एक्सपर्ट
ब्लाॅक चैन आर्किटेक्ट
इत्यादी
वरील दिलेल्या सर्व पदांमध्ये ब्लाॅक चैन इंजिनिअर अणि डेव्हलपर ह्या पदाला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अधिक मागणी आहे.अणि यात आपणास भरघोस वेतन देखील प्राप्त होत असते.
ब्लाॅक चैन इंजिनिअर कोण असतो त्याचे काम काय असते?
ब्लाॅक चैन इंजिनिअरला वेगवेगळ्या जबाबदारींचे पालन करावे लागत असते.
ब्लाॅक चैन इंजिनिअर हा ब्लाॅक चैन प्रोटोकॉल वर संशोधन करणे ब्लाॅक चेन प्रोटोकॉल तयार करणे,त्यांना डिझाईन करणे,त्यात सुधारणा घडवून आणणे,त्यावर टेस्टिंग करणे ही सर्व कामे ब्लाॅक चेन इंजिनिअर करीत असतो.
याचसोबत तो ब्लाॅक चेन नेटवर्क आर्किटेक्चरला डेटाला सेंट्रलाईज तसेच डीसेंट्रलाईज करण्यासाठी डिझाईन करत असतो.
ब्लाॅक चैन टेक्नाॅलाजी वर आधारित नवनवीन साॅफ्टवेअर अॅप तयार करणे, क्लाईंटच्या आवश्यकता नुसार फ्रंट एंड डेव्हलपमेंटचे काम करणे इत्यादी कामे ब्लाॅक चैन इंजिनिअरला करावी लागत असतात.
ब्लाॅक चेन इंजिनिअर बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?
ब्लाॅक चेन इंजिनिअर बनण्यासाठी आपणास सर्वप्रथम सायन्स क्षेत्रात फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे तिन्ही विषय घेऊन बारावी चांगल्या गुणांनी पास व्हावे लागते.
समजा बारावी मध्ये आपल्याला चांगले टक्के असतील तर आपणास भारतातील उत्तम काॅलेज तसेच युनिव्हसिर्टी मध्ये बॅचलर डिग्री कोर्स साठी अॅडमिशन मिळण्याचे चान्सेस अधिक असतात.
कारण अशा काॅलेज मध्ये अॅडमिशन प्राप्त करण्यासाठी बारावीला किमान ७५ ते ८० टक्के असणे आवश्यक असते.
ब्लाॅक चैन इंजिनिअर बनण्यासाठी आपण कोणकोणते कोर्स करू शकतो?
ब्लाॅक चैन इंजिनिअर बनण्यासाठी आपण बॅचलर डिग्री मध्ये आपण कंप्युटर सायन्स मध्ये बीएससी किंवा बीसीए हे कोर्स करू शकतो.
जर आपल्याला यात मास्टर डिग्री हवी असेल तर आपण मास्टर डिग्री मध्ये एमसीए,एम एस सी करू शकतो.
किंवा यात आपण पीएचडी एम फिल देखील करू शकतो.याने आपल्याला करिअरच्या विपुल संधी उपलब्ध होतात.
किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण कंप्युटर सायन्स मध्ये बीटेक करू शकतो.यानंतर आपल्याला यात प्रोफेशनल ब्लाॅक चेन सर्टिफिकेट कोर्स तसेच डिप्लोमा देखील करता येतो.
सर्टिफिकेट कोर्स केल्याने आपणास चांगल्या नोकरीची संधी प्राप्त होत असते म्हणून आपण सर्टिफिकेट कोर्स करणे आवश्यक असते.आज आॅनलाईन आॅफलाईन सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध करून देणारया अनेक संस्था इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
ब्लाॅक चेन इंजिनिअर बनण्यासाठी आपल्या अंगी कोणकोणते गुण कलाकौशल्य असणे आवश्यक आहे?
प्रोग्रामिंगचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लॅगवेजचे नाॅलेज असायला हवे.
साॅफ्टवेअर डेव्हलपमेंटचे, डेटा स्ट्रक्चर अणि अलगोरिदमचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
ओपन सोर्स प्रोजेक्ट वर काम करण्याचे प्रॅक्टीकल नाॅलेज असायला हवे.
कोडिंगचे ब्लाॅक चेन इको सिस्टीमचे पीपल टु पीपल नेटवर्कचे उत्तम नाॅलेज असायला हवे.
ब्लाॅक चैन डेव्हलपमेंट टुलसचे देखील आपणास उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
बिटकाॅईन लिथियम इत्यादी सारख्या टाॅप ब्लाॅगचेन टेक्नाॅलाजीवर काम करण्याचा चांगला अनुभव असायला हवा
ब्लाॅक चेन इंजिनिअरला वेतन किती प्राप्त होते?
ब्लाॅक चैन इंजिनिअर बनल्यावर आपणास सुरूवातीला २५ ते ४० हजार इतके वेतन दिले जाते आपल्या अनुभवानुसार स्कीलनुसार यात कालांतराने अधिक वाढ केली जाते.अणि आपले स्कील अॅडव्हान्सड लेव्हलचे असेल तर वेतन देखील अधिक जास्त दिले जाते.
ब्लाॅक चेन इंजिनिअर म्हणून परदेशात आपणास अधिक वेतन प्राप्त होते.परदेशात अमेरिका युएस इत्यादी सारख्या ठिकाणी ब्लाॅक चेन इंजिनिअर म्हणून काम केल्यास आपणास सुरूवातीला दरमहा एक ते दोन लाख इतके वेतन प्राप्त होऊ शकते.