व्यवसाय विश्लेषकाची भुमिका काय असते?व्यवसाय विश्लेषकाची जबाबदारी काय असते? Business analyst important role and responsibilities

व्यवसाय विश्लेषकाची भुमिका काय असते?व्यवसाय विश्लेषकाची जबाबदारी काय असते?Business analyst important role and responsibilities

व्यवसाय विश्लेषक हा कंपनीच्या व्यवसाय उद्योगाचे सर्वप्रथम विश्लेषण करीत असतो.मग त्या व्यवसाय उद्योगात कोणकोणत्या समस्या अडचणी आहेत हे व्यवस्थित समजुन घेत असतो.

अणि मग ह्या अडचणीतुन समस्येतून कंपनीला बाहेर निघता यावे अणि कंपनीला अधिकाधिक नफा प्राप्त व्हावा यासाठी उपाय सुचवित असतो.

आज भारतातील मोठमोठ्या कंपन्या टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस,इन्फोसिस,विप्रो इत्यादी सारख्या मोठमोठ्या कंपन्या देखील आपल्या व्यवसायातील अडचणी समस्या जाणून घेण्यासाठी अणि आपल्या बिझनेसला प्राॅफिट मध्ये आणण्यासाठी त्यात प्रगती करण्यासाठी व्यवसाय विश्लेषकाची मदत घेत असतात.

व्यवसाय विश्लेषकाचे काम असते सर्वप्रथम आपल्या क्लाईंटच्या काय आवश्यकता आहे ते समजुन घेणे.यात व्यवसाय विश्लेषक आपल्या कस्टमरची भेट घेऊन त्याच्या आवश्यकता समजुन घेतो.

याने व्यवसाय विश्लेषकाला कस्टमरला हव्या असलेल्या व्यवसायातील आवश्यकतेनुसार कंपनीचा प्रोडक्ट तयार करता येत असतो.

यानंतर व्यवसाय विश्लेषकाला डाॅक्युमेंटेशनचे काम देखील करावे लागते.

जर कंपनीच्या एखाद्या प्रोडक्ट सर्विसेस मध्ये काही समस्या अडचणी येत असतील तर व्यवसाय विश्लेषकाला ह्या अडचणी विश्लेषण करून शोधुन काढाव्या लागतात.

ह्या अडचणी समस्या व्यवसाय उद्योगात का येत आहेत हे रिसर्च करून जाणुन घ्यावे लागते.त्यावर उपाययोजना देखील व्यवसाय विश्लेषकाला कराव्या लागतात.जेणेकरून कंपनीला त्या समस्येतून बाहेर पडता येईल.

याचसोबत आपल्या कंपनीतील प्रोडक्ट सर्विसेस वर काम करत असलेल्या टीमला टीम मेंबर्सला एकसाथ जोडुन ठेवण्याचे काम देखील व्यवसाय विश्लेषकाचे असते.यासाठी तो नियमितपणे टीम मिटिंग अरेंज करत असतो.

अणि कंपनीच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये सर्व टीम मधील मेंबर योग्य रीत्या एका डायरेक्शने काम करत आहे किंवा नाही याकडे लक्ष ठेवण्याचे काम करतो.हया टीम मिटिंग द्वारे प्रत्येक टीम मेंबरला आपली जबाबदारी समजावून सांगण्याचे काम देखील व्यवसाय विश्लेषकाचे असते.

व्यवसाय विश्लेषक हा कंपनीमधील साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रक्रियेत जे काही डेव्हलपमेंटचे काम चालले आहे त्याला ट्रॅक करण्याचे काम करतो.यासाठी तो सर्व साॅफ्टवेअर डेव्हलपर,साॅफ्टवेअर टेस्टर, स्टेक होल्डर यांच्यासोबत एक मिटिंग घेऊन सर्व साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रक्रियेच्या कामाचा आढावा घेत असतो.

See also  महाराष्ट्रातील ५ टाॅप इंजिनिअरींग काॅलेज प्रत्येक विद्यार्थ्याला करायचे आहे ह्या काॅलेजांमधुन बीटेकचे शिक्षण- 5 Top Engineering colleges in Maharashtra for B tech.

व्यवसाय विश्लेषक हा कुठल्याही कंपनीच्या संस्थेच्या आर्थिक वित्तीय निर्णयात सहभागी होऊन त्या कंपनीला संस्थेला नफा प्राप्त करून देत असतो.

व्यवसाय विश्लेषक हा मार्केट रिसर्च करून बाजाराची स्थिती लक्षात घेतो कस्टमरची मागणी आधी समजुन घेतो अणि मग त्यानूसार कंपनींच्या धोरणांमध्ये तसेच व्यवसाय प्रक्रियेत बदल घडवून आणत असतो.

यासाठी व्यवसाय विश्लेषक हा आपल्या प्रोडक्ट विषयी कस्टमरचा फिडबॅक देखील जाणुन घेत असतो अणि मग कस्टमरच्या मागणी आवश्यकता नुसार त्यात हवे ते बदल करत असतो.

क्लाईंटच्या आवश्यकतेनुसार प्रोडक्ट तयार करणे हे व्यवसाय विश्लेषकाचे काम असते.