इन्व्हेस्टमेंट बॅकर कसे बनायचे? how to become investment banker

बॅकेचे दोन मुख्य प्रकार पडतात एक आहे कमर्शियल बॅक अणि दुसरे असते इन्व्हेस्टमेंट बॅक.

कमर्शियल बॅक मध्ये सर्वसामान्य व्यक्ती देखील आपले खाते उघडु शकतात.याला रेग्युलेट करण्याचे काम आरबीआय करते.

इन्व्हेस्टमेंट बॅक म्हणजे काय?

इन्व्हेस्टमेंट बॅक ही एक आर्थिक सल्लागार कंपनी तसेच संस्था आहे.

इन्व्हेस्टमेंट बॅक ही मोठमोठ्या वित्तीय संस्था फर्म तसेच कंपनींना आर्थिक सल्ला देण्याचे,शिफारशी करण्याचे काम करते.

याने कंपनीला आपल्या पैशाचा योग्य रित्या उपयोग करता येतो.अणि आपल्या उद्योग व्यवसायात देखील अधिक वाढ,प्रगती करता येते.

इन्व्हेस्टमेंट बॅकर कोण असतो?

how to become investment banker
how to become investment banker

इन्व्हेस्टमेंट बॅकर हा आर्थिक सल्लागार असतो जो कुठल्याही आर्थिक सल्लागार संस्था फर्म तसेच कंपनीमध्ये काम करत असतो.

जेव्हा एखाद्या कंपनीला आपल्या व्यवसाय उद्योगाच्या विस्तारासाठी भांडवल उभारायचे असते.

तेव्हा इन्व्हेस्टमेंट बॅकर त्या कंपनींच्या वतीने मार्केट मध्ये रिसर्च करत असतात अणि त्या कंपनीला गुंतवणूक करण्यासाठी इन्व्हेस्टर शोधून देत असतात.जेणेकरून त्या कंपनीला आपल्या उद्योग व्यवसायाचा अधिक विस्तार करता येईल.

एखाद्या कंपनीची खरेदी करायची असेल किंवा तिला आपल्या कंपनीत मर्ज करायचे असेल तर अशा परिस्थितीत देखील इन्व्हेस्टमेंट बॅकर आपणास मदत करीत असतात.

पण ह्या बदल्यात इन्व्हेस्टमेंट बॅकर ५० टक्के कमिशन देखील घेत असतात.

इन्व्हेस्टमेंट बॅकर कसे बनायचे?

कुठल्याही इन्व्हेस्टमेंट बॅक मध्ये इन्व्हेस्टमेंट बॅकर बनुन काम करण्यासाठी एक स्टेप बाय स्टेप प्रक्रिया असते.जी पुर्ण करणे आपणास आवश्यक असते.

इन्व्हेस्टमेंट बॅक मध्ये बेसिक पासुन अॅडव्हान्सड लेव्हल पर्यंतची पदे असतात ह्या प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेच्या अटी असतात.

ह्या पातळ्या कोणकोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊयात.अणि कोणत्या पातळीवर काम करण्यासाठी किती शिक्षण आवश्यक असते हे देखील जाणुन घेऊया.

१) सहयोगी स्तर -associate level

See also  महाराष्ट्र विधवा पेंशन योजना २०२३ विषयी माहिती - Maharashtra Vidhawa Pension Scheme

सहयोगी स्तरावरून एखाद्या संस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट बॅकर म्हणून काम करण्यासाठी प्रवेश प्राप्त करून करीअर करण्यासाठी आपल्याकडे खालील दिलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.

सहयोगी स्तरावरून काम करण्यासाठी करिअरला सुरुवात करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता -eligibility criteria for associate level

एखादया इन्व्हेस्टमेंट बॅक मध्ये सहयोगी स्तरावरून आपल्या करीअरची सुरूवात करण्यासाठी आपल्याकडे फायनान्स संबंधित कुठलीही एक डिग्री असणे आवश्यक आहे.

उदा,बीबीए इन फायनान्स,बी काॅम हाॅन्स इन फायनान्स अॅण्ड अकाऊंटींग,बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स,बॅचलर ऑफ बिझनेस इकोनाॅमिक्स

इतर शाखेतुन पदवीधर असले तरी देखील चालते पण असोसिएट लेव्हल वर काम करण्यासाठी इंटरव्ह्यू देताना आपल्याला अडचण येऊ शकते.कारण आपले बेसिक पक्के नसल्याने काही फायनान्स संबंधित टर्म लक्षात येत नसतात.

