उमंग ॲपमधुन सातबारा डाऊनलोड कसा करायचा? – How to download 7/12 from Umang app in Marathi

उमंग ॲप मधुन सातबारा डाऊनलोड कसा करायचा?how to download 7/12 from Umang app in Marathi

महाराष्ट्र शासनाने उमंग ॲप दवारे सातबारा डाऊनलोड करण्याची सुविधा आता लाईव्ह सुरू केली आहे.

आजच्या लेखात आपण उमंग ॲप मधुन सातबारा कसा डाऊनलोड कसा करायचा हे जाणुन घेणार आहोत.

आपल्या मोबाईल मध्ये उमंग ॲप दवारे सातबारा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपणास प्ले स्टोअर वर जाऊन उमंग ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड तसेच इंस्टाॅल करून घ्यायचे आहे.

How to download 7/12 from Umang app in Marathi
How to download 7/12 from Umang app in Marathi

ॲप डाऊनलोड करून इंस्टाॅल केल्यानंतर काही परमिशन ॲप दवारे मागितली जाईल ती परमिशन आपणास ह्या अॅपला द्यायची आहे.

  1. यानंतर स्क्रीनवर आपणास welcome to Umang ह्या नावाखाली register login असा एक पर्याय दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
  2. पुन्हा एकदा आपल्याकडुन काही परमिशन मागितली जाईल ती परमिशन द्यायची आहे.परमिशन दिल्यानंतर आपल्या समोर लाॅग इन पेज ओपन होईल.
  3. ज्यांचे उमंग ॲप वर आधीपासून अकाऊंट ओपन आहे अशा व्यक्तींनी मोबाईल नंबर टाकुन ओटीपीच्या साहाय्याने लाॅग इन करायचे आहे.
  4. अणि ज्यांचे उमंग ॲप वर अकाउंट ओपन नाहीये अशा व्यक्तींनी new on umang register here वर क्लिक करायचे आहे.
  5. यानंतर रेजिस्ट्रेशन करण्यासाठी आपणास मोबाईल नंबर टाकुन एक पिन तयार करायचा आहे.अणि सर्वप्रथम आपले अकाऊंट तयार करून घ्यायचे आहे.
  6. अकाऊंट ओपन करून झाल्यावर लाॅग इन करायचे आहे.अणि खाली दिलेल्या दोन नंबरचा all services हा पर्याय निवडायचा आहे.
  7. All services वर क्लिक केल्यावर आपणास वेगवेगळ्या सर्विसेस दिसुन येईल त्यात आपल्याला आपले सरकार महाराष्ट्रला सिलेक्ट करायचे आहे.
  8. यात आपणास आपले सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व सर्विसेस दिसुन येतील.यात खाली स्क्रोल करून आल्यावर आपणास maharashtra land record नावाची एक सर्विस दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
  9. यात आपणास download 7/12 land record अणि check your wallet balance असे दोन आॅप्शन दिसुन येतील.
  10. सातबारा डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला आपल्या वाॅलेट मध्ये पैसे अॅड करायचे त्यासाठी आपणास check your wallet balance वर क्लिक करायचे आहे.
  11. यानंतर आपणास मोबाईल नंबर इंटर करून खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.यानंतर आपल्या वाॅलेट मध्ये किती बॅलन्स शिल्लक आहे हे दिसून येईल.
  12. वाॅलेट मध्ये बॅलन्स नसल्यास खाली दिलेल्या add balance वर क्लिक करायचे आहे अणि pay now पैसे भरा यावर क्लिक करायचे आहे.
  13. यानंतर enter amount मध्ये अमाऊंट टाकुन घ्यायचे आहे रक्कम मध्ये आपण किमान 15 रूपये अणि जास्तीत जास्त हजार रुपये पर्यंत अमाऊंट इंटर करू शकतो.
  14. यानंतर आपण पेमेंट कुठून करणार आहे ते पेमेंट गेटवे बॅक ऑफ बडोदा सिलेक्ट करायचे आहे.अणि पे नाऊ वर क्लिक करायचे आहे
See also  Jio चे ३ नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन ४० जीबी पर्यंत मोफत डेटा

यानंतर डेबिट कार्ड हे आॅप्शन सिलेक्ट करायचे आहे.डिटेल्स भरायची आहे अणि पेमेंट करायचे आहे.पेमेंट केल्यानंतर available balance मध्ये आपणास वाॅलेट मध्ये किती रक्कम शिल्लक आहे ते दिसुन येईल.

यानंतर पुन्हा आपले सरकार महाराष्ट्रवर जायचे आहे.आपले सरकारच्या maharashtra land record वर क्लिक करायचे आहे.इथे check your wallet balance मध्ये आपण वाॅलेट मध्ये असलेली शिल्लक रक्कम बघू शकतो.

वाॅलेट मध्ये एक सातबारा डाऊनलोड करण्यासाठी 15 ते 20 रूपये अॅड करणे आवश्यक आहे.

  • यानंतर वर दिलेल्या download 7 12 land record वर क्लिक करायचे आहे.सातबारा डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपणास जिल्हा निवडायचा आहे.
  • नंतर ज्या ठिकाणचा सातबारा डाऊनलोड करायचा आहे त्या तालुक्याचे नाव अणि ज्या गावातील सातबारा डाऊनलोड करायचा आहे त्या गावाचे नाव टाकायचे आहे.
  • यानंतर enter servey number मध्ये भुमापन क्रमांक सर्वे नंबर गट नंबर टाकायचा आहे.
  • Select survey number मध्ये सर्वे नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
  • यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.यानंतर डाऊनलोड पर्यायावर क्लिक करून allow करायचे आहे.
  • यानंतर सातबारा आपल्यासमोर स्क्रीनवर ओपन होईल यानंतर कोपरयात दिलेल्या तीन डाॅट वर क्लिक करायचे आहे डाऊनलोड वर ओके करायचे आहे.यानंतर आपला सातबारा आपल्या मोबाईल मधील गॅलरीत येऊन जाईल.