होम लोन घेण्यासाठी लागणारया महत्वाच्या कागदपत्रांची यादी – List of important documents required for get home loan in Marathi

होम लोन घेण्यासाठी लागणारया महत्वाच्या कागदपत्रांची यादी – List of important documents required for get home loan in Marathi

मित्रांनो जेव्हा आपण होम लोनसाठी अर्ज करत असतो तेव्हा कर्ज प्राप्त मिळवण्यासाठी आपल्याला अनेक महत्वाची कागदपत्रे लागत असतात.

आजच्या लेखात आपण ह्याच सर्व महत्वपूर्ण कागदपत्रांची यादी बघणार आहोत.

होम लोन घेण्यासाठी आपल्याला कोणकोणती महत्वाची कागदपत्रे लागत असतात?

होम लोन घेण्यासाठी आपणास चार महत्वाचे Documents,. .

1)के वायसी कागदपत्रे -KYC Documents

2) उत्पन्नाचा पुरावा -income proof statement

3) प्रक्रिया तपासणी शुल्क -processing fee cheque

4) संपत्तीची कागदपत्रे -property documents

1)के वायसी कागदपत्रे -KYC Documents –

के वायसी मध्ये आपणास आयडी प्रुफ अणि अँड्रेस प्रूफ म्हणुन खालील डाँक्युमेंट द्यावे लागत असतात.

आयडी प्रूफ डाँक्युमेंटची यादी -ID proof documents list –

● आधार कार्ड

● पँन कार्ड

● मतदान कार्ड

● पासपोर्ट साईज दोन फोटो

● ड्राईव्हिंग लायसन्स

● पासपोर्ट

वरील डाँक्युमेंटमध्ये आयडी प्रूफसाठी फक्त आधार कार्ड पँनकार्ड पासपोर्ट साईज दोन फोटो एवढे कागदपत्रे असतील तरी पुरेसे आहे.

अँड्रेस प्रूफ डाँक्युमेंटची यादी -Address proof documents list –

● आधार कार्ड

● पासपोर्ट

● मतदान कार्ड

● लाईटबील

● पाणी पटटी

● राशन कार्ड

● गँस कार्ड

आपल्या आधार कार्ड वर आपला सध्याचा अँड्रेस दिलेला नसेल तर आपण ज्या भाडयाच्या घरात राहत आहे तेथील भाडोत्री कराराची कागदपत्रे तसेच लाईटबील आपण अँड्रेस प्रूफकरीता जमा करू शकतो.

See also  ऑपरेशनकावेरी काय आहे? ऑपरेशनकावेरीचा मुख्य हेतु काय आहे? - Operation Kaveri Sudan

जे अर्जदार कंपनीकडुन मिळालेल्या घरात राहत असतील ते कंपनीकडुन कंपनीच्या मालकाकडुन एक लेटर घेऊन ते इथे अँड्रेस प्रुफसाठी जमा करू शकतात.

2) उत्पन्नाच्या पुराव्यासाठी कागदपत्रांची यादी -income proof documents list-

नोकरदारांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी लागणारे कागदपत्रे –

● टीडीएस सर्टिफिकेट

● शेवटच्या तीन महिन्यांची सँलरी स्लीप

● शेवटच्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट

● कंपनीकडुन मिळालेले अपाँइंटमेंट तसेच जाँईनिंग लेटर

● ज्यांना नोकरीत प्रमोशन मिळालेले आहे ते प्रमोशन लेटर दाखवू शकतात.

● आयटी आर फाईल करेल असल्यास मागील तीन महिन्यांची आयटीआर काँपी ज्यांनी आयटी आर फाईल केलेला नही त्यांना याची आवश्यकता नसते.

● इतर कुठलेही लोन याआधी घेतलेले असेल त्याचे स्टेटमेंट

व्यवसायिकांना उद्योजकांना होम लोन घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे –

● मागील तीन वर्षाची सी ए सर्टिफाईड आयटीआरची प्रत

● शेवटच्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट

● बिझनेस रेजिस्ट्रेशन प्रत
उदा,शाँप अँक्ट लायसन,उद्योग आधार,जीएसटी नोंदणी सराव प्रमाणपत्र इत्यादी

● गुंतवणुक केली असेल तर त्याचा पुरावा investment proof सादर करावा लागतो.