म्हणुन कुठल्याही इन्व्हेस्टमेंट बॅक मध्ये सहयोगी स्तरावरून आपल्या करीअरची सुरूवात करण्यासाठी आपल्याकडे फायनान्स संबंधित एखादी डिग्री असायलाच हवी.

सहयोगी स्तरावरून करीअरला सुरूवात केल्यानंतर जसजसे आपल्या अनुभवात तसेच स्कील मध्ये वाढ होत जाते तसतसे आपल्या वेतनात वाढ होत असते दोन ते तीन वर्षांच्या कालावधी नंतर आपणास सहयोगी स्तरावरून अॅनॅलिस्ट ह्या पुढच्या स्तरावर पातळीवर काम करण्यासाठी प्रमोशन दिले जाते.

सहयोगी पदावरून आपण अॅनॅलिस्ट,मॅनेजर,वाईस प्रेसिडेंट,एमडी इत्यादी मोठमोठ्या स्तरावरील पदांवर जाऊ शकतो.

२) विश्लेषक पातळी -analyst level

जर आपणास एखाद्या इन्व्हेस्टमेंट बॅक मध्ये विश्लेषण पातळीवरून काम करायला सुरुवात करायची आहे, आपल्या करिअरला सुरुवात करायची आहे तर यासाठी आपल्याकडे काही प्रोफेशनल डिग्री असणे आवश्यक असते.

उदा,एम बीए इन फायनान्स,सीएफ ए,सीए,

३) व्यवस्थापक -manager level

आपली उत्तम कामगिरी बघुन विश्लेषक पदावरून पुढे प्रमोट करण्यात आल्यावर आपणास इन्व्हेस्टमेंट बॅक मध्ये मॅनेजर ह्या पदावर काम करता येते.

४) उपाध्यक्ष -vice president

व्यवस्थापक पदावर देखील उत्तम कामगिरी केल्यावर आपणास पुढे प्रमोट करण्यात आल्यावर इन्व्हेस्टमेंट बॅक मध्ये वाईस प्रेसिडेंट ह्या पदावर काम करता येते.

See also  PM-KMY -प्रधानमंत्री किसान मानधन योजना विषयी माहीती-2023 Updates - Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana (PM-KMY)

५) व्यवस्थापकीय संचालक-managing director chairman

वाईस प्रेसिडेंट पदावरून पुढे प्रमोट करण्यात आल्यावर आपणास इन्व्हेस्टमेंट बॅक मध्ये एमडी तसेच चेअरमन ह्या पदावर काम करता येते.

हे इन्व्हेस्टमेंट बॅक मधील सर्वात मोठे अणि शेवटचे पद आहे.

इन्व्हेस्टमेंट बॅकरचे काम काय असते?

इन्व्हेस्टमेंट बॅकरचे मुख्य काम कॅपिटल मार्केट मध्ये ज्या कंपनीना आपला आयपीओ काढायचा असतो अशा कंपनींना इन्व्हेस्टमेंट बॅकर हे आवश्यक ती मदत करीत असतात.

याचसोबत जेव्हा एका कंपनीला दुसरया कंपनीला आपल्यामध्ये सामावून घ्यायचे असते किंवा खरेदी करायचे असते तेव्हा तिथे त्या कंपनीला इन्व्हेस्टमेंट बॅकर ह्या कामात मदत करत असतात.

कंपनीच्या संपत्तीचे व्यवस्थापन करण्याचे काम देखील इन्व्हेस्टमेंट बॅकर करीत असतात.कंपनीच्या वतीने रिसर्च करणे ट्रेडिंग तसेच ब्रोकरेज करणे इत्यादी कामे देखील करीत असतात.

इन्व्हेस्टमेंट बॅक मध्ये सहयोगी तसेच विश्लेषक स्तरावरून करीअरला सुरूवात केल्यानंतर काॅर्पोरेट फायनान्स मध्ये काम करताना आपल्या कस्टमरला भांडवलात वाढ करण्यासाठी मदत करावी लागते.

