चंद्रयान मिशन ३ काय आहे?chandrayaan mission 3 information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

चंद्रयान मिशन ३ काय आहे?chandrayaan mission 3 information in Marathi

१४ जुलै २०२३ रोजी इस्रोने चंद्रयान मिशन ३ लाॅच करण्याचे ठरवले आहे.

भारताच्या ह्या चंद्रयान मिशन ३ मुळे भारत देश हा चंद्रावर उतरणारा चौथा देश म्हणून ओळखला जाणार आहे.म्हणजे समजा जर भारताचे हे चंद्रयान ३ मिशन यशस्वी ठरले तर चंद्रावर उतरणारा चौथा देश म्हणून भारत देशाला प्राप्त होणार आहे.

याआधी चीन, अमेरिका अणि रशिया या तिन्हीच देशांनी चंद्रावर आपले अंतराळ यान अलगदपणे उतरविण्यात यश प्राप्त केले आहे.

चंद्रावर जात असलेले हे इस्रोचे स्पेसशिप हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.हया विभागात अद्याप कुठलेही यान पोहोचले नसल्याचे सांगितले जाते.

म्हणून ही चंद्रयान ३ मोहीम फक्त भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांकरीता वैश्विक पातळीवरील एक महत्वाची मोहीम ठरणार आहे.

आपल्या भारत देशातील तंत्रज्ञान किती विकसित आहे हे दाखवण्याची भारताला मिळालेली ही एक उत्तम संधी आहे.

chandrayaan mission 3 information in Marathi
chandrayaan mission 3 information in Marathi

चंद्रयान मिशन ३ कधी लाॅच करण्यात येणार आहे?

चंद्रयान मिशन ३ चे काम वेगात सुरू झाले असुन १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता चंद्रयान ३ याचे प्रक्षेपण अंतराळात करण्यात येणार आहे याबाबत इस्रोकडुन अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे.

See also  कृषि पर्यटन व्यवसाय माहिती - Agriculture tourism business information in Marathi

चंद्रयान ३ हे यान २३ आॅगस्ट दरम्यान चंद्रावर उतरविण्यात येईल अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

चंद्रयान मिशन ३ काय आहे?

अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आपल्या भारत देशाने अनेक महत्वाच्या मोहीमा राबविल्या आहेत.भारताने पहिल्या चंद्रयान मोहीमेत यश प्राप्त झाल्यानंतर आपली दुसरी चंद्रयान मोहीम राबवली होती.

पण तांत्रिक बिघाड म्हणजेच काही टेक्नीकल फाॅल्ट मुळे ह्या चंद्रयान २ मोहीमेत भारत देश अपयशी ठरला.

२२ जुलै २०१९ रोजी अंतराळात प्रक्षेपित करण्यात आलेल्या ह्या चंद्रयान २ ला ६ सप्टेंबर २०१९ रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रावर लॅडर अणि रोव्हर क्रॅश झाल्यावर थोडयावरून अपयश प्राप्त झाले होते.

ज्यामुळे आता इस्रोने चंद्रयान ३ ही मोहीम आपल्या हातात घेतली आहे.हया मोहीमेला यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी इस्रोने वेगाने तयारी सुरू केली आहे.

१२ जुलै २०२३ ते १९ जुलै २०२३ ह्या कालावधी दरम्यान ही अंतराळ मोहीमेचे प्रक्षेपण करण्यात येणार असुन चंद्रावर अंतराळ यान उतरविण्यासाठी केलेला भारत देशाचा हा सलग दुसरा प्रयत्न ठरणार आहे.

५ जुले २०२३ रोजी आंध्र प्रदेश राज्यात असलेल्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन ह्या अंतराळ केंद्रामधुन चंद्रयान ३ ला जीएस एलव्ही मार्क ३ एलव्हीएम ३ ह्या प्रक्षेपण यानासोबत जोडण्यात आले असल्याचे इस्रोने घोषणा केली होती.

चंद्रयान ३ ला एलव्हीएम सोबत का जोडण्यात आले आहे?

चंद्रयान ३ ह्या याना मध्ये रोव्हर,लॅडर अणि प्राॅपलशन मोडयुल असतील यांना स्वता अंतराळात प्रवेश करता येत नसतो.

याचकरीता एलव्ही एम ३ ह्या यानाच्या साहाय्याने यांना अंतराळात झेपावले जाणार आहे.म्हणजे चंद्रयान ३ ला अवकाशात सोडण्यासाठी एल व्ही एम ३ हे प्रक्षेपण यान हे आपली एक महत्वाची भूमिका बजावताना दिसुन येईल.