● याआधी लोन घेतले असेल तर त्याचे स्टेटमेंट

होम लोन अँप्लीकेशन फाँर्म घेऊन त्याला वरील सर्व डाँक्युमेंट लावून आपणास बँकेत हा फाँर्म लोनसाठी अँप्लाय करायला जमा करायचा असतो.

यानंतर आपले लोन अँप्लीकेशनवर प्रोसेस केली जाते यात बँक आपल्या कागदपत्रांची पुनर्नपडताळणी करत असते.हे बघायला की आपण जमा केलेले डाँक्युमेंट फाँर्म मध्ये भरलेली माहीती खरी आहे की खोटी.

या प्रक्रियेत यासाठी बँकेकडुन काही कर्मचारी देखील चौकशीसाठी येत असतात.मग पुर्ण चौकशी करून झाल्यानंतर आपले लोन अँप्लीकेशन अँप्रूव्ह केले जात असते.

मग त्यानंतर किती कर्ज द्यायचे त्यावर आपणास किती व्याज भरावा लागेल?हे बँकेकडुन लोन अँग्रीमेंटमध्ये ठरवले जात असते.

यानंतर आपणास शेवटी आपले प्राँपर्टीचे म्हणजेच ज्या घरावर आपण लोन घेतो आहे त्याचे डाँक्यूमेंट सबमीट करायचे असतात.

अणि समजा आपण लोन घेऊन एखाद्या बिल्डरकडुन घर खरेदी करणार आहे तर त्या बिल्डींगच्या मंजूरी संबंधित सर्व महत्वपूर्ण डाँक्युमेंट देखील आपणास सबमीट करावी लागतात.ज्याला मास्टर फाईल म्हणण्यात येते.यात प्लाँटचा बांधणी सुधारणा करार,सेलडीड,सातबारा हे सगळ यात असते.डिडक्ट,डिक्लेरेशन,जीपीए,कमेंझमेंट सर्टिफिकेट अशी अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे यात समाविष्ट असतात.

See also  लॉकडाऊन फायदे -5 Benefits of lockdown in Marathi

ही काँपी आपणास बिल्डरकडुन प्राप्त होत असते.जी आपणास बँकेत जमा करायची असते.ज्याची एक प्रत आपण स्वताकडे पण असु द्यावी.

अणि समजा आपण ज्या बिल्डरकडुन घर खरेदी करतो आहे त्याचा आपण ज्या बँकेतुन लोन घेतो आहे त्या बँकेशी टाय अप असेल तर आपल्याला ही सर्व कागदपत्रे बँकेकडे जमा करावी लागत नसतात.

बिल्डर अणि घर मालकात जेवढाही घरासंबंधी करार होत असतो जसे की सेल डीड अँग्रीमेंट पेपर अशी त्या कराराचे सर्व कागदपत्रे घर विकत घेणारया घर मालकाला बँकेकडे लोनसाठी प्रूफ म्हणुन जमा करावी लागतात.

स्वताच्या plot घर बांधण्यासाठी होम लोन प्राप्त करायला कोणकोणते कागदपत्रे लागत असतात?

● ज्या फ्लाँटवर घर बांधायला आपणास होम लोन हवे आहे त्या फ्लाँटशी संबंधित सर्व कागदपत्रे आपणास इथे लागत असतात.

● फ्लाँटवर घर बांधण्यासाठी आर्कीटेक्चरकडुन तयार केलेला घराचा प्लँन यासाठी घेतलेली मंजुरी अणि त्या मंजुरीसाठी लागणारी सर्व महत्वाची कागदपत्रे आपणास बँकेकडे सबमीट करावी लागत असतात.

इत्यादी वरील सर्व महत्वपूर्ण कागदपत्रे जमा करून झाल्यानंतर आपणास बँकेसोबत एक लोन अँग्रीमेंट करावे लागते.जिथे एका माँरगेज पेपरवर आपली बँकेकडून सही घेतली जाते.

अणि मग शेवटी लोन मंजुर झाल्यानंतर बिल्डरदवारे लोन घेतलेले असेल तर लोनची रक्कम बिल्डरला बँकेकडुन दिली जात असते.आपण स्वता केले असेल तर ठाराविक लोनची रक्कम बँक आपल्या खात्यावर जमा करत असते.

होम लोन घेताना लक्षात ठेवायच्या काही महत्वाच्या बाबी –

जेव्हा आपण होम लोन घेण्यासाठी कुठल्याही बँकेत अँप्लाय करत असतो तेव्हा आपल्याला चार प्रकारचे महत्वाचे डाँक्युमेंट लागत असतात.

यात आपल्याला सर्वात पहिले के-वायसी कागदपत्रांची आवश्यकता भासत असते.ज्यात आपणास आपल्या ओळखीचे प्रमाण द्यावा लागत असते.सोबत अँड्रेस प्रूफ देखील द्यावा लागत असतो.

दुसरे कागदपत्र आपल्याला इन्कम प्रुफ डाँक्युमेंट लागते.ज्यात आपल्या इन्कमविषयी सर्व माहीती दिलेली असते.

See also  अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी का केली जाते? ह्या दिवशी सोने खरेदीचे महत्व काय आहे? - Why buy gold on Akshaya Tritiya?

तिसरे कागदपत्र प्रोसिसिंग फी साठी चेक लागत असतो.अणि चौथ्या डाँक्युमेंटमध्ये आपणास मालमत्तेची कागदपत्रे म्हणजे प्राँपर्टी डाँक्युमेंट लागत असतात.

समजा आपण आधीच प्राँपर्टी तसेच घर फायनल करून घेतलेले असेल तर त्यासाठी आपल्याला प्राँपर्टी पेपर्स द्यावे लागत असतात.

अणि समजा आपण कोणते घर घ्यायचे हे अद्याप ठरवले नसेल तर आपण अशा परिस्थितीमध्ये देखील होम लोन मिळविण्यासाठी अर्ज करू शकतो.अणि आपले घर फायनल करून झाल्यानंतर प्राँपर्टीचे कागदपत्रे होम लोन घेण्यासाठी जमा करू शकतो.

होम लोन घेत असताना आपणास एका सहकारी अर्जदाराची आवश्यकता भासत असते.यात आपल्याकडे सहकारी अर्जदार असेल तर आपल्या के वायसी डाँक्युमेंट सोबत आपणास त्या को अँप्लीकंटचे देखील के वायसी डाँक्युमेंट जमा करणे गरजेचे असते.

सहकारी अर्जदाराला इंग्रजीत को अँप्लीकंट असे म्हटले जाते.

ज्यांच्याकडे कोणताही सहकारी अर्जदार नाहीये असे व्यक्ती एखाद्या पर्सनल गँरेंटरंची मदत देखील घेऊ शकतात.जो लोनसाठी आपली हमी घेत असतो.पण इथे देखील आपणास लोन घेण्यासाठी आपल्या के वायसी कागदपत्रांबरोबर आपल्या गँरेंटरचे केवायसी डाँक्युमेंट तसेच त्याचे इन्कम प्रूफची आवश्यकता असते.

मेन अँप्लीकंट कोणाला म्हणतात?Main applicant meaning in Marathi

होम लोनसाठी अर्ज करत असलेल्या मुख्य अर्जदारास मेन अँप्लीकंट असे म्हटले जाते.अणि त्या अर्जदाराच्या पत्नीला मुला मुलांना को अँप्लीकंट असे म्हटले जाते.

को अँप्लीकंट म्हणून कोणाचे नाव लावता येते?

अर्जदाराची पत्नी मुले यांना कोअँप्लीकंट लावता येते.
पण ज्यांचे लग्न झालेले नसेल ते आपल्या भावंडामंध्ये आई वडीलांमध्ये कोणालाही होम लोन साठी आपला को अँप्लीकंट लावू शकतात.