लॅबोरेटरी थर्मामीटर अणि क्लिनिकल थर्मामीटर या दोघांमध्ये काय फरक आहे?Difference between laboratory thermometer and clinical thermometer

लॅबोरेटरी थर्मामीटर अणि क्लिनिकल थर्मामीटर -Difference between laboratory thermometer and clinical thermometer

क्लिनिकल थर्मामीटर –

  1. क्लिनिकल थर्मामीटरला मेडिकल थर्मामीटर असे देखील संबोधले जाते.क्लिनिकल थर्मामीटरचा वापर आपण आपल्या घरात करत असतो.आपल्या शरीरातील तापमानाची तपासणी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  2. क्लिनिकल थर्मामीटर हे मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी विशेषतः डिझाईन करण्यात आलेले आहे.क्लिनिकल थर्मामीटरची साईज ही खुप लहान असते.
  3. क्लिनिकल थर्मामीटरची रेंज ही ३५ डिग्री सेल्सिअस ते ४२ डिग्री सेल्सिअस इतकी असते.म्हणजे यात ३५ डिग्री सेल्सिअस पासुन ४२ डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान मोजता येते.कारण मानवी शरीरातील तापमान हे ३५ पेक्षा कमी नसते अणि ४२ पेक्षा अधिक देखील नसते.
  4. क्लिनिकल थर्मामीटर मध्ये एका बाजुला सेल्सिअस स्केल असते अणि दुसरया बाजुला फॅरेनहाईट स्केल असते.
  5. मानवी शरीरातील नाॅरमल तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असते पण याचे सरासरी प्रमाण यापेक्षा कमी किंवा अधिक देखील हे असु शकते.
  6. क्लिनिकल थर्मामीटर मध्ये आपण ज्या गोष्टीचे तापमान मोजत असतो त्या वस्तुला यातुन बाहेर काढल्यावर याचे स्केल चेंज होत नसते.कारण यात एक किंक लावण्यात येत असते जे मरक्युरीला खाली येऊ देत नाही.
  7. यात आपण तोंडात थर्मामीटर ठेवतो अणि काही वेळाने थर्मामीटर तोंडाबाहेर काढत चेक करत असतो की आपले शरीराचे तापमान नेमके किती आहे.कारण यात किंक लावण्यात आले असल्याने ते मरक्युरीला लगेच खाली येऊ देत नाही.
  8. क्लिनिकल थर्मामीटरचा वापर आपणास लॅबोरेटरी मध्ये करता येत नाही.

 laboratory thermometer and clinical thermometer
laboratory thermometer and clinical thermometer

लॅबोरेटरी थर्मामीटर –

लॅबोरेटरी थर्मामीटरचा वापर हा प्रयोगशाळेमध्ये laboratory मध्ये केला जातो.लॅबरोटरी थर्मामीटरची साईज ही मोठी असते.

  1. लॅबोरेटरी थर्मामीटरची रेंज ही १० ते ११० डिग्री सेल्सिअस इतकी असते.
  2. लॅबोरेटरी थर्मामीटर मध्ये आपण ज्या गोष्टीचे,साॅल्युशनचे तापमान आपण यात मोजत असतो त्या वस्तुला साॅल्युशनला यातुन बाहेर काढल्यावर याचे स्केल लगेच चेंज होत असते.कारण यात किंक लावण्यात आलेले नसल्याने मरक्युरी लगेच खाली येऊन जाते.
  3. ज्यामुळे आपल्याला अचुक तापमानाची रीडींग घेता येत नाही.लॅबोरेटरी थर्मामीटरचा वापर आपणास आपल्या शरीरातील तापमान चेक करण्यासाठी करता येत नसतो.
See also  अ‍ॅक्यूपंक्चर म्हणजे काय ? अ‍ॅक्यूपंक्चरचे फायदे | अ‍ॅक्युपंक्चर आणि अ‍ॅक्युप्रेशरमधील फरक | What is Acupuncture