एल व्ही एम ३ काय आहे?

एलव्ही एम ३ हे इस्रो ह्या अंतराळ संशोधन संस्थेचे एक अत्यंत महत्वाचे प्रक्षेपण यान आहे.हया यानाची उंची सुमारे ४३.५० मीटर इतकी आहे.अणि ह्या यानाचे वजन ६४० टन इतके आहे.

See also  महात्मा फुले यांचे प्रेरणादायी विचार - Mahatma Phule inspirational thoughts in Marathi

एल व्ही एम ३ ह्या शक्तीशाली प्रक्षेपण यानामध्ये आठ ते नऊ हजार कि ग्रॅ इतके वजन पेलण्याची क्षमता आहे.एल व्ही एम ३ ह्या यानाला भारत देशातील सर्वाधिक वजन असलेले यान म्हणून ओळखले जाते.

एल व्ही एम ३ हया प्रक्षेपण यानामध्ये प्राॅपलझन सिस्टम असते.यालाच आपण अंतराळ यानाला पुढे ढकलले जाण्याची प्रोसेस असे म्हणू शकतो.

हे प्राॅपलशन सिस्टम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण उर्जेवर विजय प्राप्त करत उपग्रहातील अवजड वस्तुंना अवकाशात वर उचलायला जी उर्जा लागत असते त्या उर्जेची निर्मिती करण्याचे काम करते.

चंद्रावर जाऊन चंद्रयान ३ कोणते कार्य करणार आहे?

चंद्रयान ३ हे चंद्रावर उतरवून चंद्रावरील वातावरण कसे आहे तेथील परिस्थिती कशा प्रकारची आहे याचा सखोलपणे अभ्यास केला जाणार आहे.

चंद्रयान २ अणि चंद्रयान ३ मध्ये काय फरक असेल?

चंद्रयान ३ हे चंद्रयान २ प्रमाणेच एकदम समान असणार आहे.पण चंद्रयान ३ मध्ये लॅड रोव्हर अणि प्राॅपलशन मोडयुल वापरण्यात येणाऱ आहे.

चंद्रयान ३ हे यान प्राॅपलेंट लॅडर माॅडयुल याला अणि रोव्हरला चंद्राभोवती असलेल्या चंद्राभोवती असलेल्या १०० किलोमीटर इतक्या कक्षेत घेऊन जाईल.अणि चंद्रयान ३ हळुवार पणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविले जाणार आहे.

चंद्रयान २ मधील आर्बिटर कडुन सहायता घेण्यात येणार असल्याने चंद्रयान ३ मध्ये आर्बिटर पाठविले जाणार नाहीये.

चंद्रयान मिशन ३ चे एकुण बजेट किती आहे?

चंद्रयान मिशन ३ चे बजेट ६१५ करोड इतके ठेवण्यात आले आहे.

चंद्रयान मिशन ३ चा प्रमुख हेतु काय असणार आहे?

चंद्रयान मिशन ३ चे प्रमुख उद्दिष्ट हे सर्वप्रथम चंद्रावर यशस्वी रीत्या उतरणे याचसोबत चंद्राच्या पृष्ठभागावर संचार करण्याची रोव्हरची क्षमता किती आहे हे बघणे असणार आहे.

ह्या मोहीमेत अनेक महत्वाच्या नवनवीन वैज्ञानिक निरीक्षणांची नोंद देखील करण्यात येणार आहे.

ह्या मोहीमे दरम्यान विविध उपक्रमांच्या साहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या माती रासायनिक द्रव्य पदार्थ वातावरणात असलेले घटक पदार्थ यांचा अभ्यास करून चंद्रा विषयीच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.चंद्रयान ३ मध्ये भुकंप मोजणारे यंत्र देखील बसविण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

See also  संत कबीर यांच्याविषयी माहीती- Sant Lord Kabir Information In Marathi

चंद्रयान १ अणि २ मोहीमे दरम्यान काय करण्यात आले होते?

चंद्रयान मोहीम १ दवारे चंद्रातील पृष्ठभागावर असलेले पाण्याच्या रेणुंचे अस्तित्व जाणुन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

चंद्रयान मिशन २ दवारे चंद्र आणि त्याच्या भोवती असलेल्या वातावरणा विषयी माहिती गोळा करण्यात आली होती.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा