काही महत्वाच्या रक्त चाचण्यांची यादी – List of common blood tests
आज आपण काही महत्वाच्या ब्लड टेस्टची यादी बघणार आहोत.
आणि त्या ब्लड टेस्ट कधी आणि कशासाठी घेतल्या जातात? हे देखील थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
● Liver function tests
● Lipid panel
● Basic metabolic panel
● Erythrocyte sedimentation rate
● HbA1C test
● Alkaline phosphatase
● Thyroid function test
● Blood glucose test
● Hematocrit
● C-reactive protein
● Platelet count
● Arterial blood gas
● Coagulation test
● Prothrombin time
● Blood culture
● Blood urea nitrogen
● Kidney function test
● Glucose tolerance test
● Comprehensive metabolic panel
1)Complete blood count :
Complete blood count (CBC) ही एक blood test आहे.जी आपल्या एकूण आरोग्याचे मूल्यांकन(evaluation) करण्यासाठी आणि अँनिमिया, संसर्ग आणि ल्युकेमिया यासह विविध प्रकारचे आजार शोधण्यासाठी वापरली जात असते.
Complete blood count test ही आपल्या रक्तातील अनेक घटक आणि वैशिष्ट्ये मोजत असते.
2) Liver function tests :
Liver function test ला यकृत रसायनशास्त्र असे देखील म्हटले जाते.(liver chemistries)
हे आपल्या रक्तातील proteins,liver enzymes आणि बिलीरूबीनची पातळी मोजुन आपल्या liver ची health निर्धारीत करण्यास मदत करत असते.
3) Lipid panel :
Lipid panel ही एक common blood test तसेच सुविधा आहे.जी आपल्या आपल्या हदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाच्या जोखमीचे परीक्षण करायला healthcare कडुन आपणास provide केली जाते.
4) Basic metabolic panel :
Basic metabolic panel ही एक blood sample test आहे.जी आपल्या रक्तामधील आठ भिन्न पदार्थ मोजत असते.
हे पँनल आपल्या शरीरातील chemical balance आणि metabolism याविषयी उपयुक्त माहीती प्रदान करत असते.
म्हणजेच शरीरातील रासायनिक संतुलन कसे आहे आणि आपले शरीर सेवण केलेल्या अन्नपदार्थांचे उर्जेमध्ये कसे रूपांतर करीत असते.याविषयी आपणास माहीती देत असते.
5) Erythrocyte sedimentation rate :
Erythrocyte sedimentation rate(ESR) हा blood test चा एक प्रकार असतो.
ज्यामध्ये blood sample असलेल्या test tube च्या तळाशी erythrocyte लाल रक्तपेशी किती लवकर स्थिर होतात हे मोजत असते.
6) HbA1C test :
Hemoglobin A1c (HbA1c) test हिमोग्लोबिनशी संलग्न असलेल्या रक्तातील साखरेचे म्हणजेच ग्लूकोजचे प्रमाण मोजत असते.
हिमोग्लोबिन हा आपल्या लाल रक्तपेशींचा एक घटक आहे जो आपल्या फुफ्फुसातून आपल्या शरीराच्या बाकीच्या भागात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतो.
7) Alkaline phosphatase :
Alkaline phosphatase (ALP) हे शरीराच्या सर्व ऊतींमध्ये आढळणारे प्रथिन(protein) आहे.
जास्त प्रमाणात ALP असलेल्या ऊतींमध्ये यकृत,पित्त नलिका आणि हाडे यांचा समावेश होतो.
ALP ची पातळी मोजण्यासाठी blood test केली जात असते.संबंधित test ही ALP isoenzyme test आहे.
8) Thyroid function test :
आपली thyroid ग्रंथी किती व्यवस्थित काम करते आहे हे मोजण्यासाठी या blood test ची series घेतली जात असते.
या tests मध्ये T3,T3RU,T4 आणि TSH यांचा समावेश होतो.
9) Blood glucose test :
Blood glucose test ही आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजण्यासाठी केली जात असते.
10) hematocrit test :
Hematocrit ही test आपल्या शरीरात असलेल्या लाल रक्तपेशींचे प्रमाण मोजण्यासाठी केली जात असते.
11) C reactive protein test :
c-reactive protein test आपल्या रक्तामधील c-reactive protein (CRP) च्या पातळीचे मोजमाप करत असते.
CRP test चा वापर जळजळ निर्माण करणाऱ्या conditions शोधण्यासाठी किंवा त्यांचे निरीक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो.
12) Platelet count :
Platelet count test आपल्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या मोजण्यासाठी केली जाते.
13) Arterial blood gas :
Arterial blood gas (ABG) test ही एक blood test आहे ज्यात आपल्या रक्तातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची पातळी मोजण्यासाठी आपल्या शरीरातील arterial sample आवश्यक असते.
ही test आपल्या रक्तातील acid आणि bases
देखील check करते,ज्याला pH balance असे म्हणतात.
14) Coagulation test :
Coagulation test आपल्या रक्ताची गुठळी होण्याची क्षमता आणि रक्त गोठण्यास किती वेळ लागतो हे मोजण्यासाठी केली जाते.
15) Prothrombin time :
Prothrombin time (PT) test रक्ताच्या sample मध्ये गुठळी तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? हे मोजत असते.
16) Blood culture :
Blood culture ही एक laboratory test आहे. जी एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील जीवाणू(bacteria) किंवा बुरशी(fungi) शोधण्यासाठी केली जात असते.
17) Blood urea nitrogen :
Blood urea nitrogen test ही आपल्या रक्तात युरिआ नायट्रोजनचे प्रमाण किती आहे हे चेक करण्यासाठी केली जाते.
18) Kidney function test :
Kidney function test ही urine किंवा blood test असते जी आपले मूत्रपिंड म्हणजेच किडनी किती चांगल्या पदधतीने काम करत आहेत याचे मूल्यांकन करण्यासाठी केली जात असते.
19) glucose tolerance test :
Glucose tolerance test ही एक laboratory test आहे जी आपले शरीर रक्तातून साखर,स्नायू आणि चरबी सारख्या ऊतींमध्ये कसे हलवते हे तपासत असते.
20) Comprehensive metabolic panel :
Comprehensive metabolic panel(CMP) ही एक test आहे जी आपल्या रक्तातील 14 भिन्न पदार्थांचे मोजमाप करते.
ही test आपल्या शरीरातील रासायनिक संतुलन(chemical balanced) आणि चयापचय(metabolism) बद्दल महत्वाची माहिती प्रदान करते.