जागतिक दृष्टिदान दिवस विषयी माहीती Information about World eye donation Day in Marathi
आपले डोळे हे निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात मोठी अणि अनमोल देणगी आहे.कारण डोळयांमुळेच आज आपल्याला ह्या सृष्टीतील निसर्गाने निर्माण केलेले प्रत्येक सौंदर्य पाहता येते आहे.त्याला अनुभवता येते आहे.
ह्या जगात सगळयांनाच हे नशीब प्राप्त होत नसते ह्या जगात असेही काही मुले,मुली,आहेत ज्यांची लहानपणीच एखाद्या अपघातात आपली दृष्टी गेली आहे किंवा ते जन्मतच अंध आहेत.
त्यांना ह्या सृष्टीचे सौंदर्य स्वताच्या डोळयांना बघायचे आहे.अनुभवायचे आहे.पण डोळयांची दृष्टी गेल्याने त्यांना हे सर्व करता येत नाही.निसर्गाच्या ह्या अनमोल सौंदर्याचा आनंद उपभोगता येत नाही.
अशाच काही गरजु मुलामुलींना पुन्हा हे जग पाहता यावे त्यांना देखील सृष्टीच्या सौंदर्याचा अनुभव घेता यावा यासाठी जगातील इतर व्यक्तींनी अशा गरजु मुलामुलींना आपल्या मृत्युनंतर आपले नेत्र दान करून मदत करावी याकरीता जनजागृती जागतिक दृष्टि दान दिनी म्हणजेच 10 जुन रोजी केली जाते.
आजच्या लेखात आपण ह्याच जागतिक दृष्टि दान दिन विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
जागतिक दृष्टिदान दिवस केव्हा आणि कधी साजरा केला जातो?
जागतिक दृष्टि दान दिन दरवर्षी 10 जुन रोजी संपुर्ण जगभरात आंतरराष्टीय स्तरावर साजरा केला जातो.
जागतिक दृष्टि दान दिवस का साजरा केला जातो?
संपूर्ण जगभरात लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृकता निर्माण करण्यासाठी,लोकांना नेत्रदानाचे महत्व पटवून देण्यासाठी,नेत्रदान करणे का गरजेचे आहे हे लोकांना समजावून सांगण्यासाठी दरवर्षी 10 जुन रोजी जागतिक पातळीवर जागतिक दृष्टि दान दिवस हा साजरा केला जातो.
मित्रांनो ह्या जगात अशी अनेक गरजु मुले मुली आहेत ज्यांचे डोळे नाहीये अशा अंध मुलामुलींना पुन्हा हे जग पाहण्याची संधी प्राप्त व्हावी त्यांना देखील ह्या सृष्टीच्या सौंदर्याचा अनुभव घेता यावा,त्यांना देखील आपल्या डोळयांनी ही सुंदर सृष्टी बघता यावी.
यासाठी जगातील इतर व्यक्तींनी अशा गरजु मुला मुलींना आपल्या मृत्युनंतर आपले नेत्र दान करून मदत करावी याकरीता जनतेत जागृती करण्यासाठी दरवर्षी 10 जुन रोजी जागतिक पातळीवर हा जागतिक दृष्टी दान दिन साजरा केला जातो.
जागतिक दृष्टीदान दिवस साजरा करण्याचे महत्वाचे मुख्य उददिष्ट कोणते आहे?
महाराष्टातील अत्यंत प्रसिदध नेत्ररोगतज्ञ यांच्या स्मरणार्थ दरवर्षी देखील हा दृष्टीदान दिवस साजरा केला जातो.
जागतिक दृष्टि दान दिवस कसा साजरा केला जातो?
● दरवर्षी 10 जुन रोजी जागतिक दृष्टि दान दिनी जनतेला नेत्रदानाचे महत्व सांगितले जाते.
● आपण नेत्रदान का करायला हवे याची आवश्यकता का आहे?आणि किती आहे हे लोकांना समजावून सांगितले जाते.
