इन्बाऊंड अणि आऊट बाउंड काॅल म्हणजे काय?Inbound and outbound call information
इन्बाऊंड अणि आऊट बाउंड काॅलिंग हे टेलिकाॅलिंगचे तसेच सेल्सचे दोन प्रमुख प्रकार आहेत.हया दोन सेल्सच्या प्रकाराच्या मदतीने कंपनी सेल्स जनरेट करत असते.
इन्बाऊंड सेल्स काॅल म्हणजे काय?
जेव्हा कस्टमर स्वता काॅल करून कंपनीकडुन प्रोडक्ट सर्विसेसची खरेदी करीत असतो तेव्हा त्या सेल्सला इन्बाऊंड सेल्स काॅल असे म्हटले जाते.
इन्बाऊंड सेल्स मध्ये कस्टमर हा स्वता कंपनीला टेलिकाॅलरला प्रोडक्ट सर्विस विषयी माहिती प्राप्त करण्यासाठी,किंवा त्या प्रोडक्ट सर्विस विषयी आपली तक्रार नोंदवण्यासाठी काॅल करत असतो.
यात कस्टमरला स्वता प्रोडक्ट सर्विसची खरेदी करायची असते त्यामुळे तो स्वताहून कंपनीला काॅल करतो यात आपणास फक्त कस्टमरला कंपनीच्या प्रोडक्ट सर्विस विषयी सविस्तर अणि सखोलपणे माहिती देणे आवश्यक असते.
इन्बाऊंड सेल्स मध्ये कस्टमरला कन्व्हेयन्स करण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता नसते.यात आपणास फक्त कस्टमरला त्या प्रोडक्ट सर्विसेसची खरेदी केल्याने काय फायदा होईल हे पटवून देणे आवश्यक असते.
इन्बाऊंड सेल्स करीता आपल्याला आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसचे उत्तम अणि सखोल नाॅलेज असायला हवे.जेणेकरून आपल्याला कस्टमरला त्या विषयी व्यवस्थित माहीती देता येईल.अणि तो कस्टमर आपल्या कंपनीचे प्रोडक्ट लगेच खरेदी करेल.
आऊट बाउंड सेल्स काॅल म्हणजे काय?
आऊट बाउंड सेल्स काॅल मध्ये इन्बाऊंड सेल्स काॅलच्या उलट प्रक्रिया असते.यात कस्टमर कंपनीचे प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी स्वता काॅल करत नसतो.
कंपनीच्या टेलिकाॅलरला टेलिमार्केटरला कस्टमरला फोन करून ते कंपनीचे प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करावे लागते.
यात इन्बाऊंड सेल्स काॅल पेक्षा जास्त मेहनत टेलिकाॅलरला घ्यावी लागते.जास्त अडीअडचणी समस्यांना सामोरे जावे लागते.
कारण यात कस्टमरला स्वता फोन करून आपल्या कंपनीचे प्रोडक्ट सर्विस खरेदी करण्यासाठी टेलिकाॅलरला राजी करावे लागते.यात काही कस्टमर कंपनीचे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी नकार देत असतात तर काही कस्टमर मेसेज काॅलचा कुठलाही रिप्लाय सुद्धा देत नसतात.
इथे आपल्याला कस्टमरला आपल्या प्रोडक्ट सर्विसेसची किती आवश्यकता गरज आहे हे पटवून द्यावे लागते आपले प्रोडक्ट सर्विस खरेदी करणे त्याच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते अणि असे करणे त्यांच्यासाठी किती अत्यावश्यक आहे हे पटवून देणे आवश्यक आहे.
- तेव्हा कुठे कस्टमर आपल्या कंपनीचे प्रोडक्ट सर्विस खरेदी करण्यासाठी तयार होत असतो.यात आपली कस्टमर कन्व्हेयन्सिंग पावर संवाद संभाषण कौशल्य उत्तम असणे आवश्यक आहे
- आऊट बाउंड सेल्स मध्ये कस्टमरच्या मनात आपले प्रोडक्ट सर्विस खरेदी करण्यासाठी रूची निर्माण करावी लागते आपले प्रोडक्ट सर्विस खरेदी करण्यासाठी आवश्यकता निर्माण करावी लागते.हे एक खुप चॅलेंजिंग काम असते.
- इथे आपल्याला शांत अणि मृदू भाषी असावे लागते कारण अनेक वेळा कस्टमर वैतागात असतात.
- ज्यामुळे ते टेलिकाॅलरशी टेलिमार्केटरशी उदधटपणे वागु शकतात.त्याच्याशी रागात बोलु शकतात अशा वेळी देखील टेलिकाॅलरने पेशनस ठेवणे आवश्यक आहे.अणि चांगल्या मधूर भाषेत कस्टमरशी बोलणे आवश्यक असते.