आंतरराष्ट्रीय योगा दिवस विषयी माहीती International Yoga Day information in Marathi
मित्रांनो आज कोरोनासारख्या महामारीने जेव्हा आपल्या आयुष्यात तेव्हा आरोग्य जपणे किती महत्वाचे आहे हे आपणा सर्वाच्या लक्षात आले आणि आपण आपल्या आहाराकडे,व्यायामाकडे विशेष लक्ष देऊ लागलो.
कारण कोरोना आल्यानंतर आपणास आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे समजले.पण अजुनही कोरोनाची लाट संपलेली नाहीये जागोजागी आजही कोरोनाचे रूग्ण आढळुन येत आहेत.
तसेच आता नोरोव्हायरस, मँकी पाँक्स यासारखे नवीन आजार देखील आपले डोके वर काढु पाहता आहे.यासाठी आपण आपले आरोग्य जपणे फार महत्वाचे झाले आहे.
आणि योगा हे एकमेव असे साधन तसेच माध्यम आहे जे आपणास सदैव शारीरिक आणि मानसिक दृष्टया निरोगी राहण्यास मदत करते आजारांशी लढण्यासाठी आपल्या शरीरात शक्ती निर्माण करते.
हेच योगाचे अनन्यसाधारण महत्व पटवून द्यायला दरवर्षी एक विशेष दिवस आंतरराष्टीय पातळीवर साजरा केला जात असतो आणि तो दिवस म्हणजे आंतरराष्टीय योगा दिन.
आजच्या लेखात आपण ह्याच आंतरराष्टीय योगा दिनाविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
आंतरराष्टीय योगा दिवस कधी आणि केव्हा साजरा केला जातो?
आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा प्रत्येक वर्षाला 21 जुन या तारखेस साजरा केला जातो.
आंतरराष्टीय योगा दिवस का साजरा केला जातो?
- योगा केल्याने आपल्याला अनेक शारीरीक तसेच मानसिक फायदे प्राप्त होत असतात.योगा केल्याने अनेक शारीरीक तसेच मानसिक आजारांपासुन आपले संरक्षण होत असते.आपल्याला एक आरोग्यदायी आणि रोगमुक्त जीवन जगता येते.
- हेच योगाचे महत्व फायदे सर्व लोकांना पटवून देण्याकरीता,समजावून सांगण्याकरीता आणि नियमित योगा करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी,योगा करण्याविषयी जनतेत जागृकता निर्माण करण्याकरीता दरवर्षी 21 जुन रोजी आंतरराष्टीय पातळीवर योगा दिवस साजरा करण्यात येत असतो.
आंतरराष्ट्रीय योगा दिवस कसा साजरा केला जातो?
21 जुन रोजी आंतरराष्टीय योगाश दिनाच्या दिवशी दरवर्षी जगभरात योगा शिबिर तसेच योगाचे इतर कार्यक्रम आयोजित केले जातात.ज्यात आपल्याकडुन विविध योगासने करून घेतली जात असतात.
आंतरराष्टीय योगा दिवस कधीपासुन साजरा केला जाऊ लागला?हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य इतिहास काय आहे?
2015 सालात 21 मे रोजी प्रथमत आंतरराष्ट्रीय पातळीवर योगा दिवस साजरा करण्यात आला होता.हा दिवस साजरा करायला तेव्हा आरंभ झाला जेव्हा नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये 27 सप्टेंबर रोजी एका सभेत हा दिवस साजरा करण्याविषयी सर्वप्रथम प्रस्ताव मांडला होता.
- ज्यात नरेंद्र मोदी असे म्हणाले होते की योग ही आपल्या प्राचीन परंपरेकडून प्राप्त झालेला अनमोल वारसा आहे.योग हा उत्तम आणि निरोगी आरोग्याचे जीवणाचे प्रतिक आहे.योगा केल्याने आपण नेहमी निरोगी राहतो योगा करून आपले विचार,कृती भावना यांच्यावर देखील आपण नियंत्रण प्राप्त करू शकतो.
