रिसेप्शनिस्ट म्हणजे काय-How to become receptionist
आपल्यातील खुप जण असे असतात ज्यांना इतरांसोबत उत्तमरीत्या संवाद साधता येतो त्यांच्या मध्ये एक उत्तम संवाद संभाषण कौशल्य असते.
अशा व्यक्तींसाठी खासकरून महिलांसाठी रिसेप्शनिस्ट हे एक उत्तम करीअरचे आॅप्शन ठरू शकते.
आज प्रत्येक कंपनीत,हाॅटेल,रेस्टॉरंट मध्ये आपणास प्रवेश केल्यावर सुरूवातीलाच डेस्कवर एक महिला,रिसेप्शनिस्ट बसलेली दिसुन येते.जी हाॅटेलात रेस्टॉरंट मध्ये तसेच आपल्या कंपनी मध्ये येत असलेल्या अतिथींचे हसुन स्वागत करते.यालाच फ्रंट डेस्क जाॅब असे देखील म्हटले जाते.
जेव्हा आपण एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू करीता किंवा मीटिंग करीता जातो.तेव्हा तिथे फ्रंट डेस्कवर एक महिला कंप्युटरवर काम करत बसलेली असते जी आपले स्वागत करते अणि मिटिंग साठी आपल्याला तिच्याकडे अपाॅईटमेंट घ्यावी लागते.मग त्या वेळेनुसार आपली मिटिंग फिक्स केली जात असते.
याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या हाॅटेलात रेस्टॉरंट मध्ये जात असतो तेव्हा हाॅटेल मध्ये रूम बुक करण्यासाठी इत्यादी वगैरे कामाकरीता आपणास रिसेप्शन एरिया मध्ये बसलेल्या रिसेप्शनिस्ट कडे जावे लागते.
मग ती आपल्याला हाॅटेलात रूम उपलब्ध आहे किंवा नाही हे बघुन सांगत असते.हाॅटेल रेस्टॉरंट मध्ये रूम बुक करताना चेक इन किंवा रुम सोडण्यासाठी चेक आउट करायला देखील आपणास पहिले रिसेप्शनिस्टला भेटावे लागते.
रिसेप्शनिस्टचे काम काय असते?
आपण काम करत असलेल्या कंपनीत,हाॅटेल रेस्टॉरंट संस्था इत्यादी मध्ये आलेले कस्टमरचे आलेले सर्व फोन अटेंड करणे,आलेले काॅल इतर विभागात ट्रान्स्फर करणे,कंपनीत भेटीसाठी आलेल्या व्यक्तींचे मिटिंग अरेंज करणे,
अपाॅईटमेंट फिक्स करणे,भेटीसाठी शेड्युल मेंटेन करणे, भेटीसाठी आलेल्या कस्टमरचे नाव नंबर घेऊन त्याची नोंद करून रेकाॅर्ड तयार करणे,आलेल्या ईमेलवर प्रत्यूत्तर देणे प्रतिसाद देणे.
हाॅटेल रेस्टॉरंट कंपनीमध्ये आलेल्या अतिथींचे हसुन स्वागत करणे, त्यांचा पाहुणचार करणे,त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे,त्यांच्या समस्या सोडविणे,इत्यादी महत्वाची कामे रिसेप्शनिस्टला करावी लागतात.
रिसेप्शनिस्ट बनण्यासाठी आपल्या अंगी कोणकोणते गुण कलाकौशल्य असणे आवश्यक आहे?
रिसेप्शनिस्ट बनण्यासाठी आपल्या अंगी खालील दिलेली काही महत्वाची कला कौशल्य असणे आवश्यक आहे.
१) उत्तम संवाद संभाषण कौशल्य
२) संस्थेतील कंपनीतील काम करण्याचे कौशल्य म्हणजे संस्थात्मक कौशल्य असायला हवे.
३) कंप्युटरचे उत्तम नाॅलेज असणे आवश्यक आहे.तसेच टेक्नीकल नाॅलेज देखील असायला हवे.
४) एकाच वेळी अनेक काम करण्याचे कौशल्य
५) समस्या सोडविण्याचे कौशल्य
रिसेप्शनिस्ट बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?
रिसेप्शनिस्ट बनण्यासाठी आपले किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.पण काही कंपनींमध्ये रिसेप्शनिस्ट पदावर काम करण्यासाठी बॅचलर डिग्री असणे आवश्यक असते.
ज्या महिलांना एखाद्या हाॅटेलात रेस्टॉरंट मध्ये रिसेप्शनिस्ट बनायचे आहे त्यांना हाॅसपिटॅलिटी हा कोर्स देखील पुर्ण करावा लागत असतो.
आपण भारतातील एखाद्या खाजगी संस्थेतुन अकॅडमी मधून रिसेप्शनिस्टचा हाॅटेल मॅनेजमेंटचा कोर्स देखील पुर्ण करू शकतात.
रिसेप्शनिस्टचे वेतन किती असते?
हाॅटेल रेस्टॉरंट कंपनी खाजगी संस्था ह्या सर्व ठिकाणी रिसेप्शनिस्टला वेगवेगळे वेतन दिले जाते.कारण आपण काम करत असलेली संस्था किती मोठी आहे तिथल्या फॅसिलिटी नियम अटी काय आहेत त्यावर आपले वेतन ठरत असते.
खाजगी संस्था कंपनींच्या तुलनेत हाॅटेल रेस्टॉरंट मध्ये कामाला असलेल्या रिसेप्शनिस्टला जास्त वेतन दिले जाते.
रिसेप्शनिस्ट पदावर काम केल्यास आपणास करीअर संधी देखील विपुल प्रमाणात प्राप्त होतात.
एखादया संस्थेत जर आपण व्यवस्थित मन लावून निष्ठेने काम केले तर पुढे जाऊन आपणास तिथे प्रमोशन मिळुन आॅफिस मॅनेजर देखील बनता येते.किंवा आपण हेड सिनिअर तसेच हेड रिसेप्शनिस्ट देखील बनू शकतात.
रिसेप्शनिस्ट बनल्यावर आपणास सुरूवातीला २० ते ३० हजार महिन्याला वेतन दिले जातात.
रिसेप्शनिस्ट बनल्यावर आपणास कुठे कुठे नोकरी करता येते?
१) वेगवेगळ्या काॅर्पोरेट आॅफिस मध्ये तसेच वेगवेगळ्या कंपनीं मध्ये
२) हाॅटेल
३) रेस्टॉरंट
४) हाॅस्पिटल
५) शाळा महाविद्यालयात किंवा एखाद्या विद्यापीठात
६) सरकारी किंवा खासगी कार्यालये संस्थांमध्ये