जेव्हा आपल्या कस्टमरला मार्केटमध्ये एखादा नवीन प्रोडक्ट लाॅच करायचा असतो किंवा मार्केट मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या व्यवसायात वाढ वृदधी करण्यासाठी भांडवल गोळा करायचे असते तेव्हा आपल्याला आपल्या कस्टमरकरीता वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी तयार कराव्या लागतात.

आपल्या कस्टमरने किती पैसा मार्केट मधुन उचलायला हवा अणि किती स्वता टाकायला हवा जेणेकरून त्याचा अधिक फायदा होईल याबाबद सल्ला देण्याचे काम देखील इन्व्हेस्टमेंट बॅकर करीत असतात.

काॅर्पोरेट फायनान्स मध्ये काम करण्यासाठी आपल्याला applied finance ह्या विषयाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे कारण यात आपल्याला आपल्या क्लाईंटच्या शेअर होल्डर व्हॅल्यू मध्ये वाढ करायची असते.

ज्यासाठी आपल्याला क्लाईट करीता लाॅग टर्म अणि शाॅर्ट टर्म दोघांकरीता स्ट्रॅटेजी तयार कराव्या लागतात.अणि ह्या स्ट्रॅटेजी आपल्या क्लाईटला त्याच्या व्यवसाय उद्योगात अंमलात आणण्यासाठी मदत देखील करावी लागते.

इन्व्हेस्टमेंट बॅकर विलनीकरण अणि अधिग्रहण (merge and acquisitions) ह्या विभागात खुप जास्त कमाई करत असतात.

See also  किसान क्रेडिट कार्ड अर्ज पद्धत आता अगदी सोपी-KISAN CREDIT CARD SATURATION DRIVE

सर्व इन्व्हेस्टमेंट बॅक मध्ये सर्वात जास्त रिव्हेन्यु ह्याच विभागामुळे जमा होताना आपणास दिसून येत असतो.पण ह्या विभागात काम करण्यासाठी आपल्याकडे फायनान्स सर्विस संबंधित कामाचा किमान चार ते पाच वर्षांचा अनुभव असायला हवा.

इन्व्हेस्टमेंट बॅकरला विलनीकरण अणि अधिग्रहण (merge and acquisitions) ह्या विभागात खुप काठिण्य पातळीवरील कामे करावी लागत असतात.

उदा, समजा एक कंपनी आहे त्या कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धीला संपवण्यासाठी मार्केट मध्ये असलेल्या एका दुसरया कंपनीवर अधिग्रहण प्राप्त करायचे आहे.ती दुसरी कंपनी आणि ती कंपनी दोघे सारखाच उद्योग व्यवसाय करीत आहेत.

तेव्हा अशा परिस्थितीत या दोघांमध्ये इन्व्हेस्टमेंट बॅकर एक महत्वाची भुमिका पार पाडत असतो तो दोघे कंपनींना आपल्या संपत्तीचे मुल्य काय ठेवायला हवे,भावताव कसा करायचा आपल्या शेअर्सची किंमत काय अणि किती ठेवावी हे सांगत असतो.जेणेकरून दोघांना फायदा होईल.

याचसोबत जर आपणास शेअर मार्केटचे उत्तम ज्ञान आहे कोणत्या शेअर्सची किंमत कधी वर जाते कधी खाली जाते ह्या सर्व गोष्टींचे उत्तम ज्ञान आहे तर आपण अॅनॅलिस्ट ह्या पातळीवरून कॅपिटल मार्केट मध्ये काम करू शकतो.

यात आपणास आपल्या क्लाईट कंपनीला मार्केट मध्ये शेअर तसेच सिक्युरीटीज इशू करण्याची योग्य वेळ काय आहे हे सांगायचे असते.हया इशू केलेल्या शेअर्सची किंमत काय असायला हवी.याबाबद मार्गदर्शन करायचे असते.

तसेच ज्या कंपनींना मार्केट मध्ये शेअर्सची खरेदी विक्री करायची आहे पण असे करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध नसतो अशा कंपनींच्या वतीने आपण सेल्स अणि ट्रेडिंग देखील करू शकतात.

यात आपल्याला त्या कंपनीच्या वतीने सिक्युरीटीज शेअर्स मध्ये डील करावी लागते.शेअर्सची खरेदी विक्री करावी लागते यात देखील काम करण्यासाठी आपल्याला शेअर मार्केटचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.