महाराष्ट्र विधवा पेंशन योजना २०२३ विषयी माहिती- Maharashtra Vidhawa Pension Scheme
महाराष्ट्र विधवा पेंशन काय आहे?
महाराष्ट्र विधवा पेंशन ही एक महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे.
ह्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व विधवा महिलांना आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाच्या तसेच मुला बाळांच्या संगोपनासाठी पालनपोषणासाठी थोडाफार आर्थिक निधी देऊन मदत केली जाते.
महाराष्ट्र विधवा पेंशनची सुरूवात कोणी केली आहे?
महाराष्ट्र विधवा पेंशनची सुरूवात महाराष्ट्र राज्य शासनाकडुन करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेअंतर्गत महिलांना किती रक्कम मिळणार आहे?
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना आर्थिक हातभार म्हणून दरमहा सहाशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.
तसेच ज्या महिलांना एकापेक्षा जास्त अपत्य म्हणजेच मुले बाळे आहेत त्यांना दरमहा आपले अपत्य २५ वर्षाचे होईपर्यंत ९०० रूपये इतके आर्थिक साहाय्य प्रदान केले जाणार आहे.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजना का सुरू करण्यात आली आहे?
आपल्या महाराष्ट्र राज्यात अशा अनेक गरजु स्त्रिया आहेत ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे.अणि पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्याकडे आपला अणि आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करण्याचे गुजरान करण्याचे कुठलेही साधन आज उपलब्ध नाहीये.
अशा गरजु महिलांना आपल्या अणि आपल्या कुटुंबाच्या, मुलाबाळांच्या किमान मुलभूत गरजा भागविता याव्यात तसेच त्यांचे व्यवस्थित संगोपन,पालनपोषण करता यावे याकरीता महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र विधवा पेंशन योजना सुरू केली आहे.
ह्या योजनेचा मुख्य हेतु हा विधवा महिलांना थोडीफार का होईना आर्थिक मदत प्राप्त व्हावी त्यांची आर्थिक अडीअडचण दुर व्हावी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व गरीब विधवा महिला कोणावरही अवलंबून न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम अणि आत्मनिर्भर बनाव्यात हा आहे.
म्हणून सरकारने ही महाराष्ट्र विधवा पेंशन योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक रहिवासी असलेल्या आर्थिक दृष्ट्या असहाय्य अणि निराधार विधवा महिला घेऊ शकणार आहे.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेची आॅफिशिअल वेबसाईट कोणती आहे?
mumbaisuburban.gov.in ही महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेची आॅफिशिअल वेबसाईट आहे.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचे फायदे कोणते आहेत?
● महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक रहिवासी असलेल्या आर्थिक दृष्ट्या निराधार अणि असहाय्य अशा गरीब विधवा महिलांना आपल्या मुलभूत गरजा भागविता याव्यात किमान इतकी आर्थिक मदत केली जाणार आहे.
● महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेअंतर्गत जो निधी उपलब्ध होईल त्या निधीमध्ये विधवा महिला आपले अणि आपल्या मुला बाळांचे भरणपोषण करू शकतात.
● ह्या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व गरीब विधवा महिलांना एक आर्थिक हातभार प्राप्त होणार आहे म्हणजे त्यांना कुठल्याही अडीअडचणी विना पतीच्या निधनानंतर देखील आपल्या मुला बाळांचे संगोपन भरणपोषण करता येणार आहे.
● महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेमुळे सर्व विधवा महिलांना आपल्या कुटुंबाच्या जास्त नव्हे पण किमान आवश्यक गरजा भागविता येणार आहे.
● महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेअंतर्गत वितरीत केली जात असलेली रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात डायरेक्ट ट्रान्स्फर केली जाते.
● ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे अणि आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी पैसा कमविण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही कमाईचे साधन स्रोत नाहीये अशा गरजु विधवा महिलांसाठी ही योजना खुप लाभदायक ठरणार आहे.
● ज्या महिलांची फारकती झाली आहे अशा गरीब निराधार निराश्रित महिला देखील ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत?
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
● लाभार्थी महिलेचे आधार कार्ड,मतदान कार्ड
● लाभार्थी महिलेच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाण
● लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवासी असल्याचे प्रमाण
● पतीच्या मृत्युचे प्रमाण
● जात प्रमाणपत्र
● बँक खाते पासबुक
याचसोबत दोन पासपोर्ट साईज फोटो अणि लाभार्थी महिलेचा मोबाईल नंबर ईमेल आयडी देखील लागणार आहे.
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपले बँक अकाऊंट आपल्या आधार कार्डशी लिंक करून घेणे अनिवार्य आहे.
कोणत्या महिला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत?
जी महिला आधीपासूनच सरकारच्या एखाद्या योजनेचा लाभ घेत आहे किंवा एखाद्या सरकारी विभागात खात्यात नोकरी करीत आहे अशी विधवा महिला ह्या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?
● लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न २१ हजार पेक्षा अधिक नसावे.ज्या महिला दारिद्र्य रेषेखाली येतात अशा महिलांना ह्या योजनेसाठी विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
● ६५ पेक्षा कमी वय असलेल्या महिला फक्त ह्या योजनेचा लाभ प्राप्त करू शकणार आहे.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?
● महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपणास योजनेच्या आॅफिशिअल वेबसाईट वर जायचे आहे.
● महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेच्या आॅफिशिअल वेबसाईट वर गेल्यावर योजनेच्या होम पेज वर जायचे.
● होम पेज वर गेल्यावर आपणास एक फाॅर्म नावाचे आॅप्शन दिसुन येईल.त्यावर क्लिक करायचे आहे.फाॅमवर क्लिक केल्यावर आपल्याला फाॅर्मची यादी दिसुन येईल.
● दिलेल्या सर्व फाॅमच्या यादीत आपणास संजय गांधी निराधार योजनेचे आॅप्शन निवडायचे आहे.फाॅममधुन संजय गांधी निराधार योजना हा पर्याय निवडुन झाल्यावर स़ंजय गांधी निराधार योजनेची अ्ॅपलीकेशन पीडीएफ डाऊनलोड करून घ्यायची आहे.
● डाऊनलोड तसेच प्रिंट काढलेला फाॅम व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.फाॅमला आवश्यक ते कागदपत्र जोडुन घ्यायचे आहे.
● यानंतर तहसिलदार कार्यालय मध्ये जाऊन सदर भरलेला फॉर्म जमा करायचा आहे.