● लोकांना नेत्रदान करण्यासाठी प्रेरित तसेच प्रोत्साहित केले जाते.
● एखादे शिबिर आयोजित करून यादिवशी गरजु मुलामुलींना नेत्रदान केले जाते.
● आपण एखाद्या अंध व्यक्तीला आपले डोळे दान करून कसे त्याच्या अंधारमय जीवणात प्रकाश निर्माण करू शकतो याची जाणीव विविध कार्यक्रम,उपक्रम राबवून त्यादवारे लोकांना यादिवशी करून दिली जाते.आणि हे कार्य करण्यासाठी आज समाजात अनेक संस्था संघटना कार्यरत देखील आहे.
● आपण गरज मुलामुलींना आपले नेत्रदान करून कशापदधतीने देशाच्या भवितव्याचे रक्षण करू शकतो कशी समाजाची सेवा करु शकतो कसा आपला घेतलेला एक चांगला निर्णय एखाद्याचे आयुष्य बदलु शकतो हे सांगण्यात येते.
आपण नेत्रदान कसे करावे?
सगळयात आधी जवळच्या दवाखान्यात आय बंँकेमध्ये जाऊन नेत्रदानासाठी आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी.मग जेव्हा आपला मृत्यु होतो तेव्हा त्या आयबँक मध्ये कळवले जाते मग काही पाच सहा तासात ही नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली जात असते.
आपल्या मृत्युनंतर आपले डोळे काढुन एखाद्या गरजु अंध व्यक्तीला दिले जात असतात.
नेत्रदान करण्याचे फायदे तसेच महत्व कोणकोणते आहे?
● आज जगभरात लाखो लोक मरण पावतात त्यातील प्रत्येकाने जर मृत्युपुर्वी नेत्रदानासाठी आपली नाव नोंदणी केली आणि मरणानंतर आपले डोळे एखाद्या अंध गरजु व्यक्तीला दिले तर जगात अंधारामध्ये जीवन जगत असलेल्या अनेकांच्या जीवणात प्रकाश निर्माण होईल.जगात अंधव्यक्तींच्या असलेल्या अमाप संख्येत घट होईल.जगातील सर्व अंधांच्या जीवणाला प्रकाश मिळेल.
● आपल्या देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य असणारया अनेक अंध मुलामुलींच्या चिमुरडयांच्या जीवणात प्रकाशाची लाट येईल आणि त्यांना देखील आपले आणि देशाचे भवितव्य घडवता येईल.
आपले नेत्रदान कोण करू शकते?
● कुठलीही व्यक्ती आपले डोळे दुसरयाला दान करु शकते.यासाठी वयाचे देखील कुठलेच बंधन ठेवण्यात आलेले नाहीये.
कोणाला नेत्रदान करता येत नाही?
● अशी व्यक्ती जिला एडस असेल तसेच एखादे ब्लड इंस्पेक्शन असेल अशी व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.
भारतात तसेच जगभरात नेत्रदान करत असलेल्यांची संख्या अजुनही कमी असल्याचे मुख्य कारण काय आहे?
आज भारतात तसेच इतर देशात देखील नेत्रदान करत असलेल्या व्यक्तींची संख्या खुप कमी असलेली आपणास दिसुन येते आणि याचे मुख्य लोकांमध्ये नेत्रदानाविषयी पाहिजे तेवढी सामाजिक जागृकता निर्माण झालेली नाहीये.
लोकांना अजुनही नेत्रदानाचे महत्व समजलेले नाहीये.नेत्रदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे हे अद्यापही लोकांनी मान्य केलेले नाहीये.म्हणजेच नेत्रदानाच्या ह्या मोहीमेला पाहिजे तसा प्रतिसाद जनतेकडुन अजुनही मिळताना दिसून येत नाहीये.हेच कारण आहे की लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी दरवर्षी हा नेत्रदान दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्यात येतो.
[pt_view id="e4cc13apal"]