- आणि आपल्या रोजच्या जीवनशैलीत बदल घडवून चेतना निर्माण करून हवामानातील कुठल्याही बदलास सहजपणे सामोरे जाऊ शकतो.
- आणि नरेंद्र मोदी यांच्या ह्याच प्रस्तावास 2014 मध्येच 11 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्यांनी मान्यता देखील दिली होती.आणि ह्या प्रस्तावास नवव्द दिवसांच्या आत मान्यता देण्यात आली.हा कालावधी संयुक्त राष्टाकडुन इतर दिवस साजरा करण्याच्या दिलेल्या मंजुरीच्या कालावधीपेक्षा सगळयात कमी कालावधी होता.
प्रथम आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी आणि केव्हा साजरा करण्यात आला?
2015 सालात 21 मे रोजी प्रथमत आंतरराष्टीय पातळीवर योगा दिवस साजरा करण्यात आला होता.
दरवर्षी 21 जुन रोजीच आंतरराष्ट्रीय योग दिवस का साजरा केला जातो?यामागचे वैदिक कारण काय आहे?
- 21 जुन हा वर्षभरातील एक सगळयात मोठा दिवस असतो.ह्या दिवशी सुर्य देखील उशिरा मावळत असतो आणि लवकर उगवत असतो.
- वैदिक गणितात असे दिले आहे की उन्हाळी संक्रातीनंतर सुर्य दक्षिणायन होत असतो.आणि हा काळ आध्यात्मिक सिदधी प्राप्त करण्यासाठी एक उत्तम काळ मानला जात असतो.
योगा करण्याचे महत्व तसेच फायदे कोणकोणते आहेत?
नियमित योगा केल्यामुळे पुढील काही शारीरीक,मानसिक आरोग्याचे फायदे आपणास प्राप्त होत असतात-
1) जर आपण नियमित योगा केला तर आपल्याला कुठलाही आजार जडत नसतो आपले शरीर सदैव निरोगी आणि तंदूरस्त राहत असते.
2) नियमित योगा केल्याने आपल्या शरीराची कुठल्याही आजाराशी लढा देण्याची क्षमता वाढत असते.म्हणजेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
3) सकाळी सकाळी योगा केल्याने दिवसभर आपला मुड एकदम फ्रेश आणि प्रफुल्लित राहत असतो.
4) योगा केल्याने आपल्या शरीरातील उर्जा वाढत असते ज्याने आपण कुठलेही अधिक कार्यक्षमपणे करू शकतो.
5) नियमित जर योगा केला तर आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात राहत असते ज्याने आपल्याला डायबिटीस सारखा साखर वाढल्यामुळे होणारा आजार देखील जडत नाही.
6) नियमित योगा केला तर आपले वजन देखील नियंत्रणात राहत असते.शरीराचा फँट वाढत नसतो.ज्याने आपल्याला लठठपणाची समस्या होत नाही.
7) नियमित योगा केल्याने आपण नेहमी तणाव मुक्त राहतो.
8) दररोज वेगवेगळी योगासने केल्याने आपल्या शरीराला देखील लवचिकता प्राप्त होते.
9) नियमित योगा केल्याने आपले मन देखील शांत राहते.आपल्या एकाग्रता क्षमतेत वाढ होते.
आपण नियमित योगा करणे का गरजेचे आहे?
आज कोरोना सारख्या अनेक महामारीं आपल्या जीवणात प्रवेश करत आहे.आणि आपल्याला जर ह्या महामारींपासुन आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर आपण नियमित योगा करणे फार गरजेचे आहे.
कारण योगा केल्याने अशा आजारांशी लढण्यासाठी लागणारी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि सगळयात महत्वाचे म्हणजे आपणास कुठलाही आजार जडत नसतो आपण नेहमी रोगमुक्त राहतो